MB NEWS-_नवरात्रोत्सव :परळी माहेश्वरी युवा संघटनेचे आयोजन_

 _नवरात्रोत्सव :परळी माहेश्वरी युवा संघटनेचे आयोजन_

 *परळीत 'माता की चौकी' भजनांसह रंगणार 'दांडिया जलसा' !*


● *_सुप्रसिद्ध अँकर रोमाची उपस्थिती, सुप्रसिद्ध आरके थिमची नेपथ्य सजावट, राजस्थान हुंन आलेली भजनी मंडळी मुख्य आकर्षण_*



परळी वैजनाथ. (प्रतिनिधी) दि.1 - नवरात्र उत्सवानिमित्त परळी माहेश्वरी युवा संघटन तर्फे दांडिया जलसा,माता की चौकी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान चार दिवस या कार्यक्रमाची पर्वणी लाभणार आहे.कार्यक्रमाची सांगता माता की चौकी संगीतमय भजनांचा कार्यक्रमाने होणार असून पं. उत्तम महाराज जोशी यांसह राजस्थान येथील सहकलाकारांची साथ लाभणार आहे. 

        या संपूर्ण कार्यक्रमात सुप्रसिद्ध अँकर रोमा सूत्रसंचालन करणार असून सुप्रसिद्ध आर के थीम चे नेपथ्य व खास राजस्थानून येणारे भजनी मंडळ या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.अक्षता मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.मंगळवार दि.4 रोजी सायंकाळी 7 वा. माता की चौकी या भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले  आहे.

        या दोन्ही कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष आशिष काबरा,सांस्कृतिक मंत्री सुमित नावंदर,सचिन सारडा,पंकज तापडिया,दिनेश झंवर,तपन मोदानी,शैलेश चांडक,सुरेश पोरवाल, प्रोजेक्ट चेअरमन वेदांत सारडा,डॉ.दर्शन काबरा,राहुल भंडारी,श्री तोतला,अक्षय रांदड,श्रीनिवास लाहोटी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार