MB NEWS-माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते फुले चौक येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची आरती संपन्न

 माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते फुले चौक येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची आरती संपन्न



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...


      परळी शहरातील फुले चौक भागातील प्रसिद्ध जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची आरती दिनांक 30 सप्टेंबर रोजी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाली.


       गेल्या 34 वर्षापासून शहरातील फुले चौक या ठिकाणी नवरात्रोत्सवा दरम्यान जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आदिशक्ती, आदीमायेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नवरात्र उत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक तथा बालकलाकार व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन केले जाते. दिनांक 30 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते जय महाराष्ट्र दुर्गा उत्सव मंडळाच्या दुर्गा मातेची महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रथमतः उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत त्यांचे स्वागत केले. यानंतर जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आ. धनंजय मुंडे यांचे आदिशक्ती दुर्गामातेची प्रतिमा भेट देत सदस्यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. शहरातील फुले चौक येथील गेल्या 34 वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवाचे आ. मुंडेंनी कौतुक केले.


     याप्रसंगी जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाचे मुख्य मार्गदर्शक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथराव सोळंके राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रभाकरराव देशमुख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वैजनाथराव बागवाले, दुर्गोत्सव मंडळाचे मार्गदर्शक रमेशराव जाधव, शरद चव्हान दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीराम लांडगे, पांडुरंग जाधव, आनंत जाधव, दीपक देशमुख, नरहरी सुरवसे, गणेश शिरसागर, दिनेश परळीकर, तुकाराम वाकडे, माऊली गिराम, सुरेश साखरे, विठ्ठल साखरे, रवी जाधव, नितीन झिरपे, महेश खरोळकर,  स्वप्निल सुरवसे, बाळू देशमुख, बळीराम साखरे, अभिलाष साखरे, ओमकार जाधव, हरी साखरे, उमंजय जाधव आदींसह या भागातील माता - भगिनी, प्रतिष्ठित नागरिक, असंख्य भाविक तसेच भक्त जणांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !