MB NEWS-●#जोशींचीतासिका●पायांना पंख असलेली भारताची स्केटर कन्या

पायांना पंख असलेली भारताची 

स्केटर कन्या

              #जोशींचीतासिका.                        

              #जोशींचीतासिका.                        


सं म्हणतात एखादे चांगले कर्म श्रद्धेने केले तर एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी होता. कदाचित कोणाला आजचे लेखन म्हणजे एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल. पण, जे लिहीत आहे ते एकदम वास्तव आहे. आजची तासिका आहे प्रभू वैद्यनाथाच्या परळीमधील एका सोळा वर्षीय मुलीची; जीचे नावं 'सुवर्ण' अक्षरांनी भारताच्या क्रीडा इतिहासात नोंदले गेले आहे. आता ती एक एक पाऊल टाकत आहे ते ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने; विशेष म्हणजे आजही 'ती' आणि तिच्या कुटुंबाला एक वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. तरीही जिद्दीने ती आत्मविश्वासाने पुढे जात आहे. 


Click -संबंधित बातमी:■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड*


परळी वैजनाथ परिसरात ध्वनीक्षेपावर उद्घोषणा (Mike Announcement) करणारे गायकवाड बंधू सर्वांना परिचित आहेत. त्यातील बालाजी गायकवाड यांचे लहान भाऊ रवींद्र हे रोजगाराच्या शोधत 2017 साली संभाजीनगरमध्ये गेले. सोबत पत्नी सौ. जयश्री, एक बारा वर्षांची मुलगी (श्रद्धा) आणि लहान लहान तीन मुलं. पण तिथे काही जम बसेना. तीन महिन्यांत सारा कुटुंबकबिला कामाच्या आणि जगण्याच्या शोधात पुणे येथे गेला.


पुण्यातील वाघोली भागात डीकॅथलॉन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून 12 हजार रुपये महिना, दररोज 12 तास ड्युटी रवींद्र रुजू झाले. घरात 6 व्यक्ती त्यामुळे श्रद्धाची आईसुद्धा धुणीभांडी आदी घरकाम करू लागल्या.


              Click -संबंधित बातमी:■ *सुवर्णपदकाचा खडतर प्रवास:परळीच्या भूमिकन्येची खेेळावर 'श्रद्धा' | अन् रचला एक 'सुवर्ण' इतिहास!* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._


डीकॅथलॉनच्या जवळच एका लहानश्या खोलीत श्रद्धाचे कुटुंब रहायचे. सकाळी सात ते साडे बारा अशी शाळा केल्यावर आपल्या वडिलांसाठी श्रद्धा आणि तिचे भाऊ अनुक्रमे विश्वजीत, प्रसनजीत व शिवराज हे डब्बा घेऊन जायचे.


डीकॅथलॉनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ साहित्य नेहमी श्रद्धाला खुणावत असे. कित्येक मुलं ट्रायलसाठी मॉलमध्ये वस्तू हाताळताना, खेळताना बघून श्रद्धाला एक दिवस मोह आवरला नाही. आणि श्रद्धाने स्वतःहून "चार चाकांचा" स्केटबोर्ड पायाखाली घेतला.


             Click -संबंधित बातमी:● *वाचा: एक प्रेरक कहाणी* *_'स्केटर गर्ल' श्रद्धा गायकवाडचा सुवर्णपदका पर्यंतचा खडतर प्रवास_*


नियतीच्या मनात काय असते हे कोणालाच ठाऊक नसते. अगदी स्वप्न पडल्यासारखे पुढे घडत गेले. श्रद्धाने दोन दिवसांत स्केटबोर्डवर बॅलन्स साधला.


Click -संबंधित बातमी:● *परळीची कन्या सुवर्णपदक विजेती कु.श्रध्दा गायकवाडने घेतले श्री प्रभु वैद्यनाथाचे आशिर्वाद*


तिसऱ्याच दिवशी डीकॅथलॉनचे स्टोअर मॅनेजर अबू शेख यांनी श्रद्धाला स्केटिंग करताना बघितले. आणि तिला विचारले तू कोण आहेस? तेव्हा भीतभीत तिने वडील रवींद्र गायकवाड यांचे नावं घेतले. रवींद्रला अबू शेख यांनी बोलावून घेतले आणि "तुझ्या मुलीत जन्मजात कला आहे. तिला प्रोत्साहन दे" असा हक्काने विनंती वजा हुकूम केला.


            Click -संबंधित बातमी:● *परळीत १४ तारखेला 'सुवर्णयोग' !* • *Golden moment on 14th in Parli !* #mbnews #subscribe #like #share #comments


काही दिवस गेल्यावर अबू शेख यांनी श्रद्धाला सहा हजार रुपयांचा स्केटबोर्ड भेट म्हणून दिला. जेव्हा श्रद्धा स्केटबोर्ड घरी घेऊन गेली तेव्हा जेवत असलेल्या वडिलांना धक्काचं बसला. कोणी, कसा काय स्केटबोर्ड दिला असे रागात विचारू लागले. जेव्हा श्रद्धाने हकीकत सांगितली तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू तरळले.


दरम्यान श्रद्धा एकलव्याप्रमाणे यू ट्यूब किंवा इतर माध्यमातून स्केटबोर्ड कला आत्मसात करण्यात मग्न झाली होती. घराजवळच्या बास्केटबॉलच्या कोर्टवर सराव करत होती. काही दिवसांत श्रद्धाने बरीच प्रगती साधली. 


त्यानंतर पुण्यातचं वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ लागली. एका स्पर्धेत पहिला क्रमांक आल्यावर तिच्या आयुष्यात एका द्रोणाचार्यांचा प्रवेश झाला. ते म्हणजे कोच स्वप्नील मगर.


        Click -संबंधित बातमी:● *गौरव परळीच्या सुवर्णकन्येचा : मोठ्या संख्येने उपस्थित राहून साक्षीदार बना.... सुवर्णक्षणांचे!*


बक्षीस समारंभानंतर स्वप्नील मगर यांनी श्रद्धाला विचारले की "तुला प्रशिक्षण कोणी दिलं?" जेव्हा श्रद्धाची कहाणी कळल्यावर त्यांनी तत्काळ तिला विचारले की "पैशांची चिंता नको करू, माझ्याकडे शिकायला येशील का?" श्रद्धाच्या घरी जाऊन मगर सरांनी गायकवाड परिवाराला विश्वासात घेऊन आश्वस्त केले. थोडक्यात, एकलव्य असलेली श्रद्धा आता अर्जुन झाली आणि मगर सर द्रोणाचार्य.


              Click -संबंधित बातमी:_*परळीत 'ऑलम्पिकला जाणाऱ्या लेेकीच्या' सत्काराची जय्यत तयारी*_


मग काय सुरू झाला एक स्वप्नवत पण तितकाच खडतर प्रवास. पुण्याबाहेर पहिली स्पर्धा गाजवली ती 6 ते 8 डिसेंबर 2017 मध्ये बंगलोरला झालेली आंतरराष्ट्रीय 'जुगाड' स्केटबोर्ड चॅम्पियनशिप.


स्पर्धेची प्रवेश फी, जाणे येणे, रहाणे, खाणे पिणे आदी मिळून पंधरा ते वीस हजार रुपयांचा खर्च होता. जो रवींद्र गायकवाड यांच्या कक्षेत नव्हता. तेव्हाचं अचानक हर्षदीप पवार नावाचा एक देवदूत श्रद्धाच्या आयुष्यात आला त्यांनी तिची स्पर्धा फी भरली. तसेच आई सौ. जयश्री यांनी स्वतःचे मणी मंगळसूत्र विकून आणि थोडी बहुत जमापुंजी एकत्र करून मगर सरांच्या भरवश्यावर श्रद्धाला बंगरुळूला पाठवले. मुलीने सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरवत पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवले.


नंतर लॉकडाऊन काळात जग थांबलेले असताना ही पोरगी मात्र वेड लागल्यासारखा सराव करत होती. अर्थात, त्याचे फळ तिला भविष्यात मिळालेच.


यावर्षी RSFI च्या ट्रायल्स मोहाली येथे झाल्या, त्यात पात्र होऊन पुढे अहमदाबाद येथे भारत सरकारच्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मदतीने सहभाग घेतला.


गांधीनगर स्केट पार्क येथे सराव करताना एक दिवस आधी श्रद्धा जखमी झाली, उजव्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी तिला खेळायला मना केली. इतक्या महेतीने बघितलेले स्वप्न साकार होता होता चकणाचूर होणार होते. मुलीने हट्ट धरला आणि 1 ऑक्टोबर 2022 रोजी स्केटबोर्ड पायाखाली घेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.


दरम्यान भारतात पुणे, मुंबई, दिल्ली, मोहाली, बंगरूळू, अहमदाबाद यांसह विविध शहरांत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये स्केटिंग प्रकारांत अनेक पदकं खासकरून सुवर्ण पदक पटकावले आहेत. शिवाय पॅंटीन, पंतांजलीच्या 'परिधान' ब्रँडसह विविध जाहिराती आणि 'स्केटर गर्ल' चित्रपटात महत्त्वाची भूमिका वठवली आहे. इंस्टाग्रामवरही ती ट्रेंडिंगमध्ये असते.


लवकरच ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता फेरीत प्रवेश मिळवून ती भारताचे नावं जागतिक स्तरावर सुवर्णाक्षरांनी उज्ज्वल करेल असा विश्वास समस्त परळी वैजनाथ नगरीला आहे. म्हणून बालदिनाच्या औचित्यावर 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोळा वर्षीय कु. श्रद्धा रवींद्र गायकवाडचा गौरव करत जाहीर नागरी सत्कार होतोय.


'श्रद्धा’ ज्ञान देते, ‘नम्रता’ मान देते,आणि ‘योग्यता’ स्थान देते. पण, जेव्हा हे तिन्ही गुण एकत्रित येतात तेव्हा त्या व्यक्तीला सर्वत्र 'सन्मान' प्राप्त होतो;आणि असाच सन्मान प्राप्त झाला आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या व्यक्तिमत्त्वाला अर्थात 'श्रद्धा रवींद्र गायकवाड'..!


जय हिंद,

अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ

चलभाष क्र : 8983555657

दि. 14 नोव्हेंबर 2022

-------------------------------------------------------

तळटीप : हे सर्व लिहिण्याचा उद्देश म्हणजे श्रद्धाचे कौतुक करणे तर आहेच. पण, यातून फक्त परळी वैजनाथचं नाही तर भारतातील मुलामुलींनी प्रेरणा घेऊन भारताचे भविष्य उज्ज्वल करावे अशी अपेक्षा आहे. सोबतच शासन, प्रशासनाने आणि सामाजिक दायित्व म्हणून आपण सर्वांनी याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. तरच "खेलो इंडिया", "खेलेगा इंडिया जीतेगा इंडिया" ही म्हण वापरायचा आपल्याला अधिकार असेल. बघू आता परळी वैजनाथ नगरीत बहुप्रलंबीत असलेले जागतिक दर्जाचे स्टेडियम कधी होते ते.


#Skating #SkateBoard

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !