MB NEWS-काकडा आरती हाच वारकरी भजनाचा पाया आहे-ह.भ.प. ॲड.दत्ता महाराज आंधळे

 काकडा आरती हाच  वारकरी भजनाचा पाया आहे-ह.भ.प. ॲड.दत्ता महाराज आंधळे



पुणे (प्रतिनिधी)काकड आरती म्हणजे अविट गोडी देणारी असून  आनंद  सोहळा आहे.काकडाआरती म्हणजे वारकरी भजनाचा पाया आहे असे प्रतिपादन संतवाड्.मयाचे संशोधक  ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.

         संत जगमित्रनागा महाराजांची जन्मभूमी पिरंगुट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन काकड समाप्ती निमित्ताने करण्यात आले होते.या वार्षीक सप्ताहातील पाचवे दिवशीचे कीर्तन ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केले.संत जगमित्रनागा महाराजांच्या

"हरी जागरासी जावे/माझ्या विठोबाशी पहावे //१//देवॠषी सर्व येती/नभि विमाने दाटती//२//काकड आरती दृष्टी पडे/उठाउठी पाप झडे//३//ऐसा आनंद सोहळा/जगमित्रनागा नागा पाहे डोळा//४//"

या अभंगावर अप्रतिम चिंतन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.संतजगमित्र चरित्र लिखाणाची उपलब्धी म्हणजे नंदागौळ येथील विठोबाची टोंगीचे झालेले भव्यदिव्य मंदिर,पावदूका मंदिर, तसेच पिरंगुट येथील प्रशस्त शिलालेख ,दगडी शिल्प व भव्य उंच पुरा स्मृती स्तंभ होय.असे आंधळे महाराज म्हणाले.


Click:● *पहा:सुवर्णकन्येच्या गौरवाची... सुवर्ण क्षणचित्रं | 'आपण परळीकर' या सूत्रात परळीकर एकवटले !* _#mbnews #subscribe #like #share #comments_


यावेळी ह.भ.प.पंडीत महाराज क्षीरसागर,सिद्धेश्वर महाराज बागलाणे,सारंग महाराज क्षीरसागर,दशरथ महाराज वहाळ, प्रा. मनोहर भालके, अशोकदिंडीळे महाराज,श्री ज्ञानदेव पवळे,तुषार पवळे, देवीदास पवळे, चांगदेव पवळे,श्री वाघ महाराज आदिंसह पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी कीर्तनास होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !