MB NEWS-लसीकरणासाठी प्रधानमंत्री केअर्स फंडला काशी पीठाकडून पाच लाख रु. देणगी

 लसीकरणासाठी प्रधानमंत्री केअर्स फंडला काशी पीठाकडून पाच लाख रु. देणगी



वाराणसी (प्रतिनिधी)

सनातन वीरशैव धर्माच्या पंचपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले काशी पीठाचे जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आज प्रधानमंत्री केअर्स फंडला पाच लाख रुपये देणगी दिली. वाराणसीचे आयुक्त श्री दीपक अग्रवाल यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला.

यासंदर्भात जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, संपूर्ण देश कोरोना महामारीला सामोरे जात आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले होते. जनता भयग्रस्त आहे. या स्थितीमध्ये सर्वांचे सुरक्षाकवच म्हणजे लसीकरण होय. या क्षेत्रातील संशोधक आणि डॉक्टरांनी जनतेला लस घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सुरक्षाकवच असलेली ही लस सर्वांनी घ्यावी या उद्देशाने प्रधानमंत्री केअर्स फंडला 5 लाख रुपये दिले आहेत असे महास्वामीजी म्हणाले. महास्वामीजी पुढे म्हणाले, लसीकरणाविषयी गैरसमज करून घेऊ नये. संशोधक आणि डॉक्टर यांच्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवावा. आपले रक्षण करणारे लसीकरणरुपी सुरक्षाकवच सर्वांनी अवश्य घ्यावे.

याप्रसंगी काशी पीठाकडून महाराष्ट्रातील मंगळवेढ्यामध्ये कोविड उपचार केंद्र स्थापन केल्याबद्दल तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील अनाथ मुलांची शिक्षण, निवास व महाप्रसादाची जबाबदारी काशी पीठाने घेतल्याबद्दल वाराणसीचे आयुक्त दीपक अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले. महास्वामीजींची देणगी अत्यंत श्रद्धेने स्वीकारून प्रधानमंत्री केअर्स फंडला हा निधी सुपूर्द करण्याचे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले. यावेळी महास्वामीजींनी आयुक्त तसेच माध्यम प्रतिनिधींना शाल व श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला.

यानिमित्ताने काशी पीठात आयोजित केलेल्या समारंभामध्ये काशी वीरशैव विद्वत संघाचे विद्यार्थी, पीठाच्या व्यवस्थापिका श्रीमती नलिनी चिरमे, पीठाचे वकील उदयभान सिंग आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !