MB NEWS-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ


*शिवसेनेत काम करतांना तो कार्यकर्ता नसतो, तर तो असतो सच्चा शिवसैनिक... जो गरजवंतांच्या मदतीला धावतो, आणि शक्य होईल तेवढा मदतीचा हात देत असतो. ही खर्‍या शिवसैनिकाची व्याख्या म्हणता येईल. परळी शहर आणि तालुक्यात मागील 30 वर्षांपेक्षा अधिक कालावधीत शिवसेनेचे विद्यमान बीड जिल्हा उपप्रमुख आणि सध्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर हे सर्वांच्याच ओळखीचे तर आहेतच परंतू एक सच्चा शिवसैनिक अशी सुद्धा त्यांची ओळख राहिलेली आहे. आपल्या राजकिय कारकीर्दीत नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशा पदावर ठक्कर यांनी काम केले असून पक्ष सांगेल ती जबाबदारी अत्यंत निष्ठेने पाळलेली आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक तर आज पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सैनिक म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांच्या एकुण राजकिय व सामाजिक कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सदरच्या लेखातून करीत आहे. आज 2 ऑक्टोबर अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा वाढदिवस असून त्या निमित्तानेच हा लेख देत आहोत.*


शिवसेनेचे बीड जिल्हाउपप्रमुख, परळीतील एक भगवे वादळ म्हणून सर्वपरिचीत असणारा व युवकांचे आशास्थान अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा आज वाढदिवस. एक दिलदार मित्र, चतुर राजकारणी व हाकेला प्रतिसाद देणारा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक अशी त्यांची ओळख असणारा सच्चा शिवसैनिक अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा आज वाढदिवस. ठक्कर यांनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम सुरू केले आणि पाहता पाहता त्यांचे कार्य व मित्र परिवार वाढत गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ठक्कर यांची मोठी श्रद्धा आहे. किंबहूना शिवसेनेचा एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या चौफेर कार्याचा परिचय या लेखाद्वारे करून देत आहोत. शिवसेनेचा बाणा, बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारधारेचे नैसर्गिक वर्तन असणारा शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीत पक्षहिताचाच विचार करणारा असतो. पद, प्रतिष्ठा यामागे न लागता शिवसैनिक’ हे महत्त्वपूर्ण पद असल्याचे माननारे आणि त्याच ध्येयाने निष्ठेने शिवधनुष्य पेलणारे कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची शक्ती आहे. या संपर्ण लक्षणांचा समुह असणारे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा असणारा कार्यकर्ता म्हणून व बीड जिल्हयातील शिवसेनेचे नेते म्हणजे अभयकुमार ठक्कर यांच्याकडे पाहिले जाते. अभयकुमार उर्फ  पप्पू ठक्कर या नावाला ओळखण्यासाठी कोणत्याही पदावर असण्याची गरज उरलेली नाही. अभयकुमार ठक्कर हे नाव आले की लगेच-शिवसेनेचेच. हे समीकरण निर्माण झालेले आहे. गेल्या 30 वर्षापासून अविरतपणे शिवसेनेच्या भगव्याखाली एकनिष्ठ ेने काम करीत कार्यकत्यार्ंचे मजबूत संघटन उभे करून अधिकाधिक तरूणांना शिवसेना पक्षाकडे आकर्षित करणारे नेते अभयकुमार ठक्कर आहेत.वयस्कर व्यक्तीनां आपला सहकारी  वाटणारा, वरीष्ठ नेत्यानां प्रमुख शिवसैनिक वाटणारा  मध्यम फळीतील शिवसैनिकांना मार्गदर्शक असणारा, नवनविन कार्यकर्त्यांमध्ये मिळूनमिसळुन त्यांनाही हवाहवासा वाटणारा आपला नेता म्हणजे अण्णा अशी सर्वसमावेशक प्रतिमा सांभाळणारे नेतृत्व हे अभयकुमार ठक्कर यांचे आहे.

प्रसंगी अतिशय आक्रमक, कठोर वाटणारे हे नेतृत्व कार्यकर्त्यांवर, त्यांच्या कुटुंबियावर, संकट आल्यास अतिशय मृदू असल्याचा अनुभव सर्वांना आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्व. मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांनी अभयकुमार ठक्कर यांच्या परळीतील निवासस्थानी भेट देऊन आशिर्वाद दिले ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच.

परळी नगर परिषदेतील शिवसेनेचा पहिला शिलेदार म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली. शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, सभापती होण्याचा बहुमानही अभयकुमार ठक्कर यांनाच मिळाला होता. शिवसेनेच्या  तत्वाप्रमाणे एक शिस्तबध्द सैनिक काम करतो. त्याप्रमाणे पक्षाची 80 टक्के  समाजकारण 20 टक्के राजकारण करण्याची प्रणाली त्यांच्या कार्यातून दिसून येते. पक्षाबरोबर विविध सामाजिक, सांस्कृतिक कामात ते नेहमीच सक्रीय राहीले आहेत. छत्रपती शिवरायांच्या भव्यदिव्य जयंती उत्सवाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम गेल्या 20 वर्षापासून अविरतपणे त्यांनी राबविले. नेहमी संघटनात्मक बाजू भरभक्कमतेने सांभाळण्याची त्यांची हतोटी कौतुकास्पदच आहे. शिवाजीनगर दुर्गोत्सवाचेही अंखडीतपणे आयोजन ते करतात. युवकांना नेहमीचे प्रोत्साहन देणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख या पदावर त्यांनी कार्य क ेलेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वरिष्ठ नेते गण यांच्या आदेशाचे पालन तंतोतंत करताना त्यामध्ये कुठलीही कृत्रिमता त्यांच्या कार्यात नसते हे विशेष.

अभयकुमार ठक्कर हे अफलातून व्यक्तीमत्व आहे. त्यांचे अनेक रूपे मी पाहिली आहेत.  एक कुटुंबवत्सल व्यक्ती प्रमाणे कार्यकर्त्यांत त्यांची ओळख आहे. केवळ शिवसैनिकच नव्हे तर पक्षाबाहेरील व्यापारी छोटे - मोठे व्यावसायीक, सर्वसामान्य नागरिक या प्रत्येकालाच आपलेसे वाटावे असे हे व्यक्तीमत्व आहे. अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करणे हे प्रत्येकालाच आवडते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला उत्तरोत्तर ताकद प्राप्त व्हावी. प्रत्येक कार्यकर्त्याची शक्ती असणार्‍या या नेत्याच्या प्रगतीची क्षीतीजे उंचावत जावून त्या क्षीतीजाखाली हजारो कार्यकत्यार्ंच्या रूपाने उडत्या पाखरांना मागे वळून पाहण्याची किवां परतीची तमा राहू नये तर या नेतृत्वाकडे पाहून क्षीतीजाच्या ही पलीकडे झेप घेण्याची स्फूर्ती मिळत राहावी त्यासाठी अभयकुमार ठक्कर यांना प्रचंड  शक्ती मिळावी हीच वाढदिवसी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना अभयकुमार ठक्कर (अण्णा) यांना वाढदिवसानिमित्त लक्ष - लक्ष शुभेच्छा!-अभिष्टचिंतन-


-अभिष्टचिंतन-

 संतोष जुजगर,परळी वैजनाथ

मो.9860886737

टिप्पण्या

  1. रविभाऊ, आपले खूप खूप धन्यवाद व आभार, छान लेख प्रसिद्ध झाला, अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !