इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वैष्णवी कुंभार व चि.अर्जुन काळे यांचे सुयश

 मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वैष्णवी कुंभार व चि.अर्जुन काळे यांचे सुयश



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा वर्ग 8 वी मध्ये मिलिंद विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी गोपीनाथ कुंभार ही उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र  ठरली आहे.



तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये चि.अर्जुन रमेश काळे इयत्ता 9 वी याने द्वितीय क्रमांक पटकावला.


दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  आ.धनंजयजी मुंडे साहेब, सहसचिव प्रदीप खाडे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....