MB NEWS-परळी शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांना धनंजय मुंडेंनी भेट देत केली आरती

 परळी शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळांना धनंजय मुंडेंनी भेट देत केली आरती

परळी (दि. 30) - माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी शहरातील विविध 7 दुर्गा उत्सव मंडळांना भेट देत आरती केली. आपले नेतृत्व आपल्यात नवरात्री उत्सवानिमित्त सहभागी झाल्याचे पाहून स्थानिकांनी मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले. 


वटसावित्री नगर, मराठा महासंघ, वडार कॉलनी येथील जिजाऊ माँसाहेब दुर्गोत्सव मंडळ, वेताळ मंदिर येथील भोईराज लक्ष्मी देवी मंदिर, नेहरू चौक येथील वैद्यनाथ दुर्गोत्सव मंडळ, देशमुख गल्ली येथील स्वराज्य जननी मंडळ तसेच फुले चौक येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळ या सर्व ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज देवीची आरती करण्यात आली, यावेळी त्या त्या मंडळांच्या वतीने श्री. मुंडे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून तसेच देवीच्या विविध रुपांच्या प्रतिमा भेट देऊनही धनंजय मुंडे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!