MB NEWS-म.सा.प परळी शाखेचा उपक्रम*

 रविवारी 'कविता रंगते कोजागिरी 'त हे निमंत्रितांचे कविसंमेलन



 म.सा.प परळी शाखेचा उपक्रम

परळी वैजनाथ, दि. ०४/ १० / २०२२, (प्रतिनिधी)ः-

मराठवाडा साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने कोजागिरीनिमित्त खास परळीकर रसिकांसाठी ' कविता रंगते कोजागिरी'त या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन रविवार दि. ०९ / १० / २०२२ रोजी सायं . ७ : ० ० वा. ' बन्सल क्लासेस माधवबाग ' येथे करण्यात आले आहे.

 या कविसंमेलनात ज्यांच्या कवितेने रसिकमनात कायमचे घर केले असे चित्रपट कलावंत ,हास्यसम्राट , विनोदाचे बादशहा *नारायण सुमंत ( पिंपळखुंटे - माढा* )* गेय अभिव्यक्ती व हास्याचे फवारे उडवत रसिक मनावर कायम अधिराज्य करणारे *राजा धर्माधिकारी ( परतवाडा )* , '' गोड गळ्याचा व सक्षम काव्यविष्कार असलेले *सखाराम डाखोरे ( मुंबई )* , स्त्री मनाचा सक्षम हुंकार आशय व अभिव्यक्तीच्या अभिन्नतेसह आविष्कृत करणाऱ्या *प्रा.डॉ. प्रतिभा अहिरे (औरंगाबाद) , उत्कृष्ट निवेदक व आपल्या रांगड्या वाणीने रसिक मनावर अमीट छाप उमटवणारे व कवितेच्या प्रांतातही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे * राजेसाहेब कदम ( अहमदपूर )* व ग्रामीण जाणिवांचा सशक्त आविष्कार करणारे *प्रदीप ईक्कर* (मंठा )  हे कवी निमंत्रित करण्यात आलेले आहेत . 

हास्याचे तुषार याबरोबरच अंतर्मुख करायला लावणाऱ्या सामाजिक कविता हे या कविसंमेलनाचा प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण भाग असेल.   विविध रसांची अनुभूती देता देता वाङ्मयीन गुणांनी परिपूर्ण कविता असलेल्या या निमंत्रितांच्या कविसंमेलनात परळी पंचक्रोशीतील बहुसंख्य रसिकांनी उपस्थित राहवे . असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड, कार्याध्यक्ष अनंत मुंडे, उपाध्यक्ष अरुण पवार , कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव , सहसचिव सुनिता कोमावार  ,उपाध्यक्ष चेतना गौरशेटे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी कांबळे  , आबासाहेब वाघमारे , प्रा. मधू जामकर ,प्रा. अर्चना चव्हाण ,सिध्देश्वर इंगोले , मुक्तविहारी ऊर्फ केशव कुकडे, विजया दहिवाळ, प्रा .सुलभा वाघमारे, प्रा .डॉ .राजाभाऊ धायगुडे , बंडू आघाव , ॲड. दत्तात्रय आंधळे, रंगनाथ मुंडे , भवानराव देशमुख, महेश होनमाने, दिवाकर जोशी , लक्ष्मण लाड , गणपत गणगोपलवाड , प्रा .नयनकुमार विशारद, प्रा.डॉ. रा .ज. चाटे , प्रा.डॉ. बापू घोलप  व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !