MB NEWS-शिवाजीनगर लसिकरण केंद्रावर सावली अभावी जेष्ठ नागरिकांची उन्हात तगमग

 शिवाजीनगर लसिकरण केंद्रावर सावली अभावी जेष्ठ नागरिकांची उन्हात तगमग

स्वयंसेवी संस्थांनी निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शिवाजी नगर आरोग्य केंद्रावर तोबा गर्दी झाली.सकाळपासुनच लसिकरणासाठी निगरिकांनी केंद्राबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले. या केंद्रात बसण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने जेष्ठ नागरिक ताटकळले. शहरात लसिकरणासाठी काही सुटसुटीत व्यवस्था लागणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

     लसिकरणासाठी नागरिकांना सुव्यवस्था देण्याची गरज आहे मात्र प्रत्येक केंद्रावर आरोग्य विभागातील लोकच संभ्रमात असल्याचे दिसून येते त्यामुळे नागरिकांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.शिवाजी नगर येथील लसीकरण केंद्रावर जेष्ठांची गैरसोय तळपत्या उन्हात लसीकरनासाठी 45 वरील नागरिक व वयोवृद्ध नागरिक तासन तास रांगेत उभे असून यातच ज्यांना रक्तदाब,मधुमेह आहेत अशा व्यक्तीचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. कोणत्याही प्रकारे निवारा अथवा सावली मिळेल अशी व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे याकडे परळी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे लसीकरण करण्यासाठी आलेल्या जेष्ठांनी मत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार