MB NEWS-सिरसाळा येथील 1 कोटी रुपयांच्या शादीखान्याचे व पौळ पिंप्री येथील 25 लाखांच्या अण्णा भाऊ साठे सभागृहाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

 सिरसाळा येथील 1 कोटी रुपयांच्या शादीखान्याचे व पौळ पिंप्री येथील 25 लाखांच्या अण्णा भाऊ साठे सभागृहाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

सत्ता असो वा नसो, निवडणुकीत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करून दाखवणार - धनंजय मुंडे


*पौळ पिंप्री गणातील गणप्रमुख व पदाधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न*


परळी (दि. 01) - परळी तालुक्यातील सिरसाळा येथील मुस्लिम समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शादीखाना बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून, या कामाचा आज धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांच्या मागणीनुसार शादीखाना सोबत भोजनगृह, मशिदीला संरक्षक भिंत आदी कामे देखील लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.


या कार्यक्रमास बाळासाहेब किरवले, पंचायत समितीचे उपसभापती जानिमिया कुरेशी, राजाभाऊ पौळ, चंद्रकांत कराड, सरपंच राम किरवले, उपसरपंच इम्रान पठाण, चेअरमन संतोष पांडे, व्हाईस चेअरमन नदीम पठाण, सुरेश कराड, देवराव काळे, रघुनाथ देशमुख, अक्रम पठाण, सोमनाथ तांडे, रुस्तुम सलगर बप्पा, गोविंद कराड यांसह मौलाना अमीर साहेब, मौलाना मोईन, मौलाना आलीम साहेब, शेख अख्तर, शेख अखलाख, शेख नासेर, शेख रफिक आदी उपस्थित होते.


तदनंतर पौळ पिंप्री येथील 25 लाख रुपयांच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या बांधकामाचेही धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 


यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत स्थानिक नागरिकांना आपण दिलेल्या प्रत्येक शब्दावर आपण ठाम असून, राज्यात सत्ताह असो वा नसो मात्र दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे म्हटले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'एक तास राष्ट्रवादी साठी' या उपक्रमांतर्गत आज धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पौळ पिंप्री गणाची आढावा बैठक घेण्यात आली. पोळ पिंप्री गणातील विविध गावांमध्ये मागील अडीच वर्षात करण्यात आलेल्या विविध कामांसह धनंजय मुंडे यांनी मागील वर्षी अतिवृष्टी काळात झालेली मदत व यावर्षी सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत केलेला दुजाभाव यावर बोट ठेवले. तसेच गणातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी आगामी ग्रामपंचायत व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ग्रामीण स्तरावर तयारी करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. 


या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक भाऊसाहेब घोडके, प्रभाकरराव पौळ, अश्रुबादादा काळे, शरद पाटील राडकर, राजाभाऊ पौळ, सतीश आचार्य, राजाभाऊ गिराम, चंद्रकांत कराड, रुस्तुमबप्पा सलगर, सरपंच माणिकराव पौळ, खामगावचे सरपंच श्रीराम बडे, राष्ट्रवादी युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड, बालासाहेब गव्हाणे, सुभाष राठोड, दत्तात्रय काळे, वसंत राठोड, वैजनाथ कदम प्रल्हाद गव्हाणे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !