इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढा : रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना निवेदन

 मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढा : रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना निवेदन



*औरंगाबाद (प्रतिनिधी)*

मराठवाडा हा अत्यंत मागासलेला प्रदेश स्वात़ंत्र्यापूर्वी हैद्राबादस्थित निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतर आणि हैद्राबाद-मराठवाडा मुक्ती संग्रामा नंतर भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा हा प्रदेश महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला होता परंतु या प्रदेशाच्या विकासाचा अनुशेष मात्र अद्याप भरून निघाला नाही त्यामुळे

मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढावा,अशा आग्रही मागणीचे निवेदन परळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सरचिटणीस जी.एस. सौंदळे गुरुजी यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सचिन सौंदळे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना औरंगाबाद येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,आपणास कळविण्यात अत्यंत खेद होतो की,स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी उलटून गेली तरीही लातूररोड ते लातूर दरम्यानच्या केवळ ३३ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाखेरीज एक मीटर लांबीचा देखील नवीन रेल्वे मार्ग या अतिमागास "मराठवाडा" विभागास मिळाला नाही. तर “रेल्वे मार्गांचे पुरेसे जाळं नाही म्हणून चांगले उद्योग धंदे येत नाहीत आणि मोठे मोठे उद्योग येथे नाहीत म्हणून नवीन रेल्वे प्रकल्प नाहीत” अशा दुष्टचक्रात हा अतिमागास मराठवाडा प्रदेश अडकलेला आहे.

मराठवाड्याचे एक सुपुत्र,स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा तेंव्हा ते केंद्रीय मंत्री दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून मराठवाड्यासाठी निदान “नांदेड रेल्वे डिव्हिजन” तरी स्वतंत्ररित्या मिळविले. परंतु रेल्वे मार्गाचे अधिक जाळे आणि पुरेशा प्रमाणात लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या या व इतर बाबतीत हा भाग सतत दुर्लक्षितच राहिला आहे.

वास्तविक पाहता हैद्राबाद-सिकंदराबाद ते मनमाड; आदिलाबाद ते नांदेड; अकोला ते पूर्णा ; परभणी ते परळी वैजनाथ; हैद्राबाद-सिकंदराबाद ते परळी वैजनाथ आणि कुर्डुवाडी ते लातूर रोड इत्यादी रेल्वे मार्ग अंशतः मराठवाडा प्रदेशातून जातात. त्यापैकी केवळ लातूर रोड ते कुर्डुवाडी हाच रेल्वे मार्ग मुंबई स्थित मध्य रेल्वे झोन अंतर्गत सोलापूर रेल्वे डिव्हिजन मध्ये तर उर्वरित सर्व रेल्वे मार्ग हैद्राबाद स्थित दक्षिण मध्य रेल्वे झोन अंतर्गत नांदेड रेल्वे डिव्हिजनच्याच अधिपत्याखाली येतात. परंतु नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत बहुसंख्य गावे मराठी भाषिक असल्याने तेलुगू भाषेचे प्राबल्य असलेल्या दक्षिण मध्य रेल्वे झोनच्या सिकंदराबाद येथील मुख्यालयातील अधिकारी मराठवाडा प्रदेशातील जनतेला नेहमीच सापत्न भावनेने वागवितात. त्यामुळे आपणास व रेल्वे बोर्डास विनंती करण्यात येते की, "कोकण रेल्वे प्राधिकरणा" च्या धर्तीवर स्वतंत्र मराठवाडा रेल्वे झोन अथवा प्राधिकरण मंजूर करून या प्रदेशाच्या विकासाचा अनुशेष भरून काढून उपकृत करावे. सध्या मराठवाडा मुक्ती दिनाचाही अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने सरकारतर्फे ही किरकोळ परंतु रास्त मागणी निश्चित मान्य होईल,हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या निवेदनावर परळी रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सरचिटणीस जी.एस. सौदळे गुरुजी,सचिन सौंदळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या