इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना

 प्र


आष्टी-मुंबई रेल्वेसेवेसाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट



अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना 


बीड । दि. ०३ ।

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील नगर ते आष्टी हा साठ किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आष्टी रेल्वेस्थानकावर नगर-आष्टी डेमु रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वेसेवेचा विस्तार करून आष्टी ते मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वे सुरू करण्यात यावी अशी पुनःश्च मागणी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.


छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट घेतली.बीड जिल्ह्यासाठी रेल्वेची सेवा मुंबई पर्यंत सुरू होणे जेवढे फायदेशीर आहे तेवढेच रेल्वे विभागासाठी देखील फलदायी ठरणार आहे. बीडकरांच्या हिताचा आणि रेल्वेच्या फायद्याचा सारासार विचार करून आष्टीपासून मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वेवाहतूक सुरू करण्यात यावी, रेल्वे हा बीड जिल्ह्यातील प्रत्येकासाठी  जिव्हाळ्याचा विषय आहे अशी मागणी खासदार प्रितमताई मुंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.


खासदार प्रितमताई मुंडे यांच्या मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ तोडगा काढण्याच्या सूचना रेल्वे विभागाला दिल्या आहेत.बीड  जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वेची भूमिका महत्वाची असल्यामुळे आपण याबाबत सकारात्मक आहोत असे ही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब  दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थिती होते.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!