इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-जिवलग मित्र आणि सहकारी गमावला - धनंजय मुंडे*

 *जिवलग मित्र आणि सहकारी गमावला - धनंजय मुंडे*




परळी दि. 29 ---

परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबू नंबरदार हे महा विकास आघाडीतील काँग्रेस या घटक पक्षाचे परळी शहराध्यक्ष म्हणून सहकारी तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांचे आणि माझे जिवलग मित्राचे नाते होते आज मी माझा जिवलग मित्र गमावला आहे अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


बाबु नंबरदार यांच्यासोबत आपण विद्यार्थी दशेपासून सोबत होतो. अनेक वर्षे सोबत क्रिकेट खेळले आहे. क्रिकेटचे वेड असलेले बाबू नंबरदार हे संपूर्ण बीड जिल्ह्यात आपल्या शैलीमुळे परळीचे अझरुद्दीन  म्हणून प्रसिद्ध होते.


 क्रिकेट सोबतच परळीच्या राजकीय सामाजिक जीवनातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती त्यांच्या निधनाने परळीच्या क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या