इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-आपल्यावर जो भुंकतो त्याचे असे हाल करतो असे म्हणत कुत्र्याला बंदुकीच्या गोळ्या घालून मारले ठार

  आपल्यावर जो भुंकतो त्याचे असे हाल करतो असे म्हणत कुत्र्याला बंदुकीच्या गोळ्या घालून मारले ठार 




परळी-धर्मापुरी मार्गावर असलेल्या एका  धाब्यावर कुत्रा भुंकत असल्याचा कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारल्याची निर्दयी घटना शुक्रवार दि 11 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली असून या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परळी-धर्मापुरी मार्गावर परळी शहरातील एक व्यक्तीचे बियर-बार भाड्याने घेऊन आपली उपजीविका चालविणाऱ्या विकास हरीभाऊ बनसोडे यांच्या हॉटेल वर शुक्रवार दि 11 रोजी सकाळी 11 वाजता आरोपी रामराज कारभारी घोळवे या इसमाने हॉटेल वर असलेली कुत्री भुंकत असल्याच्या कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून निर्दयीपणे ठार मारले.
        याप्रकरणी हॉटेलचालक विकास बनसोडे यांच्या फिर्यादीवरून गुरन 272/2022 कलम 428,429 भादवी, कलम 25(3) भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्याचे प्रभारी सपोनि मारोती मुंडे हे करीत आहेत.

---------‐-‐---------------------------------------------

● परळीत ब्युटिशियन हवा आहे..........?

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट