युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-सुवर्ण कन्या कु. श्रद्धा गायकवाड यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमास महिला बचत गट उपस्थित राहणार- सौ. कल्पना मस्के

 सुवर्ण कन्या कु. श्रद्धा गायकवाड यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमास महिला बचत गट उपस्थित राहणार- सौ. कल्पना मस्के

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आपल्या परळी शहराची कु. श्रद्धा रवींद्र गायकवाड ह्या कन्येने नुकताच झालेला अहमदाबाद येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्केटबोर्ड ह्या क्रीडा प्रकारात स्वर्णपदक पटकावीत अशा ह्या ऐतिहासिक स्वर्ण कन्येचा दिनांक 14 नोव्हेंबर रोजी नटराज रंगमंदिर येथे सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटनेच्या व शासकीय निमशासकीय विभागाच्या भव्य नागरी गौरव सोहळा होणार असून त्या कार्यक्रमास माजी मंत्री आ धनंजय मुंडे , माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 

       या कार्यक्रमास परळी शहरातील शंभर बचत गटाच्या महिला आपल्या समूहा सह कार्यक्रमास व सहभागी असून बचत गटाच्या वतीने ही सुवर्ण कन्येचा सत्कार करण्यात येणार आहे. 

         आपली लेक ह्या नात्याने या सुवर्ण कन्येचा भिमनगर येथून तिची सत्कार रॅली सहभागी होणार असून जास्तीत जास्त इतर अल्पबचत गट विविध महिलानी सहभागी व्हावे असे आवाहन सौ कल्पना मस्के,  सुरेखाताई मस्के,  सारिका बायाळ, आयोध्या कांबळे, रेखाताई सोनकांबळे, पूजा सरवदे, सिमीताबाई वाघमारे,  छाया चौरे, मंदाबाई क्षिरसागर, जया मस्के,अनिता मस्के, संजीवनी आलाट, कमल अलाट सुमन वाघमारे, चंद्रभागा साठे, सविता साठे अनिता रोडगे आदींनी केले आहे.

---------‐-‐---------------------------------------------

● परळीत ब्युटिशियन हवा आहे..........?

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या