इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळीच्या सुवर्णकन्येचा नागरी गौरव सोहळा: मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 ● परळीच्या सुवर्णकन्येचा नागरी गौरव सोहळा: मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन



*_माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवर अतिथींची लाभणार उपस्थिती_*


_*परळीत 'ऑलम्पिकला जाणाऱ्या लेेकीच्या' सत्काराची जय्यत तयारी*_



परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....

        परळीच्या कु. श्रद्धा रविंद्र गायकवाड या कन्येनं  अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झालेली आहे.तमाम परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे, हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी परळीत आज सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी या सुवर्णकन्येचा भव्य नागरी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत परळीच्या सुवर्णकन्येचा गौरव होणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

           आज सोमवार, १४ नोव्हेंबर २०२२ दुपारी ४:०० वाजता. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे भव्य नागरी गौरव  सोहळा होणार आहे.माजी मंत्री आ. धनंजय मुंडे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते नागरी सत्कार होणार असून  सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक अंबाजोगाई

श्रीमती कविता नेरकर- पवार, शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त खेळाडू तथा भारतीय खो-खो संघटना सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, अमेरीकेतील एम. आय. टी. विद्यापीठात निवड झालेला भारतातील एकमेव विद्यार्थी आकाश पोपळघट, उपजिल्हाधिकारी सौ.नम्रता चाटे,बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख, तहसिलदार सुरेश शेजुळ, परळीच्या माजी नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे,न.प.प्रशासक तथा मुख्याधिकारी एस.ए. बोंदर, सुप्रसिद्ध साहित्यिक व गझलाकार प्रा. डॉ. मुकूंद राजपंखे, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाकांत कस्तुरे,  संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


         आपल्या परळीतील लेकीच्या कौतुक सोहळ्यास आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी परळीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


लेकीच्या सत्काराची जय्यत तयारी

      दरम्यान, या सोहळ्याची जय्यत तयारी समितीने केली आहे.भव्य दिव्य सोहळा नेत्रदीपक सोहळा होण्याच्या दृष्टीकोनातून सर्वस्तरीय गाठीभेटी,निमंत्रणे,प्रसिद्धी पत्रके वितरण आदी सर्वंकष तयारी करण्यात आली आहे. या नागरी गौरव सोहळ्यापुर्वी सत्कार रॅली निघणार आहे.त्याचबरोबर स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. नेत्रदीपक सोहळ्याच्या दृष्टीकोनातून सर्व तयारी जय्यत करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!