पोस्ट्स

MB NEWS-अशी आहे: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा

इमेज
  अशी आहे: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा *आपला दसरा..आपली परंपरा* *बुधवार 5 ऑक्टोबर 2022*   *सावरगांव घाट (ता. पाटोदा)*   सकाळी 10 वा. पर्यंत सर्वानी भगवान भक्तीगडावरील मैदानात आसनस्थ व्हावे. सकाळी 11.45 ते दुपारी 12 वा.- मा. ताईसाहेबांचे हेलिपॅडवर आगमन दुपारी 12 ते 12.10 वा.  प.पू. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला सुरवात दुपारी 12.20 ते 12.30 वा. - मुर्तीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12.30 वा.  सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन दुपारी 12.30 ते 12.40 राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीला फुलांचे अर्पण दुपारी 12.45 ते 12.55 वा. - विविध मान्यवरांचे मार्गदर्शन  दुपारी 12.55 वा.  मा. ताईसाहेबांचे मार्गदर्शन  _वरील कार्यक्रमात 20 ते 30 मिनिटाच्यावर बदल होणार नाही, त्यामुळे सर्वांनी वेळेवर सुखरूप यावे._ *कृती समिती, दसरा मेळावा*

MB NEWS-म.सा.प परळी शाखेचा उपक्रम*

इमेज
  रविवारी 'कविता रंगते कोजागिरी 'त हे निमंत्रितांचे कविसंमेलन  म.सा.प परळी शाखेचा उपक्रम परळी वैजनाथ, दि. ०४/ १० / २०२२, (प्रतिनिधी)ः- मराठवाडा साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने कोजागिरीनिमित्त खास परळीकर रसिकांसाठी ' कविता रंगते कोजागिरी'त या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन रविवार दि. ०९ / १० / २०२२ रोजी सायं . ७ : ० ० वा. ' बन्सल क्लासेस माधवबाग ' येथे करण्यात आले आहे.  या कविसंमेलनात ज्यांच्या कवितेने रसिकमनात कायमचे घर केले असे चित्रपट कलावंत ,हास्यसम्राट , विनोदाचे बादशहा *नारायण सुमंत ( पिंपळखुंटे - माढा* )* गेय अभिव्यक्ती व हास्याचे फवारे उडवत रसिक मनावर कायम अधिराज्य करणारे *राजा धर्माधिकारी ( परतवाडा )* , '' गोड गळ्याचा व सक्षम काव्यविष्कार असलेले *सखाराम डाखोरे ( मुंबई )* , स्त्री मनाचा सक्षम हुंकार आशय व अभिव्यक्तीच्या अभिन्नतेसह आविष्कृत करणाऱ्या *प्रा.डॉ. प्रतिभा अहिरे (औरंगाबाद) , उत्कृष्ट निवेदक व आपल्या रांगड्या वाणीने रसिक मनावर अमीट छाप उमटवणारे व कवितेच्या प्रांतातही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे * राजेसाहेब कदम ( अ

MB NEWS-श्री. पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा

इमेज
  श्री.पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा  सिरसाळा........ येथील श्री. पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात दि. ०३/१०/२०२२ सोमवार रोजी इंग्रजी विभाग व एन एस एस विभागाच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती *"आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस"* म्हणून साजरी करण्यात आली.  या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. पी. कदम, प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (वैद्यनाथ महाविद्यालय परळी) तसेच महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत जाधव, एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ के एम नागरगोजे, डॉ जी गट्टी व प्रा विक्रम धनवे ई. मान्यवर उपस्थित होते.  या कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी अभ्यास मंडळाचे' उदघाटन व 'Universal' या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.  प्रसंगी बोलताना डॉ के एम नागरगोजे यांनी श्री लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. विष्णू चव्हाण यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून जगभर आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस साजरा करण्

MB NEWS-माजी मंत्री आ.धनंजय मुंडेंनी अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी भेट देत केले अभिष्टचिंतन

इमेज
  माजी मंत्री आ.धनंजय मुंडेंनी अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी भेट देत केले अभिष्टचिंतन  *परळी/प्रतिनिधी* माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी आज सोमवार दि.3 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चा झाली. आ.मुंडे यांनी श्री ठक्कर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या. आज सोमवारी सायंकाळी आ.धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आ.धनंजय मुंडे यांचा श्री.ठक्कर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.  यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक प्राचार्य अतुल दुबे, युवा सेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना उपशहर प्रमुख किशन बुंदेले, शिवसेना माजी शहर संघटक संजय कुकडे, शिवाजी चौक विभाग प्रमुख संजय सोमाने,  शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,  शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी,भारतीय विद्यार्थी सेना उप तालुकाप्रमुख मनीष जोशी, शिवसेना लोणारवाडी सर्कल प्रमुख बबन ढेंबरे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे प्रकाश देवकर, लक्ष्मण

MB NEWS-मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढा : रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना निवेदन

इमेज
  मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढा : रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना निवेदन *औरंगाबाद (प्रतिनिधी)* मराठवाडा हा अत्यंत मागासलेला प्रदेश स्वात़ंत्र्यापूर्वी हैद्राबादस्थित निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतर आणि हैद्राबाद-मराठवाडा मुक्ती संग्रामा नंतर भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा हा प्रदेश महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला होता परंतु या प्रदेशाच्या विकासाचा अनुशेष मात्र अद्याप भरून निघाला नाही त्यामुळे मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढावा,अशा आग्रही मागणीचे निवेदन परळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सरचिटणीस जी.एस. सौंदळे गुरुजी यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सचिन सौंदळे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना औरंगाबाद येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की,आपणास कळविण्यात अत्यंत खेद होतो की,स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी उलटून गेली तरीही लातूररोड ते लातूर दरम्यानच्या केवळ ३३ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाखेरीज एक

MB NEWS-दसरा मेळावा:खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघणार गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅली

इमेज
  दसरा मेळावा: खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघणार गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅली   परळी । दि. ०३ । राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गोपीनाथगड येथून अभूतपूर्व दसरा मेळावा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात रॅली होणार असून मोठ्या संख्येने मुंडे प्रेमींचा सहभाग रॅलीत असणार आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही गोपीनाथगड, सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब भगवान भक्तीगड सावरगाव घाट अशी रॅली निघणार आहे. खासदार प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून गोपीनाथगडाच्या भक्तीचे आणि भगवान बाबांच्या शक्तीचे भव्यदिव्य स्वरूप ‘याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग रॅलीत असणार आहे. ••••

MB NEWS-अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना

इमेज
 प्र आष्टी-मुंबई रेल्वेसेवेसाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना  बीड । दि. ०३ । नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील नगर ते आष्टी हा साठ किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आष्टी रेल्वेस्थानकावर नगर-आष्टी डेमु रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वेसेवेचा विस्तार करून आष्टी ते मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वे सुरू करण्यात यावी अशी पुनःश्च मागणी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट घेतली.बीड जिल्ह्यासाठी रेल्वेची सेवा मुंबई पर्यंत सुरू होणे जेवढे फायदेशीर आहे तेवढेच रेल्वे विभागासाठी देखील फलदायी ठरणार आहे. बीडकरांच्या हिताचा आणि रेल्वेच्या फायद्याचा सारासार विचार करून आष्टीपासून मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वेवाहतूक सुरू करण्यात यावी, रेल्वे हा बीड जिल्ह्यातील प्रत्येकासाठी  जिव्हाळ्याचा विषय आहे अशी मागणी खासद

MB NEWS-*सावरगांव दसरा मेळाव्याचा पंकजाताई मुंडे यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल*

इमेज
  मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे.. पंकजाताई मुंडे  वेळेवर पोहोचा..सुरक्षित पोहोचा.. *सावरगांव दसरा मेळाव्याचा पंकजाताई मुंडे यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल*  बीड । दिनांक ०३। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या सावरगांव येथील दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा  एक व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला आहे."मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे.. भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे..वेळेवर पोहोचा..सुरक्षित पोहोचा.."असं आवाहन त्यांनी तमाम भगवान भक्तगण आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.    या व्हिडिओत पंकजाताईंनी म्हटले आहे, आपला दसरा..आपली परंपरा..कष्टकऱ्यांचा हा दसरा..डोंगरदऱ्यात, कडयाकपारीत राहणाऱ्यांचा हा दसरा..  भगवानबाबांची भक्ती आणि एकजुटीची शक्ती..आपले पावलं आपोआप सावरगांवकडे वळतात.  भगवान भक्तीगडावर दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनासाठी आपण आतुर होतो. इथे पिण्याचं पाणी आहे का? जेवणाची सोय आहे का? रस्ता तिथपर्यंत जातो का? गाडी कुठे थांबवावी लागेल? किती चालावं लागेल...या सगळ्या चिंता आपल्या मनात जराही घर करत नाह

MB NEWS-पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने" डाॅ.संतोष मुंडे सन्मानीत

इमेज
  पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते  "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने डाॅ.संतोष मुंडे सन्मानीत परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक घसा तज्ञ तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते  "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. संतोष मुंडे यांना "आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र" पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.         डॉ. संतोष मुंडे हे परळी वैजनाथसह महाराष्ट्रात गेल्या 14 वर्षांपासून सामाजिक, आरोग्य, दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत. आरोग्याच्या क्षेत्रातही तालुक्यातील प्रत्येक गावात डॉ.मुंडे च्या माध्यमातून आरोग्य व औषध उपचार शिबिर घेऊन गरीब रुग्णांना  मुंबई, पुणे या ठिकाणी विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचार करणे साठी मार्गदर्शन, तसेच मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी असो किंवा अन्य कोणत्याही योजना तुन त्या रुग्णासाठी मदत उपलब्ध करून देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.एवढेच नाही तर,आपल्य

MB NEWS-माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जय हनुमान कॉम्प्लेक्सचे उद्घाटन

इमेज
  माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जय हनुमान कॉम्प्लेक्सचे उद्घाटन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जय हनुमान कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. जय हनुमान कॉम्प्लेक्स उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.            परळी शहरातील नेहरू चौक भागातील श्री नागेश्वर मंदिर समोर जय हनुमान कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आली आहे. जय हनुमान कॉम्प्लेक्सचे राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते  रविवार दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी जय हनुमान कॉम्प्लेक्स चे संचालक काशिनाथ कातकडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जय हनुमान कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार संजय दौंड व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

MB NEWS-*वाढदिवसानिमित्त केला संकल्प; कालरात्री देवीची आरती*

इमेज
  समाजासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहणार-अभयकुमार ठक्कर वाढदिवसानिमित्त केला संकल्प; कालरात्री देवीची आरती *परळी/प्रतिनिधी* वाढदिवस साजरा करू नये असे ठरलेले असतांनाही कार्यकर्त्यांचा आग्रह आपण मोडू शकलो नाहीत. परंतू समाजासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहणे, सर्वसामान्यांच्या मदतीला हात देता येईल असे काम करणे हा आपला वाढदिवसाचा संकल्प असून प्रत्येकासाठी यापुढेही धावत राहील असे मत शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांचा 65 वा वाढदिवस आज 2 ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कार्यकर्त्यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे निमीत्त साधून ठक्कर  यांच्या दिर्घायुष्यासाठी श्री कालरात्री देवीला अभिषेक करून आरती करण्यात आली. यावेळी बोलतांना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, वाढदिवस साजरा करण्याचे तसे पाहता ठराविक असे वय असते. वाढदिवस साजरा करू नये असे मी कार्यकर्त्यांना सांगितले होते परंतू वाढत चाललेला आग्रह लक्षात घेवून मी वाढदिवस साजरा केला. यापुढील आयुष्य पूर्वीप्रमाणेच सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सत्कारणी लावणार असल्याचे त्यांनी स

MB NEWS-गंगासागर नगर ते डोंगर तुकाई दुर्गामाता महादौड परळीकरांचा मोठ्या संख्येने सहभाग

इमेज
  गंगासागर नगर ते डोंगर तुकाई दुर्गामाता महादौड परळीकरांचा मोठ्या संख्येने  सहभाग परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          शहरातील गंगासागर नगर ते डोंगर तुकाई पर्यंत दुर्गामाता महादौड काढण्यात आली. यामध्ये परळीकरांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला. दुर्गामाता महादौडच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.           श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने दरवर्षी   दुर्गामाता महादौडीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी आज रविवारी दुर्गामाता महादौडीचे आयोजन  करण्यात आले होते.यामध्ये युवक,युवती, महिला -पुरुष, लहान मुले आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम्, बजरंंगबली की जय,आई राधा उदो उदो,सदानंदीचा उदो उदो चा जय घोष करीत गंगासागर नगर ते डोंगर तुकाई मंदिर अशी महा दौड  काढण्यात आली.अष्टभुजा देवी गंगासागर नगर येथून दुर्गा माता महादौडीस आरंभ करण्यात आला व  डोंगर तुकाई मंदिर येथे समापन झाले. ठिकठिकाणी स्वागत व ध्वजपुजन करण्यात आले.त्याचप्रमाणे पुष्पवृष्टी करण्यात आली. अतिशय उत्साहात काढण्यात आलेली दुर्गामाता महादौड लक्षवेधी ठरली.

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी परळीत कार्यकर्त्यांची बैठक

इमेज
 पंकजाताई मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी परळीत कार्यकर्त्यांची बैठक मेळाव्याला परळी तालुक्यातून हजारो कार्यकर्ते होणार रवाना ! परळी वैजनाथ ।दिनांक ०२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सावरगांव (ता. पाटोदा)  येथे होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची एक बैठक आज मोठया उत्साहात पार पडली. मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.     दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील मौजे सावरगांव घाट येथे होत आहे. येत्या ५ तारखेला होणाऱ्या या मेळाव्यास महाराष्ट्रातून तसेच विविध राज्यांतून भगवानबाबांचे भक्तगण लाखोंच्या संख्येने येत असतात. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची ही परंपरा पंकजाताई पुढे नेत असल्याने सर्वांनी या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.     बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष  सतीश मुंडे, शिवाजीराव गुट्टे, रमेश कराड, उत्तमराव माने, श्रीराम मुंडे, राजेश गीते, व्यंकटराव कराड, वृक्षराज निर्मळ,

MB NEWS-राष्ट्रीय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज वतीने महिला आरोग्य शिबिर , रक्तगट तपासणी

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजना  वैद्यनाथ कॉलेज वतीने महिला आरोग्य शिबिर , रक्तगट तपासणी    स्त्रींचे आरोग्य सुरक्षित तरच कुटुंब सुरक्षित - डॉ . लक्ष्मण मोरे महिलांनी आपल्या आरोग्याचा सन्मान करावा - डॉ . प्रियंका डोळे  परळी - वै: - राष्ट्रीय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज आणि उपजिल्हा रूग्णालय परळी वै . वतीने  "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियान दि 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे . या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक घरातील माता सुरक्षित ठेवणे असून याद्वारे माता मृत्यू कमी करणे हा आहे या अनुशंगाने ख़ालिलप्रमाने कार्यक्रम राबविन्यात आला यात तालुक्यातील 18 वर्षावरिल सर्व मुलिंची / महिलांची वजन, ऊंची घेऊन शरीर निर्देशांक कमी  (कुपोषित ) असल्यास विवाह उशीराने करने, विवाह झाला असल्यास गरोदरपण टाळने याकरिता समुपोदेशन करने व आहारविषयी मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या हीमोग्लोबिन व इतर तपासणी करण्या आली .  30 वर्षावरील सर्व महिलांची रक्तदाब, मधुमेह व कर्करोग यासाठी तपासणी व उपचारासंदर्भात मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यक्रम उपकेंद्र व प्रा आ केंद्र स्तरावर राबविन्यात आले .  जो

MB NEWS-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ

इमेज
  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ *शिवसेनेत काम करतांना तो कार्यकर्ता नसतो, तर तो असतो सच्चा शिवसैनिक... जो गरजवंतांच्या मदतीला धावतो, आणि शक्य होईल तेवढा मदतीचा हात देत असतो. ही खर्‍या शिवसैनिकाची व्याख्या म्हणता येईल. परळी शहर आणि तालुक्यात मागील 30 वर्षांपेक्षा अधिक कालावधीत शिवसेनेचे विद्यमान बीड जिल्हा उपप्रमुख आणि सध्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर हे सर्वांच्याच ओळखीचे तर आहेतच परंतू एक सच्चा शिवसैनिक अशी सुद्धा त्यांची ओळख राहिलेली आहे. आपल्या राजकिय कारकीर्दीत नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशा पदावर ठक्कर यांनी काम केले असून पक्ष सांगेल ती जबाबदारी अत्यंत निष्ठेने पाळलेली आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक तर आज पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सैनिक म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांच्या एकुण राजकिय व सामाजिक कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सदरच्या लेखातून करीत आहे. आज 2 ऑक्टोबर अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा वाढदिवस असून त्या निमित्तानेच

MB NEWS-माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते फुले चौक येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची आरती संपन्न

इमेज
  माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते फुले चौक येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची आरती संपन्न परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...       परळी शहरातील फुले चौक भागातील प्रसिद्ध जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची आरती दिनांक 30 सप्टेंबर रोजी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाली.        गेल्या 34 वर्षापासून शहरातील फुले चौक या ठिकाणी नवरात्रोत्सवा दरम्यान जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आदिशक्ती, आदीमायेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नवरात्र उत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक तथा बालकलाकार व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन केले जाते. दिनांक 30 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते जय महाराष्ट्र दुर्गा उत्सव मंडळाच्या दुर्गा मातेची महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रथमतः उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत त्यांचे स्वागत केले. यानंतर जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आ. धनंजय मुंडे यांचे आदिशक्त

MB NEWS-दाऊतपूर येथे कै.कोंडीबा देवराव बिडगर यांचे दि.५ रोजी पुण्यस्मरण:ह. भ. प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन

इमेज
  दाऊतपूर येथे कै.कोंडीबा देवराव बिडगर यांचे दि.५ रोजी पुण्यस्मरण:ह. भ. प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन   परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दाऊतपूर येथील माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक कै.कोंडीबा देवराव बिडगर  यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त  ह. भ. प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन होणार आहे. तरी  किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बिडगर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.          परळी तालुक्यातील मौजे दाऊतपूर येथील माजी सरपंच, जेष्ठ नागरिक, सामाजिक, शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व  कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने  अश्विन शु.10 (विजयादशमी) बुधवार दि.5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 ते 1 ह.भ.प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन होणार आहे. परळी तालुक्यातील व शहरातील तसेच पंचक्रोशीतील सर्व गुणीजण महाराज, गायक, वादक, भजनी मंडळी   तसेच ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविकांनी सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी श्री ह

MB NEWS-_नवरात्रोत्सव :परळी माहेश्वरी युवा संघटनेचे आयोजन_

इमेज
  _नवरात्रोत्सव :परळी माहेश्वरी युवा संघटनेचे आयोजन_  *परळीत 'माता की चौकी' भजनांसह रंगणार 'दांडिया जलसा' !* ● *_सुप्रसिद्ध अँकर रोमाची उपस्थिती, सुप्रसिद्ध आरके थिमची नेपथ्य सजावट, राजस्थान हुंन आलेली भजनी मंडळी मुख्य आकर्षण_* परळी वैजनाथ. (प्रतिनिधी) दि.1 - नवरात्र उत्सवानिमित्त परळी माहेश्वरी युवा संघटन तर्फे दांडिया जलसा,माता की चौकी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान चार दिवस या कार्यक्रमाची पर्वणी लाभणार आहे.कार्यक्रमाची सांगता माता की चौकी संगीतमय भजनांचा कार्यक्रमाने होणार असून पं. उत्तम महाराज जोशी यांसह राजस्थान येथील सहकलाकारांची साथ लाभणार आहे.          या संपूर्ण कार्यक्रमात सुप्रसिद्ध अँकर रोमा सूत्रसंचालन करणार असून सुप्रसिद्ध आर के थीम चे नेपथ्य व खास राजस्थानून येणारे भजनी मंडळ या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.अक्षता मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.मंगळवार दि.4 रोजी सायंकाळी 7 वा. माता की चौकी या भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले  आहे.         या दोन्ही कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उ

MB NEWS-शिक्षण क्षेत्रावर येत असलेल्या संकटावर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे-एड.अजय बुरांडे

इमेज
 ★शेतकरी विरोधी ध्येयधोरणा विरोधात कुणब्याच्या पोरा लढाईला शिक- कविवर्य प्रा.इंद्रजित भालेराव ◆शिक्षण क्षेत्रावर येत असलेल्या संकटावर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे-एड.अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी शेतकरी विरोधी ध्येयधोरणे, वास्तविक परिस्थितीत होत असलेली शेतकरी आत्महत्या, अस्मानी व सुलतानी संकट, सरकारचा नाकर्तेपणा या सर्वाविरोधात कुणब्याच्या पोरा आता लढाईला शिक असा उपदेश करीत ग्रामीण भागात दिन-दलित,उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर,ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाची दारे खुली केली.हे कार्य अलोवकीक व  अतुलनिय असल्याचे मत ग्रामीण साहित्यिक, शेतकरी कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले. झुंजार स्वातंत्र्य सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार ,महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संस्थापक कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या 14 व्या स्मृतीदिना निमित्ताने कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा याच्यावतीने महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा या ठिकाणी स्मृती व्याख्यान मालेचे आयोजन शनिवार दि 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.या प्रसंगी ते प्रमुख व्या

MB NEWS-सिरसाळा येथील 1 कोटी रुपयांच्या शादीखान्याचे व पौळ पिंप्री येथील 25 लाखांच्या अण्णा भाऊ साठे सभागृहाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

इमेज
  सिरसाळा येथील 1 कोटी रुपयांच्या शादीखान्याचे व पौळ पिंप्री येथील 25 लाखांच्या अण्णा भाऊ साठे सभागृहाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न सत्ता असो वा नसो, निवडणुकीत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करून दाखवणार - धनंजय मुंडे *पौळ पिंप्री गणातील गणप्रमुख व पदाधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न* परळी (दि. 01) - परळी तालुक्यातील सिरसाळा येथील मुस्लिम समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शादीखाना बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून, या कामाचा आज धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांच्या मागणीनुसार शादीखाना सोबत भोजनगृह, मशिदीला संरक्षक भिंत आदी कामे देखील लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. या कार्यक्रमास बाळासाहेब किरवले, पंचायत समितीचे उपसभापती जानिमिया कुरेशी, राजाभाऊ पौळ, चंद्रकांत कराड, सरपंच राम किरवले, उपसरपंच इम्रान पठाण, चेअरमन संतोष पांडे, व्हाईस चेअरमन नदीम पठाण, सुरेश कराड, देवराव काळे, रघुनाथ देशमुख, अक्रम पठाण, सोमनाथ तांडे, रुस्तुम सलगर बप्

MB NEWS-परळी शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांना धनंजय मुंडेंनी भेट देत केली आरती

इमेज
  परळी शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांना धनंजय मुंडेंनी भेट देत केली आरती परळी (दि. 30) - माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी शहरातील विविध 7 दुर्गा उत्सव मंडळांना भेट देत आरती केली. आपले नेतृत्व आपल्यात नवरात्री उत्सवानिमित्त सहभागी झाल्याचे पाहून स्थानिकांनी मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले.  वटसावित्री नगर, मराठा महासंघ, वडार कॉलनी येथील जिजाऊ माँसाहेब दुर्गोत्सव मंडळ, वेताळ मंदिर येथील भोईराज लक्ष्मी देवी मंदिर, नेहरू चौक येथील वैद्यनाथ दुर्गोत्सव मंडळ, देशमुख गल्ली येथील स्वराज्य जननी मंडळ तसेच फुले चौक येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळ या सर्व ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज देवीची आरती करण्यात आली, यावेळी त्या त्या मंडळांच्या वतीने श्री. मुंडे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून तसेच देवीच्या विविध रुपांच्या प्रतिमा भेट देऊनही धनंजय मुंडे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. 

MB NEWS भोजराज पालिवाल यांच्या वतीने सत्कार*

इमेज
  शिवसेना संपर्कप्रमुख धोंडु पाटील यांच्या हस्ते झाली भवानीनगर दुर्गादेवीची पूजा  परळी/प्रतिनिधी शिवसेनेचे संपर्क प्रमुख धोंडु पाटील यांनी आज शुक्रवार दि.30 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री.पाटील यांचा श्री.पालीवाल यांनी सत्कार केला. शुक्रवार दि.30 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील हे परळी शहरात आले असता त्यांनी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या भवानीनगर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची श्री.धोंडु पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने श्री.पाटील यांचा भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भगवा फेटा घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शिवसेनेचे मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्यासह शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा अतुल दुबे महेश केंद्रे गजराज

MB NEWS-मराठमोळ्या लावणीने जिंकली मने

इमेज
  मराठमोळ्या लावणीने जिंकली मने परळी,(प्रतिनिधी):-श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात गुरुवारी लावण्य तारका हा कार्यक्रम पार पडला.चंद्रमुखी सुंदरा, जरा खाजवा की,जरा सरकून बसा की नीट अशा एका पेक्षा एक सरस आणि ढोलकीच्या थापांचा कडकडाट व सोबतच शिट्टी आणि टाळ्यांचा झालेला निनाद हा लावण्या तारका कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान लावणी महाराष्ट्राची सेवेची कला असून ती आता राज्याच्या बाहेरही पोहोचत आहे असे मत भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांनी व्यक्त केले. लावणीला राजश्रय मिळाला आहे.लावणी महाराष्ट्र सह राज्याबाहेर गेली आहे. असे अनेक कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी मारोती मुंडे यांनी केले. परळी शहरात श्री संत भगवान बाबा दुर्गोत्सवात आयोजित कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन दिवसापासून कार्यक्रमाला स्थानिक व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. फुलचंद कराड हे नेहमीच दर्जेदार कार्यक्रम घेत असल्याने त्यांना व त्यांच्या मंडळाला नागरिकाकडून शुभेच्छा दिल्या जात आह

MB NEWS- *पंकजाताई मुंडे श्रीक्षेत्र माहूरगडावर ; रेणुकामातेचे घेतले दर्शन* *देवस्थान संस्थानच्या वतीनं जोरदार स्वागत*

इमेज
 *पंकजाताई मुंडे श्रीक्षेत्र माहूरगडावर ; रेणुकामातेचे घेतले दर्शन* *देवस्थान संस्थानच्या वतीनं जोरदार स्वागत*  परळी वैजनाथ। दि. ३०। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर जाऊन रेणुकामातेचे दर्शन घेतले. संस्थानच्या वतीनं यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं.    पंकजाताई मुंडे यांनी सकाळी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून गोपीनाथ गडावरील देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्या श्रीक्षेत्र माहूरकडे रवाना झाल्या. सायंकाळी त्यांनी माहूरगडावरील श्री  रेणुकामातेचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचं हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं. तत्पूर्वी माहूर शहरात आगमन होताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. माहूरहून नागपूरकडे जाताना पांढरकवडा येथील देवीचेही त्यांनी दर्शन घेतले.    दरम्यान माहूरकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. ••••

MB NEWS-परळी नगर परिषद डॉ.भालचंद्र वाचनालयाचे ग्रंथपाल रावसाहेब जाधव सेवानिवृत्त

इमेज
  परळी नगर परिषद डॉ.भालचंद्र वाचनालयाचे ग्रंथपाल रावसाहेब जाधव सेवानिवृत्त परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-    परळी नगरपालिकेच्या डॉ.भालचंद्र वाचनालयाचे ग्रंथपाल रावसाहेब जाधव हे दि.30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्तीबद्दल त्यांना वाचनालयाचे कर्मचारी व मित्रपरिवाराने निरोप दिला.    नगर परिषद डॉ.भालचंद्र वाचनालयाचे ग्रंथपाल रावसाहेब जाधव यांनी परळी नगरपालिकेची 39 वर्षे सेवा केली.दि.4 एप्रिल 1984 रोजी रुजु झाल्यानंतर 1989 पर्यंत जकात विभागात,1989 ते 1995 या कालावधीत आवक- जावक विभागात 1996 ते 2003 या कालावधीत नविन नळ जोडणी, 2004 ते 2015 या कालावधीत सहाय्यक भांडारपाल,विद्युत विभागात विभागप्रमुख व 2015 पासुन पासुन डॉ.भालचंद्र वाचनालयात ग्रंथपाल म्हणुन आजपर्यंत सेवा केली.शुक्रवार दि.30 रोजी 58 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.यानिमीत्त डॉ.भालचंद्र वाचनालयात झालेल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास विक्रम देशमुख, राजाराम देशमूख, रमाकांत  कौलवार, भास्करराव पाटील, सिद्धेश्वर मोगरकर, पत्रकार धनंजय आढाव, गोविंद चाडकं, यशवंत चव्हाण, संतोष घुमरे, लालासाहेब जाधव, गिरीश जाधव, नानासाहेब जा