पोस्ट्स

MB NEWS-काकडा आरती हाच वारकरी भजनाचा पाया आहे-ह.भ.प. ॲड.दत्ता महाराज आंधळे

इमेज
  काकडा आरती हाच  वारकरी भजनाचा पाया आहे-ह.भ.प. ॲड.दत्ता महाराज आंधळे पुणे (प्रतिनिधी)काकड आरती म्हणजे अविट गोडी देणारी असून  आनंद  सोहळा आहे.काकडाआरती म्हणजे वारकरी भजनाचा पाया आहे असे प्रतिपादन संतवाड्.मयाचे संशोधक  ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.          संत जगमित्रनागा महाराजांची जन्मभूमी पिरंगुट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन काकड समाप्ती निमित्ताने करण्यात आले होते.या वार्षीक सप्ताहातील पाचवे दिवशीचे कीर्तन ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केले.संत जगमित्रनागा महाराजांच्या "हरी जागरासी जावे/माझ्या विठोबाशी पहावे //१//देवॠषी सर्व येती/नभि विमाने दाटती//२//काकड आरती दृष्टी पडे/उठाउठी पाप झडे//३//ऐसा आनंद सोहळा/जगमित्रनागा नागा पाहे डोळा//४//" या अभंगावर अप्रतिम चिंतन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.संतजगमित्र चरित्र लिखाणाची उपलब्धी म्हणजे नंदागौळ येथील विठोबाची टोंगीचे झालेले भव्यदिव्य मंदिर,पावदूका मंदिर, तसेच पिरंगुट येथील प्रशस्त शिलालेख ,दगडी शिल्प व भव्य उंच पुरा स्मृती स्तंभ होय.असे आंधळे महाराज म्हणाले. Click: ● *पहा:सुवर्णकन्येच्या गौरवाची... सुव

MB NEWS-सुवर्णकन्येच्या नेत्रदीपक नागरी सत्कार सोहळ्यात परळीकरांकडून कौतुकाची "श्रद्धा"ओसंडली !

इमेज
  ● *सुवर्णकन्येच्या नेत्रदीपक नागरी सत्कार सोहळ्यात परळीकरांकडून कौतुकाची "श्रद्धा"ओसंडली !*       श्रद्धाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याची  आ.धनंजय मुंडे,पंकजा मुंडे यांच्यासह परळीकरांची ग्वाही श्रद्धाप्रमाणे खेळाडू घडण्यासाठी परळीत भव्य क्रीडांगण उभे करणार - आ.धनंजय मुंडे स्वाभिमान, सन्मान व आत्मविश्वासाचे प्रतिक परळीची लेक ठरली याचा अभिमान- पंकजाताई मुंडे परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....       परळी शहरात राहूनच श्रद्धा प्रमाणे उत्तुंग नावालौकीक करणारे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत असलेले क्रीडांगण लवकरच परळीत उभे राहील. यासाठी नगर परिषदेने आठ एकर जागा आरक्षित केली असून भव्य क्रीडांगण उभे राहणार असल्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले. तर स्वाभिमान  सन्मान व आत्मविश्वासाचे प्रतीक परळीची लेक बनल्याचा आपल्याला अभिमान असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने तिच्यासाठी ब्लँक चेक तयार केला आहे अशी घोषणा भाजपा राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली. सुवर्णपदक विजेती श्रद्धा गायकवाड हिचा तमाम परळीकरांच्या वतीने शानदार

MB NEWS-यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

इमेज
  यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी   परळी वैजनाथ...  भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे साजरी करण्यात आली. Click:-  ● *नागरी गौरव सोहळ्यापुर्वी परळीत श्रद्धा गायकवाडची सत्कार रॅली :ठिकठिकाणी परळीकरांकडून स्वागत.* #mbnews #subscribe #like #share #comments  दिनांक 14 नोव्हेंबर  भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे भारत देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त पंडित जवाहरलाल नेहरूव यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून बाल दिन साजरा करण्यात आला.या वेळी प्रा. यु.एन. फड, प्रा. एस. आर. कापसे,प्रा.ए.डी.शेख, प्रा. पी.पी. परळीकर,.ए.डी.आघाव,व्ही. एन. शिंदे,एस. ए. अष्टेकर, एम.पी.सातपुते, यु.बी.जगताप आदि उपस्थित होते.

MB NEWS-वैद्यनाथ कॉलेजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी  परळी प्रतिनिधी --जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य , डॉ डी व्हि मेश्राम यांनी थोर महापुरुषांच्या जयंती विविध उपक्रम घेऊन साजऱ्या कराव्यात असे मत याप्रसंगी व्यक्त केले. पुढे ते असेही म्हणाले की,14नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो अशी इतिहासामध्ये नोंद आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो कारण पंडित नेहरू यांना लहान मुले जास्त आवडत होते. या कार्यक्रमाला जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक,  प्रा. टी डी देशमुख, प्राचार्य डॉ डी व्हि मेश्राम, डॉ.पी एल कराड, डॉ.बी व्ही केंद्रे, उप प्राचार्य प्रा. एच डी मुंडे डॉ. आर डी राठोड , प्रा.उत्तम कांदे, प्रा. रवी कराड,डॉ. व्हि.एल फड, डॉ. बी.के शेप, डॉ.जे बी कांगणे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षक तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्

MB NEWS-कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' माजी विद्यार्थिनी मेळावा '

इमेज
  महाविद्यालयातील दिवस म्हणजे आनंदाचे क्षण - माजी विद्यार्थिनींच्या भावना  कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' माजी विद्यार्थिनी मेळावा 'संपन्न    परळी , दि 14/11/2022 (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ' माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्येने उपस्थित असलेल्या या मेळाव्यात संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी "माजी विद्यार्थिनी ह्या आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहेत कारण याच विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.आज त्या यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या विद्यार्थिनींनी आमच्या महाविद्यालयाची मान उंचावलेली आहे. "  उद्गगार काढले .  त्याचबरोबर " ज्यांना नोकरी नाही अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल मदत करेल असा विश्वासही त्यांना दिला. " याप्रसंगी प्राचार्य डॉ .एल .एस . मुंडे यांनी माजी विद्यार्थिनी व महाविद्यालयाचे बंध - अनुबंध सांगत कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ. विद्या देश

MB NEWS-मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वैष्णवी कुंभार व चि.अर्जुन काळे यांचे सुयश

इमेज
  मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वैष्णवी कुंभार व चि.अर्जुन काळे यांचे सुयश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा वर्ग 8 वी मध्ये मिलिंद विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी गोपीनाथ कुंभार ही उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र  ठरली आहे. तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये चि.अर्जुन रमेश काळे इयत्ता 9 वी याने द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  आ.धनंजयजी मुंडे साहेब, सहसचिव प्रदीप खाडे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-●#जोशींचीतासिका●पायांना पंख असलेली भारताची स्केटर कन्या

इमेज
पायांना पंख असलेली भारताची  स्केटर कन्या               #जोशींचीतासिका.                                       #जोशींचीतासिका.                         अ सं म्हणतात एखादे चांगले कर्म श्रद्धेने केले तर एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी होता. कदाचित कोणाला आजचे लेखन म्हणजे एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल. पण, जे लिहीत आहे ते एकदम वास्तव आहे. आजची तासिका आहे प्रभू वैद्यनाथाच्या परळीमधील एका सोळा वर्षीय मुलीची; जीचे नावं 'सुवर्ण' अक्षरांनी भारताच्या क्रीडा इतिहासात नोंदले गेले आहे. आता ती एक एक पाऊल टाकत आहे ते ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने; विशेष म्हणजे आजही 'ती' आणि तिच्या कुटुंबाला एक वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. तरीही जिद्दीने ती आत्मविश्वासाने पुढे जात आहे.  Click -संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड* परळी वैजनाथ परिसरात ध्वनीक्षेपावर उद्घोषणा (Mike Announcement) करणारे गायकवाड बंधू सर्वांना परिचित आहेत.

MB NEWS-श्रध्दा गायकवाडने घेतले श्री प्रभु वैद्यनाथाचे आशिर्वाद

इमेज
  परळीची कन्या सुवर्णपदक विजेती कु.श्रध्दा  गायकवाडने घेतले श्री प्रभु वैद्यनाथाचे आशिर्वाद परळी वैजनाथ (प्रतिनिधी):    कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड ने घेतले  आज सोमवार दि. १४ / ११ / २२ रोजी श्री प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.         परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धत स्केट बोर्ड या खेळात सुवर्णपदक पटकविल्या बदल यावेळी वैद्यनाथ देवस्थांन कमिटीच्या वतीने  सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी तीचे पुष्पहार व  वैद्यनाथ प्रतिमा देउन सत्कार केला.यावेळी  रविंद्र गायकवाड, बालासाहेब गायकवाड उपस्थित होते .

MB NEWS-सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावूक पोस्ट

इमेज
  प्रिय कब्बु...'बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत,' सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावूक पोस्ट परळी वैजनाथ:  शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश करून सुषमा यांच्याबद्दल गौफ्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर आपल्या लेक कब्बु हिला एक भावनिक पत्र लिहलं आहे.  हे पत्र त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटला शेअर केलं आहे. त्यांचे हे पत्र फेसबुकवर मोठ्या प्रमाणात वाचले जात आहे. त्याच्यावर जवळपास 10 हजार लाइक्स, 1013 कमेंट्स पडल्या आहेत. तर तब्बल 300 वेळा शेअर केले आहे.सुषमा अंधारे यांनी आपल्या लेकीला लिहलेल्या पत्रात शेवटी भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हंटलेल वाक्याचा एक उदाहरण दिलं आहे. त्यानंतर त्यांनी आई आणि लढा असा हॅशटॅग दिला आहे. असे काय लिहिले आहे सुषमा यांनी त्या पत्रात… वाचा त्यांच्याच शब्दात… सुषमा अंधारे यांचे लेकीला पत्र… वाचा त्यांच्याच शब्दात प्रिय कब्बु, तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंत

MB NEWS-गळफास घेतल्याचा कांगावा केला परंंतु पत्नीनेच पतीचा गळा आवळला : तथ्य आले समोर

इमेज
  गळफास घेतल्याचा कांगावा केला परंंतु पत्नीनेच  पतीचा गळा आवळला : तथ्य आले समोर पत्नीवर खुनाचा गुन्हा; परळी तालुक्यातील घटना परळी -(प्रतिनीधी) दारू पिऊन आलेल्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने दोरीने गळा आवळून पतीचा खून केला आणि त्याने गळफास घेतल्याचा कांगावा केल्याची घटना परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. गेवराई येथे पत्नीने पतीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच परळी तालुक्यातूनही तशीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.  हनुमान उर्फ राजाभाऊ अशोक काकडे (वय ३०, रा. हिवरा, ता. परळी) असे मयत पतीचे नाव आहे. सिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी बुऱ्हाण नसीर शेख यांच्या फिर्यादीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री हनुमान दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नी वैष्णवी हिच्यासोबत त्याचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून घेतला आणि रात्री १ त १.३० च्या दरम्यान दोरीने हनुमानचा गळा आवळला. गळफास घेतल्याचा केला  कांगावा पतीचा खून केल्यानंतर वैष्णवीने सुताची दोरी छताच्या हुकला अडकवली. त्यानंतर दरवाजा उघडून हनुमानने सुताच्या दो

MB NEWS-परळीच्या सुवर्णकन्येचा नागरी गौरव सोहळा: मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
 ● परळीच्या सुवर्णकन्येचा नागरी गौरव सोहळा: मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन *_माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवर अतिथींची लाभणार उपस्थिती_* _*परळीत 'ऑलम्पिकला जाणाऱ्या लेेकीच्या' सत्काराची जय्यत तयारी*_ परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....         परळीच्या कु. श्रद्धा रविंद्र गायकवाड या कन्येनं  अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झालेली आहे.तमाम परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे, हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी परळीत आज सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी या सुवर्णकन्येचा भव्य नागरी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत परळीच्या सुवर्णकन्येचा गौरव होणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.            आज सोमवार, १४ नोव्हेंबर २०२२ दुपारी ४:०० वाजता. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ ये

MB NEWS-वंदनाताई पारसेवार यांच्या नावानं दरवर्षी पुरस्कार देणार - पंकजाताई मुंडे

इमेज
 * वंदनाताई पारसेवार यांच्या नावानं दरवर्षी पुरस्कार देणार - पंकजाताई मुंडे प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमात विविध पुरस्काराचं केलं वितरण परळी वैजनाथ । दिनांक १३। शहरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यात वंदनाताईंच योगदान मोलाचं होतं, त्यांची आठवण सातत्याने येत राहिल, त्यांच्या नावानं दरवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्यांना 'वंदना' पुरस्कार देण्याचा मनोदय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श शिक्षिका दिवंगत वंदनाताई पारसेवार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आर्य वैश्य मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, भागवताचार्य रूपालीताई सवणे, बनवसकर महाराज,  भानुदास वट्टमवार, विकासराव डुबे, नागनाथ पारसेवार आदी यावेळी उपस्थित होते.    शहरातील सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गौरी-गणपती स्पर्धा आम्ही आयोजित करतो, त्यात वंदनाताईंचा नेहमी हिररिने सहभाग असायचा. त्यांची उणीव आम्हाला भासत राहील. त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून त्यांच्या

MB NEWS-100 कि .मी पायीवारी :मनोजअप्पा एस्के यांचा सत्कार

इमेज
  100 कि .मी  पायीवारी :मनोजअप्पा एस्के यांचा सत्कार  परळी वैजनाथ......      नागापूर ते श्रीक्षेत्र कपिलधार अशी शंभर किलोमीटर ची पायी यात्रा यशस्वी करून आल्याबद्दल नागापूर येथील सर्व परिचित मनोज आप्पा एस के यांचा  परळीत सत्कार करण्यात आला. Click &watch: ● *"या कारणामुळे" रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याची चिन्हं.* #mbnews #subscribe #like #share #comments    संत शिरोमणी श्री मन्मथ माऊली यात्रा निमित्त नागापूर ता परळी ते श्री क्षेत्र कपिलधार बीड  येथे 2 ते 6 नोव्हेंबर दरम्यान  आंबाजोगाई चे श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत 100 कि .मी .मध्ये पायी प्रवास केल्या बद्दल  रविवारी मनोज प्रभुअप्पा येस्के यांचे  श्री  वैद्यनाथ मंदिर परिसारत  सत्कार करण्यात आला,यावेळी शास्त्रीजी,सोमनाथअण्णा स्वामी, आश्विन मोगरकर, गोपाळ आंधळे,शिरीष स्वामी आदी उपस्थित होते.                  ------- Video ---------

MB NEWS-आसुबाई विद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश

इमेज
  आसुबाई विद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश परळी / प्रतिनिधी गटशिक्षण अधिकारी कार्यालय परळी वै अंतर्गत योग  शिबिर  तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेचा चि.दीपक प्रकाश मदने याने प्रथम क्रमांक पटकावला तर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मुलींच्या माध्यमिक गटातून  संस्कृती विष्णू नागरगोजे तर मुलांच्या उच्च माध्यमिक गटातून सलगर भागवत लक्ष्मण याने द्वितीय क्रमांक पटकावला यापूर्वी देखील तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा गणित स्पर्धा व विज्ञान  वक्तृत्व स्पर्धा यामध्ये देखील यश मिळवले होते. Click &watch: ● *"या कारणामुळे" रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याची चिन्हं.* #mbnews #subscribe #like #share #comments गुणवत्ता पूर्ण  शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी आसुबाई विद्यालय ही शाळा सतत सहशालेय स्पर्धा क्रीडा स्पर्धा, टॉय बँक, आय सी टी  संगणक प्रशिक्षण या माध्यमातून सतत प्रयत्न करत असते.क्रीडा स्पर्धेच्या  विविध स्पर्धेमध्ये विजय मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव,सर्व  संचाल

MB NEWS-पंकजाताई मुंडेंचा सिरसाळा सर्कलमध्ये झंजावती जनसंपर्क दौरा

इमेज
  पंकजा मुंडेंचा सिरसाळा सर्कलमध्ये झंजावती जनसंपर्क दौरा परळी मतदारसंघाला पुन्हा सोन्यासारखे दिवस आणायचेत सकारात्मक भावनेनं काम करा ; सदैव तुमच्या पाठिशी मागील तीन वर्षांत काय मिळालं याचा आता जनतेनंच विचार करावा -पंकजा मुंडे परळी वैजनाथ । दिनांक१२। राज्यात आता आपली सत्ता आली आहे. २०१४ ते १९ मध्ये जशी चांगली कामे झाली तसे दिवस परत येतील, मतदारसंघाला पुन्हा सोन्यासारखे दिवस आणायचे आहेत. हा मतदारसंघ बिकाऊ नाही तर टिकाऊ आहे हे सिध्द करायचं आहे. सकारात्मक भावनेनं काम करा, मी सदैव तुमच्या पाठिशी आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला आधार दिला. मागील तीन वर्षांत काय मिळालं याचा आता तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे असंही त्या म्हणाल्या.   पंकजाताई मुंडे यांनी आज सिरसाळा व परिसरातील तपोवन, पौळ पिंप्री, मोहा, गाढे पिंपळगाव, कौडगाव साबळा गावांचा जनसंपर्क दौरा केला, त्यावेळी त्या बोलत होत्या. ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचं वाजत-गाजत जंगी स्वागत केलं. तपोवन येथे महादेवाचे दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याची सुरवात केली. Click &watch: ● *"या कारणामुळे" रब्

MB NEWS-गिरवलीत केला डाॅ. कल्याणराव आपेट यांचा एकसष्ठीनिमित्त गौरव

इमेज
 राजकारणात स्वार्थ बाजूला ठेवून लोकांचं हित पाहिलं तरच देशाचं भलं - पंकजाताई मुंडे गिरवलीत केला डाॅ. कल्याणराव आपेट यांचा एकसष्ठीनिमित्त गौरव जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज अंबाजोगाई । दिनांक ११। जैविक शेतीतून जसं चांगलं उत्पादन होतं तसं राजकारणात स्वार्थ बाजूला सारून आणि लोकांचं हित समोर ठेवून काम केल्याशिवाय देशाचं, जगाचं भलं होणार नाही असं प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे केलं. शेती उत्पादन वाढविण्यासाठी जैविक शेतीला सरकारने प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.    गिरवलीचे भूमिपुत्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले विभाग प्रमुख डाॅ. कल्याणराव आपेट यांचा आज गिरवली येथे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकसष्ठी निमित्त हृदय सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते नंदकिशोर मुंदडा तर प्रमुख पाहूणे म्हणून डाॅ. ए. पी. सूर्यवंशी, शामराव आपेट, डाॅ. ठोंबरे, जान मोहम्मद पठाण, गोविंदराव कुलकर्णी, अच्युत गंगणे, राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.  Click &watch: ● *"य

MB NEWS-आपल्यावर जो भुंकतो त्याचे असे हाल करतो असे म्हणत कुत्र्याला बंदुकीच्या गोळ्या घालून मारले ठार

इमेज
   आपल्यावर जो भुंकतो त्याचे असे हाल करतो असे म्हणत कुत्र्याला बंदुकीच्या गोळ्या घालून मारले ठार  परळी-धर्मापुरी मार्गावर असलेल्या एका  धाब्यावर कुत्रा भुंकत असल्याचा कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारल्याची निर्दयी घटना शुक्रवार दि 11 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली असून या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परळी-धर्मापुरी मार्गावर परळी शहरातील एक व्यक्तीचे बियर-बार भाड्याने घेऊन आपली उपजीविका चालविणाऱ्या विकास हरीभाऊ बनसोडे यांच्या हॉटेल वर शुक्रवार दि 11 रोजी सकाळी 11 वाजता आरोपी रामराज कारभारी घोळवे या इसमाने हॉटेल वर असलेली कुत्री भुंकत असल्याच्या कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून निर्दयीपणे ठार मारले.         याप्रकरणी हॉटेलचालक विकास बनसोडे यांच्या फिर्यादीवरून गुरन 272/2022 कलम 428,429 भादवी, कलम 25(3) भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्याचे प्रभारी सपोनि मारोती मुंडे हे करीत आहेत. ---------‐-‐--------------------------------------------- ●  परळीत

MB NEWS-शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  शेतकऱ्याची आत्महत्या केज :- केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  दि. ११ नोव्हेंबर सारणी (सांगवी) ता. केज येथील आश्रूबा भिमराव भांगे वय ((४२ वर्ष) या शेतकऱ्याने मागील वर्षी शेती पिकली नाही आणि यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच बँकेचे कर्ज याच्या विवंचनेतून शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०० पूर्वी त्याच्या शेतातील गट नंबर ६९ मधील घराच्या पाठी मागील बाजूस असलेल्या सुबाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नांदूरघाट दुरुस्थ पोलीस चौकीचे पोलीस नाईक अशोक मेसे हे पुढील तपास करीत आहेत. ---------‐-‐--------------------------------------------- ●  परळीत ब्युटिशियन हवा आहे..........? 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

MB NEWS- सर्वस्व गमावलेल्या दिव्यांग महिलेस परिवर्तन बचत गटाने दिला आधार

इमेज
 सर्वस्व गमावलेल्या दिव्यांग महिलेस परिवर्तन बचत गटाने दिला आधार अंबाजोगाई/प्रतिनिधी जीवन जगणे हा संघर्षच असतो, प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने आणि प्रयत्नांची पराकाष्टा करत संघर्षाला तोंड देत जीवन जगतो. परंतू पावलो पाऊली दुर्घटना घडल्या तर त्याचा दोष द्यायचा कोणाला ? आणि उर्वरित जीवन जगायचे कसे ? हा एक प्रश्नच असतो. ज्याने चोच दिली तो खायलाही देतो या सुविचाराचा प्रत्यय अंबाजोगाईतील एका कुटूंबास आला असून बीडच्या परिवर्तन बचत गटाने त्यांना मोठा आधार दिला आहे.  अंबाजोगाई जि.बीड येथील श्रीमती निता शिवहार होळगे ही महिला दिव्यांग आहे. काही महिन्यांपूर्वीच हॉटेलमध्ये काम करणारा त्यांच्या पतीचे निधन झाले. एका मागून एक घटना घडत असतानाच उद्या जगायचे कसे हा प्रश्न या महिलेवर पडला होता. आपआपल्या परीने लढत असतांना अधुन मधून काही व्यक्ती आधार देत होत्या. परंतू या आधारावर किती दिवस जीवनरथ चालणार हा प्रश्नच होता. या पार्श्वभूमीवर बीड येथील परिवर्तन बचत गटाने या महिलेस मोठी मदत दिली आहे. या मदतीतून तिला आता पुढील काही कालावधी आनंदाने व सुखा समाधानाने जगता येतील थोडक्यात देणार्‍याचे हात लाख मोलाचे असतात

MB NEWS-भाटीया परिवाराच्या वतीने रेल्वेस्टेशन येथे लंगर

इमेज
  भाटीया परिवाराच्या वतीने रेल्वेस्टेशन येथे लंगर  परळी वैजनाथ...            शीख समाजाचे संस्थापक परम पूजनीय श्री गुरूनानकजी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे सचखंड हुजूर साहेब नांदेड गुरुद्वारा येथून कर्नाटकातील बिदरकडे श्री गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त बिदर येथे भरणार्‍या यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने शीख बांधव जातात.या भाविकांसाठी  परळीतील भाटीया परिवाराच्या वतीने लंगरची व्यवस्था रेल्वेस्टेशन येथे करण्यात आली.             शीख समाजाचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशनवर भाटीया यांच्या वतीने प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत भाविकांसाठी  महाप्रसादाचे वाटप रेल्वे स्टेशनवर करण्यात आले. ---------‐-‐--------------------------------------------- ●  परळीत ब्युटिशियन हवा आहे..........? 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

MB NEWS-जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहार प्रकरणी 169 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी

इमेज
  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहार प्रकरणी 169 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी   बीड....  बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणी 2013 साली 169 आरोपी विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.सदरिल प्रकराणातील आरोपी कोर्टात हजर राहत नसल्याने वडवणी न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत.अटक वॉरंट जारी केल्याने वडवणी तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.या प्रकरणातील 3 आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक करण्यात आली आसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे यांनी दिली आहे.        जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधी रुपयांची लुट करून अनेक राजकीय नेत्यांनी आपले घर भरुन घेतले होते.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.आरोपी न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कामकाजात सहकार्य करत नसल्याने वडवणी न्यायालयाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उघडला.व वडवणी तालुक्याती

MB NEWS-सुवर्ण कन्या कु. श्रद्धा गायकवाड यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमास महिला बचत गट उपस्थित राहणार- सौ. कल्पना मस्के

इमेज
  सुवर्ण कन्या कु. श्रद्धा गायकवाड यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमास महिला बचत गट उपस्थित राहणार- सौ. कल्पना मस्के परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आपल्या परळी शहराची कु. श्रद्धा रवींद्र गायकवाड ह्या कन्येने नुकताच झालेला अहमदाबाद येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्केटबोर्ड ह्या क्रीडा प्रकारात स्वर्णपदक पटकावीत अशा ह्या ऐतिहासिक स्वर्ण कन्येचा दिनांक 14 नोव्हेंबर रोजी नटराज रंगमंदिर येथे सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटनेच्या व शासकीय निमशासकीय विभागाच्या भव्य नागरी गौरव सोहळा होणार असून त्या कार्यक्रमास माजी मंत्री आ धनंजय मुंडे , माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.         या कार्यक्रमास परळी शहरातील शंभर बचत गटाच्या महिला आपल्या समूहा सह कार्यक्रमास व सहभागी असून बचत गटाच्या वतीने ही सुवर्ण कन्येचा सत्कार करण्यात येणार आहे.           आपली लेक ह्या नात्याने या सुवर्ण कन्येचा भिमनगर येथून तिची सत्कार रॅली सहभागी होणार असून जास्तीत जास्त इतर अल्पबचत गट विविध महिलानी सहभागी व्हावे असे आवाहन सौ कल्पना मस्के,  सुरेखाताई मस्के,  सारिका बायाळ, आयोध्या कांबळे