इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-गाढे पिंपळगाव येथे माता रमाईस अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण

 *गाढे पिंपळगाव येथे माता रमाईस अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण    


       
   

परळी वैजनाथ ------

परळी तालुक्यातील  गाढे पिंपळगाव ता परळी येथे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सावली माता रमाई यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले.माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी गाढे पिंपळगाव येथे सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रणखांबे आणि योगेश जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर सचिन रणखांबे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद घुंबरे यांनी केले.

माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गाढे पिंपळगाव येथील स्मशानभूमीत बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रणखांबे, ऑफ इंडिया पॅंथर सेनेचे परळी ता महासचिव विनोद घुंबरे, सुरज घागरमाळे, सिध्दार्थ घुंबरे, नितीन रोडे, हर्षद घुंबरे, प्रदिप घुंबरे, योगेश जगताप आणि रंजित घुंबरे आदिंनी परिश्रम घेतले....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या