MB NEWS-जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहार प्रकरणी 169 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी

 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अपहार प्रकरणी 169 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी

 


बीड....

 बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणी 2013 साली 169 आरोपी विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.सदरिल प्रकराणातील आरोपी कोर्टात हजर राहत नसल्याने वडवणी न्यायालयाने संबंधित आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत.अटक वॉरंट जारी केल्याने वडवणी तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.या प्रकरणातील 3 आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक करण्यात आली आसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे यांनी दिली आहे. 

      जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधी रुपयांची लुट करून अनेक राजकीय नेत्यांनी आपले घर भरुन घेतले होते.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.आरोपी न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कामकाजात सहकार्य करत नसल्याने वडवणी न्यायालयाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उघडला.व वडवणी तालुक्यातील 169 जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहेत. त्यापैकी तिघांना वडवणी पोलीसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी वडवणी पोलीसांचे पथक रवाना झाले आहे.उर्वरित  आरोपींमध्ये वडवणी तील मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने एैन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.एन.आर.ढाकणे, पो.ह.ए.पी.कापले, पो.ह.ए.बी.तांदळे, पो.ना.ए.एन.अघाव,पो.ना.विलास खरात,पो.ना.अशोक केदार,पो.ना.महेश गर्जे,पो.कॉ.नितिन काकडे यांचे पथक रवाना झाले आहे. 

---------‐-‐---------------------------------------------

● परळीत ब्युटिशियन हवा आहे..........?

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार