MB NEWS भोजराज पालिवाल यांच्या वतीने सत्कार*

 शिवसेना संपर्कप्रमुख धोंडु पाटील यांच्या हस्ते झाली भवानीनगर दुर्गादेवीची पूजा 






परळी/प्रतिनिधी


शिवसेनेचे संपर्क प्रमुख धोंडु पाटील यांनी आज शुक्रवार दि.30 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री.पाटील यांचा श्री.पालीवाल यांनी सत्कार केला.

शुक्रवार दि.30 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील हे परळी शहरात आले असता त्यांनी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या भवानीनगर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची श्री.धोंडु पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने श्री.पाटील यांचा भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भगवा फेटा घालून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास शिवसेनेचे मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्यासह शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा अतुल दुबे महेश केंद्रे गजराज पालीवाल प्रकाश साळुंखे हरीश पालीवाल संतोष सावंत विजय जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक युवासैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार