प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-वैद्यनाथ कॉलेजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी



 परळी प्रतिनिधी --जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य , डॉ डी व्हि मेश्राम यांनी थोर महापुरुषांच्या जयंती विविध उपक्रम घेऊन साजऱ्या कराव्यात असे मत याप्रसंगी व्यक्त केले. पुढे ते असेही म्हणाले की,14नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो अशी इतिहासामध्ये नोंद आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो कारण पंडित नेहरू यांना लहान मुले जास्त आवडत होते. या कार्यक्रमाला जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक,  प्रा. टी डी देशमुख, प्राचार्य डॉ डी व्हि मेश्राम, डॉ.पी एल कराड, डॉ.बी व्ही केंद्रे, उप प्राचार्य प्रा. एच डी मुंडे डॉ. आर डी राठोड , प्रा.उत्तम कांदे, प्रा. रवी कराड,डॉ. व्हि.एल फड, डॉ. बी.के शेप, डॉ.जे बी कांगणे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षक तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम व्ही पेकंमवार यांनी केले तर आभार प्रा. हरीश मुंडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या