इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' माजी विद्यार्थिनी मेळावा '

  महाविद्यालयातील दिवस म्हणजे आनंदाचे क्षण - माजी विद्यार्थिनींच्या भावना



 कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' माजी विद्यार्थिनी मेळावा 'संपन्न


   परळी , दि 14/11/2022 (प्रतिनिधी )

येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ' माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्येने उपस्थित असलेल्या या मेळाव्यात संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी "माजी विद्यार्थिनी ह्या आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहेत कारण याच विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.आज त्या यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या विद्यार्थिनींनी आमच्या महाविद्यालयाची मान उंचावलेली आहे. "  उद्गगार काढले . 



त्याचबरोबर " ज्यांना नोकरी नाही अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल मदत करेल असा विश्वासही त्यांना दिला. " याप्रसंगी प्राचार्य डॉ .एल .एस . मुंडे यांनी माजी विद्यार्थिनी व महाविद्यालयाचे बंध - अनुबंध सांगत कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ. विद्या देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती .याप्रसंगी अंकिता कसबे , अपर्णा जोशी , मयुरी गिते ,चेतना जोशी , शेख नेहा यांनी प्रातिनिधिक पर मनोगत व्यक्त केले. त्यात  "महिला महाविद्यालयातील दिवस म्हणजे आनंदाचे क्षण '' अशा भावना या मनोगतातून त्यांनी व्यक्त केल्या. 



माजी विद्यार्थी या मेळाव्यात एक समिती गठित करण्यात आली त्यात अपर्णा जोशी (अध्यक्ष ) भाग्यश्री माने (उपाध्यक्ष ) अंकिता कसबे (सचिव) वर्षाराणी पाटील (कोषाध्यक्ष) शेख नेहा (सहसचिव) समरीन पठाण,सोनाली गोविंद घोडके , चेतना जोशी , पुनम शहापुरे ,पूजा किशोर पोटभरे,ज्ञानेश्वरी पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमास प्रा.डॉ .पाध्ये आर.आर  ,प्रा.देशपाडे के.बी. ,प्रा .डॉ . आर. एल .जोशी , प्रा.डॉ. वर्षा मुडे , प्रा. आर.बी. कल्याणकर ,प्रा. संगीता कचरे. , प्रा . पवार अशोक ,प्रा .डॉ . गुळभिले विद्या,प्रा. शरद रोडे  व महाविद्यालयातील सर्व  प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड  यांनी केले तर आभारप्रकटन प्रा.डॉ .जोशी आर.एल.यांनी केले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!