पोस्ट्स

MB NEWS:दानशूर दात्यांना नम्र आवाहन!

इमेज
  भगवान श्री शनैश्वर मंदिर जीर्णोध्दारासाठी  दानशूर दात्यांना नम्र आवाहन! परळी वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथ मंदिर पायथ्याशी असलेल्या भगवान श्री शनैश्वर  मंदिराच्या  जीर्णोध्दाराचे काम सर्व दानशूर भाविकांच्या मदतीने  अंतीम टप्यात आले आहे. परंतु शेवटी प्लास्टर, पीओपी ,आणि फरशी चे काम शिल्लक राहिले आहे. तरी दानशूर शनि भक्तांना नम्र विनंती आहे की, या कामासाठी आपण रोख किंवा जमेल त्या साहित्य देऊन आपण मदत करू शकता.  त्यासाठी आपण  चंद्रकांत शंकरअप्पा उदगीरकर  मोबाईल नंबर:-9850730084  संगमेश्वर नागनाथअप्पा फुटके  मोबाईल नंबर:-8208765200 यांच्यासी संपर्क साधावा किंवा  ऑनलाईन देणगी साठी बॅंक खात्याचा तपशील खालील प्रमाणे  श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमेटी  स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परळी वैद्यनाथ  खाते नं.:-62115610063  IFSC Code :-SBIN0020030   भगवान शनैश्वर आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करो हीच प्रार्थना.  धन्यवाद!

MB NEWS:मालेवाडी येथील गुट्टे व बदने कुटुंबियांचे खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी केले सांत्वन

इमेज
  मालेवाडी येथील गुट्टे व बदने कुटुंबियांचे खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी केले सांत्वन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :-  परळी तालुक्यातील मालेवाडी येथे गुट्टे व बदने कुटुंबियांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट घेऊन दोनही कुटुंबियांचे सांत्वन केले.         मालेवाडी येथे भास्कर राम गुट्टे  व कै. रुक्मिणी बाळासाहेब बदने यांचे दुःखद निधन झाले होते. गुट्टे व बदने दोन्ही कुटुंबियांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. यावेळी माजी सरपंच भुराज बदने व इतर उपस्थित होते.

MB NEWS:दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं.समिती यांच्या संयुक्त विद्यमाने

इमेज
  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं.समिती  यांच्या संयुक्त  विद्यमाने 12 ते14 जानेवारी 50 वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित 2022-23 प्रदर्शनाचे आयोजन तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी होण्याचे  आवाहन  परळी प्रतिनिधी ;  शहरातील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे पन्नास वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार असून याबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयातुन तालुक्यातील सर्व शाळांना विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी ८ :३०ते ११ दरम्यान या प्रदर्शन ची नोंदणी व मान्य होणार असून दुपारी १२:३० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे तसेच एक ते पाच दरम्यान प्रदर्शनी वस्तू व उपक्रम पाहण्यासाठी खुले होणार आहेत. सविस्तर माहिती अशी की शहरातील बीड रोड येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे 12 ते 14 जानेवारी दरम्यान ५०  व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार असून या विज्ञान गणित प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी ठीक 12:30 होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा   सौ.उषाताई किरण गि

MB NEWS-परळी तालुक्यातील परचुंडीचा सर्वेश बनला इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर

इमेज
  परळी तालुक्यातील परचुंडीचा सर्वेश बनला इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      तालुक्यातील परचुंडी येथील मूळ रहिवासी असलेला सर्वेश नावंदे हा इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून रुजू झाला आहे.          चि. सर्वेश  सुभाष नावंदे  मुळगाव परचुंडी ता परळी हा  हैदराबाद येथील ट्रेनिंग संपवून इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणजे पायलट म्हणून 2 जानेवारी २०२३ रोजी रुजू झाला आहे . त्याच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे. अल्पपरिचय..... ●सर्वेश सुभाष नावंदे  स्टॅंडर्ड फर्स्ट टू ट्वेलव्ह व्हीं पी एम एस स्कूल, पुणेमॉडन कॉलेज गणेश खिंड येथे बीएससी मॅथ्स डिग्री घेतली. ते करत असतानाच त्याने पहिल्याच वर्षी एनसीसी हेडकॉटर, बालभारती समोर एस बी रोड, येथे एनसीसीसाठी ऍडमिशन घेतले. बीएससी मॅथ्सच्या सेकंड इयरला असताना त्याची आर डी सी ( रिपब्लिक डे कॅम्प ) साठी महाराष्ट्राच्या टीममध्ये बेस्ट कॅडेट एअर विंग म्हणून निवड झाली. त्यानंतर औरंगाबाद येथे तीन महिन्याचा प्री आर डी सी कॅम्प केला व दिल्लीमध्ये 26 जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाराष

MB NEWS:सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात

इमेज
  विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व कौशल्याला वाव देण्याचे कार्य स्नेहसंमेलनातून:अभिनेत्री कोमल सोमारे सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात   (परळी प्रतिनिधी):- येथील परिवर्तन युवा मंच संचलित सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन कलर्स मराठी फेम, सुप्रसिद्ध सिने-नाटय अभिनेत्री कोमल सोमारे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षस्थानी  उपशिक्षणाधिकारी (प्राथ) हिरालालजी कराड, तर प्रमुख अतिथी म्हणून आयआयबी लातूरचे संचालक चिराग सेनमा,सभापती बालाजी(पिंटू)मुंडे, माजी प्राचार्य जी. एस. सोंदळे,शिक्षण विस्तार अधिकारी( पं. स.)हिना उमर  अन्सारी , ,माउली मुंडे,(पं स.सदस्य )प्रसिद्ध सिने-नाटय अभिनेता दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे,रामकिशन मुंडे,प्रा. वैभव स्वामी, ज्युनिअर चार्ली  यांचेसह सनराईजचे संचालक गोविंदराव मुंडे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र चाटे,सचिव सौ. प्रियतमा मुंडे, प्राचार्य ए. एस. रॉय फुलचंद मुंडे , उद्धव कराड, आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून  कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व कौशल्य

MB NEWS:आडस परिसरातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आडसकरांची तहसील दरबारी पायी दिंडी

इमेज
  विमा कंपनी आणि सरकार विरोधी घोषणा देत शेतकऱ्यांची पायी दिंडी आडस परिसरातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आडसकरांची तहसील दरबारी पायी दिंडी केज :- केज तालुक्यातील आडस आणि परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदानाच्या मागणुलीसाठी शेकऱ्यांनीथील सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर यांच्या नेतृत्वाखाली आडस ते केज अशी पायी दिंडी काढून तहसीलदारांना मागण्यांच्या निवेदनाचे गाठोडे सुपूर्त केले. या बाबतची माहिती अशी की, आडस ता केज येथील शेतकऱ्यांनी बुधवारी दि. ११ सकाळी ८:०० वा. शेतकऱ्यांच्या पीक विमा अनुदानाचे वैयक्तिक तक्रार अर्जाचे गाठोडे डोक्यावर घेऊन बंडी आणि अर्धी चड्डी अशा अर्ध नग्न पेहरावात सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुस्कर यांच्या नेतृत्वाखाली आडस येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळंबआंबा, चंदन सावरगाव, कुंबेफळ, ढाकेफळ मार्गे तहसील कार्यालय, केज असे २५ कि.मी. पायी जाऊन तहसील प्रशासनाला तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले. तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी त्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी रमेशराव आडसकर, भाई मोहन गुंड, शिवसेनचे रत्नाकर शिंदे, प्रा हनुमंत सौदाग

MB NEWS:शेतकरी अगोदरच अडचणीत ; मग त्यांचा विमा थांबवता कशाला ?

इमेज
  शेतकरी अगोदरच अडचणीत ; मग त्यांचा विमा थांबवता कशाला ? तातडीने विमा अदा करण्याची पंकजाताई मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बीड  ।दिनांक ११। अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेतकरी अगोदरच अडचणीत असताना त्यात पुन्हा विमा मिळण्यासाठी त्यांना कंपन्यांकडून आडकाठी आणली जात आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांचा विमा थांबविण्याचे कारण काय? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.      पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात एक ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याकडे लक्ष वेधले आहे. "बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम विमा कंपनीने थकवण्याचे कारण काय ? नियमाने ऑनलाईन पीक विमा भरून देखील अतिवृष्टीच्या अडचणींचा सामना करत असताना शेतकऱ्यांचा विमा थांबवणे शंभर टक्के अयोग्य आहे.विमा कंपनीला मा. मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांची विम्याची रक्कम त्वरित अदा करण्यास सांगावे." असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे. ••••

MB NEWS: ● चिंतनिय लेख:रस्त्यांची ऐशीतैशी......!

इमेज
  रस्त्यांची ऐशीतैशी...... ब र्‍याच दिवसांनी स्वतःची गाडी घेऊन सहकुटुंब पुण्याला जाण्याचा योग आला. कोणत्या मार्गाने जायचे यासाठी मित्रांकडे विचारणा केली असता परळी - बीड - अंमळनेर - नगर - पुणे असे जायचे ठरले. तसे परळीहून पुण्यास जाण्यासाठी जामखेड, पाथर्डी मार्गे जाता येते पण रस्त्याची दुर्दशा पाचवीला पुजलेली म्हणून यातील बर्‍या अशा अंमळनेर मार्गे जाण्याचे ठरवले. दुपारी 1.00 वा. निघून रात्री उशीरा (बीड ते अंमळनेर फाटा रस्ता खराब असल्यामुळे) पुणे येथे सुखरूप पोहोचलो.  दुसर्‍या दिवशी तेथील कामे आटोपून निघण्यास उशीर झाला. सौ. सोबत असल्यामुळे आणि रस्ता वळणाचा, घाटाचा असल्यामुळे आणि रहदारीचा नसल्यामुळे अंमळनेर रोडने रात्रीचा प्रवास टाळावा असा निर्णय घेतला. मग राहिले पाथर्डी मार्ग आणि जामखेड मार्ग. दोन्हीही रस्ते खराबच, परंतु रात्रीची वेळ आणि रहदारी असते म्हणून जामखेड मार्गे बीड जाण्याचे ठरविले. नगर संध्याकाळी 6.30 वा. सोडले. टाकळी काझी गावापासून अंमळनेर फाटा आल्यावर त्या मार्गे जाण्याची इच्छा झाली पण सौ सोबत असल्यामुळे हिम्मत झाली नाही. जामखेड मार्गे प्रवास सुरू केला. चिचोंडी पाटील च्या पुढ

MB NEWS:राजमाता जिजाऊ जयंती निमित्त संगम येथे दि.१२ रोजी राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळा

इमेज
  राजमाता जिजाऊ जयंती निमित्त  संगम येथे दि.१२ रोजी राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळा परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       राजमाता जिजाऊ जयंती निमित्त संगम येथे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व समाज कार्यात सक्रीय सहभाग असणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक :- ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, अ.भा. वारकरी मंडळ) यांनी दिली आहे.         राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळा संगम येथे दि.१२ जानेवारी रोजी सायं.६ वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप बँकेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, जेष्ठ नेते वैजनाथ सोळंके,ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्र.पोलीस निरीक्षक मारोती मुंडे,जागृती ना.पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.शोभाताई गंगाधर शेळके, राजाभाऊ गिराम, नगरसेविका शोभाताई भास्करराव चाटे,सरपंच अच्युत चव्हाण, उपसरपंच निलाबाई कामाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वा. रा

MB NEWS:बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा पकडला

इमेज
    बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा पकडला बीड : येथील स्थानिक गुन्हे शाखेने आज मंगळवारी ( दि. १० ) पहाटे मोठी कारवाई करत बेकायदेशीर गावठी कट्टा ( पिस्तुल ) बाळगणाऱ्या पर जिल्ह्यातील तरुणाला मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई बीड-गेवराई रस्त्यावर पाडळसिंगी जवळ केली. मंगळवारी ( दि. १० ) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गुप्त खबऱ्या मार्फत एलसीबी ला माहिती मिळाली की, बीड-गेवराई रस्त्यावर पाडळसिंगी जवळील उड्डाण पूलाखाली एक तरुण संशयास्पद पने थांबलेला असून त्याच्या कमरेला पिस्तुल आहे. माहिती मिळताच LCB अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा उड्डाण पूलाखाली एक तरुण उभा होता. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसत होत्या. जवळ जाऊन त्यास नाव गाव विचारताचा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यास मोठ्या शिताफीने पकडले. त्याच्याजवळ गावठी पिस्तूल किंमत ३७ हजार मिळून आले. त्यास नाव गाव विचारले असता त्याने जुबेर शफीक आतार ( वय २७ वर्ष ) रा. जयभवानी चौक पाथर्डी ( ता. पाथर्डी जि. अहमदनगर ) असे सांगितले. आरोपीस गेवराई पोलीसांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार

