MB NEWS-मराठमोळ्या लावणीने जिंकली मने

 मराठमोळ्या लावणीने जिंकली मने



परळी,(प्रतिनिधी):-श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात गुरुवारी लावण्य तारका हा कार्यक्रम पार पडला.चंद्रमुखी सुंदरा, जरा खाजवा की,जरा सरकून बसा की नीट अशा एका पेक्षा एक सरस आणि ढोलकीच्या थापांचा कडकडाट व सोबतच शिट्टी आणि टाळ्यांचा झालेला निनाद हा लावण्या तारका कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान लावणी महाराष्ट्राची सेवेची कला असून ती आता राज्याच्या बाहेरही पोहोचत आहे असे मत भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांनी व्यक्त केले. लावणीला राजश्रय मिळाला आहे.लावणी महाराष्ट्र सह राज्याबाहेर गेली आहे. असे अनेक कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी मारोती मुंडे यांनी केले.


परळी शहरात श्री संत भगवान बाबा दुर्गोत्सवात आयोजित कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन दिवसापासून कार्यक्रमाला स्थानिक व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. फुलचंद कराड हे नेहमीच दर्जेदार कार्यक्रम घेत असल्याने त्यांना व त्यांच्या मंडळाला नागरिकाकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.लावण्यतारका हा साटम प्रस्तुत कार्यक्रम गुरुवारी पार पडला. दुर्गा मातेचा जय...वैद्यनाथ प्रभू की जय ...खेळताना रंग बाई होळीचा... ढगाला लागली कळ ....मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा.... अशा एकापेक्षा एक सरस आणि प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या लावण्या यावेळी झाल्या.


फुलचंद कराड यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल बोलताना ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी मारोती मुंडे यांनी कौतुक केले. आपण चांगले कार्यक्रम ठेवले असून सर्वच कार्यक्रम यशस्वी होतील असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात फुलचंद कराड यांनी मी आपली सेवा करण्यासाठीच उभा असून भविष्यात सामाजिक प्रश्न सोडविताना असे सगळे काम व उपक्रम हाती घेणार असल्याचे ते म्हणाले.


     यावेळी साहेबराव फड, मारोतराव आंधळे, सरपंच अनिल गुट्टे, युवा नेते राजपाल कराड, विद्यावर्धिनी विद्यालयाचे जेष्ठ संचालक एम टी मुंडे, माऊली फड, प्रशांत कराड, रवी कराड, नितीन बदने, पिनू मुंडे, गणेश होळंबे,  सत्यपाल कराड, आदीसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !