MB NEWS-शिक्षण क्षेत्रावर येत असलेल्या संकटावर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे-एड.अजय बुरांडे

 ★शेतकरी विरोधी ध्येयधोरणा विरोधात कुणब्याच्या पोरा लढाईला शिक- कविवर्य प्रा.इंद्रजित भालेराव



◆शिक्षण क्षेत्रावर येत असलेल्या संकटावर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे-एड.अजय बुरांडे


परळी / प्रतिनिधी


शेतकरी विरोधी ध्येयधोरणे, वास्तविक परिस्थितीत होत असलेली शेतकरी आत्महत्या, अस्मानी व सुलतानी संकट, सरकारचा नाकर्तेपणा या सर्वाविरोधात कुणब्याच्या पोरा आता लढाईला शिक असा उपदेश करीत

ग्रामीण भागात दिन-दलित,उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर,ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाची दारे खुली केली.हे कार्य अलोवकीक व 

अतुलनिय असल्याचे मत ग्रामीण साहित्यिक, शेतकरी कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.


झुंजार स्वातंत्र्य सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार ,महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संस्थापक कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या 14 व्या स्मृतीदिना निमित्ताने कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा याच्यावतीने महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा या ठिकाणी स्मृती व्याख्यान मालेचे आयोजन शनिवार दि 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.या प्रसंगी ते प्रमुख व्याख्याते म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे हे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.संस्थेचे जेष्ठ संचालक कॉ.सुदामदादा देशमुख,प्रा.धुळे सर,कॉ.सुदाम शिंदे,कॉ.मुरलीधर नागरगोजे,कॉ.सखाराम शिंदे,शाळेचे प्राचार्य धनंजय देशमुख आदी या प्रसंगी मंचावर उपस्थित होते.


पुढे व्याख्यानात बोलताना प्रा.भालेराव यांनी आपली देशभर प्रसिद्ध असलेल्या " *शिक बाबा शिक-कुणब्याच्या पोरा आता लढाईला शिक"* या शेतकरी काव्य रचनेचा यथार्थ विशद करीत आपल्या व्याख्यानात शेतकरी पुत्रांनी आपल्या कष्टकरी शेतकरी बापाकरिता शेती विरोधी ध्येय धोरणाविरोधात आता लढाईला शिकणे काळाची गरज बनली आहे.*घेऊ नको फाशी बाबा ,खाऊ नको विष...माग माग नको आता पुढं सरायला शिक* ही काव्यओळी सांगून शेतकरी पुत्रांनी आता बापाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून आपल्या न्याय-हक्कासाठी लढाईला शिकले पाहिजे असे सांगत शेतकरी व शेतकरी पुत्रांना विचार करण्यास प्रवृत्त केले.कम्युनिस्ट व समाजवादी विचाराचे व्यक्ती हे आपल्या स्वतःचा,आपल्या वयाचा,कुटूंबाचा कधी ही विचार न करता ध्येयनिष्ठ,कर्तव्यनिष्ठ, आपल्या विचाराशी बांधील असतात यांचे कार्य चंदनापरी असून स्वतः झिजून ते अपेक्षितांना न्याय मिळवून देत त्यांच्या जीवनात सुगंध निर्माण करतात.आपल्या व्याख्यानात त्यांनी त्यांच्या साहित्याचा विषय असलेल्या शेतकरी व ग्रामीण कविता रचना पैकी *"काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता-माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता* *" शेतामधी माझी खोप-तिला बोराटीची झाप* ही रचना सादर केली. यावेळी लक्षणीय उपस्थित असलेल्या महिला पाहून त्याच्यासाठी *"उभ्या उभ्या आड रात्री- येऊन जाय गं लेकी* ही काव्य रचना सादर केली तर शेवटी समारोप प्रसंगी स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवर आधारित संवेदनशील रचना *"गेली दूरच्या शेताला, पोटा-पाण्याच्या ओढीनं-जीव कामात गुंतला"* काव्य रचना सादर करून समारोप केला.


आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉ.एड.बुरांडे यांनी सांगितले की स्मृतिदिन हा वेळ सोपस्कार, पितृपंधरवडा अथवा श्राद्ध नव्हे तर समाजातील प्रत्येकाला कॉ.अप्पाचा वैचारिक वसा,अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढाईला शिकणे,लोकमानस जोडणे आदींचा उजाळा व्हावा याकरिता ही व्याख्यानमाला आहे असे सांगत महाराष्ट्र शिक्षण संस्था 1960 पासून ते आज पर्यंत गर्मीन भागात बदलत चाललेल्या शिक्षण पध्दतीनुसार शिक्षण देण्याचे कार्य वेळोवेळी करत आहे आणि करत राहणार.आजचे युग हे तंत्रज्ञानाचे असून अशा परिस्थितीत संस्था अटल टिंकरिंग, टॉय बँक या सारख्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य करीत आहे.मात्र या सर्व परिस्थितीत येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून, आपल्या मूळ इतिहासापासून, आपल्या महापुरुषापासून, त्यांच्या कार्यापासून,आपल्या संस्कृती पासून वंचीत ठेवणारे असून या नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात विद्यार्थी, पालक व समाजाने एक होणे काळाची गरज निर्माण झाली आहे मत व्यक्त केले.


शाळेतील शिक्षक ब्रम्हानंद देशमुख यांनी आपल्या व्याख्यानमालेच्या प्रास्ताविकातून संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा वाटचाल,शाळेच्यावतीने राबविण्यात येणारे विविध,शैक्षणिक,सामाजिक,पर्यावरण संवर्धन,अंधश्रद्धा निर्मूलन,आरोग्य विषयक उपक्रमाची माहिती देत.संस्थापक कॉ.अप्पा यांच्या विचारावर केवळ पुस्तकी ज्ञान न देता एक आदर्श नागरिक निर्माण करण्याचे काम शाळेच्यावतीने करण्यात येत असल्याचे सांगितले.या व्याख्यानमालेचे ऋणव्यक्त शाळेचे प्राचार्य धनंजय देशमुख यांनी केले तर सुत्रसंचलन शालेय विद्यार्थिनीं कु.अर्पिता सोळंके व कु.मैथिली राजमाने यांनी केले.


*★क्षणचित्रे★*

●हलकी-संबळ च्या गजरात प्रमुख वक्त्यांचे शाळेपर्यंत स्वागत

●शालेय सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहून दिली मानाची सलामी

●व्याख्यानमालेस महिलांची लक्षणीय उपस्थिती

●कॉ.अप्पाच्या स्मृती स्थळावर पुष्प व हार अर्पण करून व्याख्यानमालेस सुरुवात

●शाळेने राबविलेल्या विविध उपकर्माचे क्षणचित्रे असलेले फ्लेक्स ठरले लक्षवेधी

शाळेत शिक्षण घेतलेल्या व पुढे वैद्यकीय नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशास प्राप्त व आयआयटी प्रवेश परीक्षा पात्र होऊन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !