MB NEWS-माजी मंत्री आ.धनंजय मुंडेंनी अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी भेट देत केले अभिष्टचिंतन

 माजी मंत्री आ.धनंजय मुंडेंनी अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी भेट देत केले अभिष्टचिंतन 




*परळी/प्रतिनिधी*


माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी आज सोमवार दि.3 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चा झाली. आ.मुंडे यांनी श्री ठक्कर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

आज सोमवारी सायंकाळी आ.धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आ.धनंजय मुंडे यांचा श्री.ठक्कर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

 यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक प्राचार्य अतुल दुबे, युवा सेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना उपशहर प्रमुख किशन बुंदेले, शिवसेना माजी शहर संघटक संजय कुकडे, शिवाजी चौक विभाग प्रमुख संजय सोमाने,  शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,  शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी,भारतीय विद्यार्थी सेना उप तालुकाप्रमुख मनीष जोशी, शिवसेना लोणारवाडी सर्कल प्रमुख बबन ढेंबरे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे प्रकाश देवकर, लक्ष्मण मुंडे,नवनाथ वरवटकर, शिवम मोहिते, योगेश घेवारे, बजरंन औटी, योगेश जाधव, कारभारी शिंदे, सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह असंख्य शिवसैनिक, युवा सैनिक, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार