MB NEWS- सर्वस्व गमावलेल्या दिव्यांग महिलेस परिवर्तन बचत गटाने दिला आधार

 सर्वस्व गमावलेल्या दिव्यांग महिलेस परिवर्तन बचत गटाने दिला आधार



अंबाजोगाई/प्रतिनिधी


जीवन जगणे हा संघर्षच असतो, प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने आणि प्रयत्नांची पराकाष्टा करत संघर्षाला तोंड देत जीवन जगतो. परंतू पावलो पाऊली दुर्घटना घडल्या तर त्याचा दोष द्यायचा कोणाला ? आणि उर्वरित जीवन जगायचे कसे ? हा एक प्रश्नच असतो. ज्याने चोच दिली तो खायलाही देतो या सुविचाराचा प्रत्यय अंबाजोगाईतील एका कुटूंबास आला असून बीडच्या परिवर्तन बचत गटाने त्यांना मोठा आधार दिला आहे. 

अंबाजोगाई जि.बीड येथील श्रीमती निता शिवहार होळगे ही महिला दिव्यांग आहे. काही महिन्यांपूर्वीच हॉटेलमध्ये काम करणारा त्यांच्या पतीचे निधन झाले. एका मागून एक घटना घडत असतानाच उद्या जगायचे कसे हा प्रश्न या महिलेवर पडला होता. आपआपल्या परीने लढत असतांना अधुन मधून काही व्यक्ती आधार देत होत्या. परंतू या आधारावर किती दिवस जीवनरथ चालणार हा प्रश्नच होता. या पार्श्वभूमीवर बीड येथील परिवर्तन बचत गटाने या महिलेस मोठी मदत दिली आहे. या मदतीतून तिला आता पुढील काही कालावधी आनंदाने व सुखा समाधानाने जगता येतील थोडक्यात देणार्‍याचे हात लाख मोलाचे असतात हेच यावरून स्पष्ट झाले. 

यासाठी परिवर्तन बचत गट बीडच्या निनाळ गणेश दत्तात्रय, खडके विनोद शंकरराव, हरिदास सुनील राजाराम, निनाळ प्रविण सुभाष, हरिदास अनिल राजाराम, केचाळे संदीप दिलीप, सरवदे प्रफुल्ल रमेश, निनाळ नितीन सुभाष, दमदाडे वैभव अशोक, डहाके मनोज सुनिल, वास्ते नागेश अंबादास, लकडे प्रितम प्रभाकर यांनी सहकार्य केले.

---------‐-‐---------------------------------------------

परळीत ब्युटिशियन हवा आहे..........?

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !