इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-श्री. पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा

 श्री.पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा

 सिरसाळा........

येथील श्री. पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात दि. ०३/१०/२०२२ सोमवार रोजी इंग्रजी विभाग व एन एस एस विभागाच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती *"आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस"* म्हणून साजरी करण्यात आली. 

या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. पी. कदम, प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (वैद्यनाथ महाविद्यालय परळी) तसेच महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत जाधव, एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ के एम नागरगोजे, डॉ जी गट्टी व प्रा विक्रम धनवे ई. मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी अभ्यास मंडळाचे' उदघाटन व 'Universal' या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. 

प्रसंगी बोलताना डॉ के एम नागरगोजे यांनी श्री लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

डॉ. विष्णू चव्हाण यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून जगभर आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला आणि इंग्रजांनी चालु केलेली नोकर निर्माण करणारी शिक्षण पद्धती भारतात नको असून "नई तालीम" शिक्षण पद्धती हवी असे मत गांधीजींचे होते, असे विचार माडले.

अध्यक्षीय समरोपात प्राचार्य डॉ. एच. पी. कदम यानी गांधींजीची "नई तालीम" व नविन सुरू झालेले शैक्षणीक धोरण यांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमात इंग्रजी विभागातील गोविंद काळे, श्रीकृष्ण सावंत, अविनाश पवार ई. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अनंत जाधव यांनी, सुत्र संचलन गोविंद पौळ याने, तर आभार प्रदर्शन प्रा. विक्रम धनवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंग्रजी अभ्यास मंडळातील विद्यार्थी व एन एस एस विभागातील विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यर्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!