MB NEWS:विराटचे नवे रेकॉर्ड! सचिन तेंडुलकरच्या ‘या’ महाविक्रमाशी केली बरोबरी

इमेज
  विराटचे नवे रेकॉर्ड! सचिन तेंडुलकरच्या ‘या’ महाविक्रमाशी केली बरोबरी         Virat Kohli New Record :  भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे तर एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक ठोकले. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने 80 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. याचबरोबर रन मशिन विराटने पुन्हा एकदा एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. या शतकासह विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. कोहली आता श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीचे हे श्रीलंकेविरुद्धचे 9वे शतक आहे. त्याने सचिन तेंडुलकरला (8 शतके) मागे टाकले आहे. भारत विरुद्ध श्रीलंका वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज 48 वन डे सामन्यांमध्ये 9 शतके : विराट कोहली 84 वन डे सामन्यांमध्ये 8 शतके : सचिन तेंडुलकर 89 वन डे सामन्यांमध्ये 7 शतके : सनथ जयसूर्या 37 वन डे सामन्यांमध्ये 6 शतके : गौतम गंभीर 46 वन डे सामन्यांमध्ये 6 शतके : रोहित शर्मा

MB NEWS:दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने लातूर येथे श्रीराम कथा; भाविक भक्तांची मोठी उपस्थिती

इमेज
  ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनी समाजाची नाडी धरून युगाला नवी दिशा दिली-सुश्री श्रेया भारतीजी दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने लातूर येथे श्रीराम कथा; भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लातूर/ प्रतिनिधी गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या  वतीने ५ ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या पाठीमागील ग्राउंड मध्ये सात दिवसीय भव्य श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री राम कथेच्या पाचव्या दिवशी प.पु. सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपा पात्र शिष्य सुश्री श्रेया भारतीजींनी प्रभू श्रीरामचंद्र व भरत यांच्यातील प्रसंग, सुखी जीवनाचा मार्ग तसेच प्रभू श्रीरामचंद्रजींच्या क्रांतिकारी कार्याविषयी माहिती दिली. जेव्हा-जेव्हा या पृथ्वीतलावर महान व्यक्ती येतात तेव्हा ते समाजाला सुंदर बनवण्याचे व्रत घेतात.समाज बदलण्यासाठी, ते सुधारण्यासाठी, ते तयार करण्यासाठी.त्याचप्रमाणे सर्वश्री सद्गुरु आशुतोष महाराजजींनीही समाज बदलण्याचे व्रत घेतले.  भरकटलेल्या तरुणांना महाराजजींनी योग्य मार्ग दाखवला. कथाव्यास यांनी सांगितले की जेव्हा जेव्हा जग

MB NEWS-महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष' प्रकरणाची सुनावणी "व्हॅलेंटाईन डे" ला

इमेज
  महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाची सुनावणी "व्हॅलेंटाईन डे" ला   महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी थेट 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे काय होणार? याबाबत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून असलेली उत्सुकता अद्यापही कायम राहिली आहे.    महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी थेट 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे काय होणार? याबाबत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून असलेली उत्सुकता अद्यापही कायम राहिली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत तारीख पुढे ढकलण्याशिवाय विशेष काही घडले नाही. कोर्टाने सुनावणीच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूंना विचारले की, या प्रकरणाची सुनावणी येत्या 14 फेब्रुवारीपासून नियमीत घ्यायची का? यावर दोन्ही बाजूंनी संमती दर्शवण्यात आली.

MB NEWS:जानेवारीअखेर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार शक्य; शिंदे गटाच्या वाट्याला २ मंत्रिपदे शक्य

इमेज
  जानेवारीअखेर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार शक्य; शिंदे गटाच्या वाट्याला २ मंत्रिपदे शक्य नवी दिल्ली  :  वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात असून, शिंदे गटाला यापूर्वी शिवसेनेच्या वाट्यातील दोन मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या कुठल्या खासदाराची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदलासह विस्ताराची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी मदत करणाऱ्या शिंदे गटाला मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये हा अंतिम फेरबदल जानेवारी अखेरीपर्यंत कधीही होऊ शकतो. महाराष्ट्रात शिवसेनेला खिंडार पाडून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी जी आश्वासने दिली होती त्यात केंद्रातील दोन मंत्रिपदांचाही समावेश होता, असे सांगितले ज

MB NEWS: ’कृष्णार्पणमस्तू’ गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशन

इमेज
 डॉ.दि.ज.दंडे यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ-डॉ.सौ.वृषाली किन्हाळकर ’कृष्णार्पणमस्तू’ गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशन; परळी शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती परळी/प्रतिनिधी एक क्षणभर थांबून आपण विचार करायला हवा की, आपल्याला कसे जगायचे आहे. आपल्याला हवे असलेल्या अनेक गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. जेंव्हा तुम्ही त्या सोडाल त्या गोष्टी तुमच्याकडे स्वतःहून येतील. तसे पाहता आयुष्यात पाहिजे असलेल्या सर्व सुख पदरात पडले तरीही आबांनी जगण्यासाठी स्वतःची वेगळी वाट तयार केली. भयमुक्त आणि चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी आबांनी अनेक प्रकारच्या भौतिक गोष्टींचा त्याग केला असून आबांचे जीवन हा केवळ ग्रंथापर्यंतचा मर्यादित विषय नाही तर त्यांनी जगलेले दिवस आपण अनुभवावे आणि आयुष्याची वाट सुखकर करून घ्यावी असे मत जेष्ठ साहित्यीक डॉ.सौ.वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले. परळी येथील जेष्ठ डॉ.दि.ज.दंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या ’कृष्णार्पणमस्तू’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात डॉ.सौ.वृषाली किन्हाळकर बोलत होत्या. दीनदयाळ बँकेचे माजी अध्यक्ष स्व.डॉ.दि.ज.दंडे य

MB NEWS:येत्या 48 तासांत या जिल्ह्यात थंडीची लाट, हवामान खात्याचा इशारा

इमेज
  येत्या 48 तासांत या जिल्ह्यात थंडीची लाट, हवामान खात्याचा इशारा देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. दिल्लीचे तापमान सोमवारी 1 डिग्री सेल्सिअस होते. त्यामुळे राजधानी दिल्लीत 8 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या शाळांना आता आणखी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई :  उत्तरेकडील राज्यात तापमानाने  ( Temperature )  किमान पातळी गाठल्याने थंडीचा कहर  ( cold wave)  असताना विशेषत : राजधानी दिल्ली  ( delhi )  थंडीने गारठून गेल्याने शाळा बंद ठेवण्याची नौबत आली आहे. तर महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा वेध शाळेने दिला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट ते तीव्र शीतलहरेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळे हुहहुडी चांगलीच वाढली आहे. मुंबईत मात्र किमान तापमान  22 इतके नोंद झाले आहे. दोन आठवड्यापूर्वी कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाच्याखाली गेले होते.  मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्यानं थ

MB NEWS:स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह: रांगोळी व मेहंदी स्पर्धा ;क्रीडा महोत्सवाचेही उद्‌घाटन

इमेज
  स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह: रांगोळी व मेहंदी स्पर्धा ;क्रीडा महोत्सवाचेही उद्‌घाटन  परळी, दि.०९/०१/ २०२३ (प्रतिनिधी)    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिसमारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अंतर्गत आज दि.०९ / ०१ / २०२३ रोजी मेहंदी व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शालेय व महाविद्यालयीन गटामध्ये संपन्न झालेल्या या दोन्हीही स्पर्धेत परळी पंचक्रोशीतील विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस असा सहभाग नोंदवला.रांगोळी स्पर्धेत सामाजिक संदेश देणाऱ्या अप्रतिम अशा रांगोळी स्पर्धाकांनी रेखाटल्या.त्यात पर्यावरण संरक्षण , बेटी बचाव , प्लॅस्टिक मुक्ती , पाणीबचत , आरोग्य संपदा अशा विविध विषयावर रांगोळी काढण्यात आल्या. ज्या लक्षवेधी स्वरूपाच्या होत्या.मेहंदी स्पर्धेतही परळी पंचक्रोशीतील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.     वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे उद्घाटनही रांगोळी व मेहंदी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्

MB NEWS:परळी औ.वि.केन्द्राचे कल्याणधिकारी दिलीप वंजारी याचा नागपूर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक

इमेज
  परळी औ.वि.केन्द्राचे कल्याणधिकारी दिलीप वंजारी याचा नागपूर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक परळी (प्रतिनिधी)  औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांना नागपूर मँरेथान मध्ये प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल दिलीप वंजारी यांचे अभिनंदन होत आहे.  येथील औ.वि.केन्द्राचे कल्याण अधिकारी दिलीप वंजारी हे सायकलपटू असून सातत्याने विविध स्पर्धेत भाग घेत असतात.   राज्याची उपराजधानी नागपूर येथे दि ८ जाने २०२३ रोजी मॅरॅथॉन स्पर्धेत सहभागी होवून ४२.२१ कि.मी. हे अंतर केवळ  ४ तास ८ मी आणि २ सेकांदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला. याबदल त्यांचे सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मान करण्यात आला. याबद्दल दिलीप वंजारी यांचे कौतुक होत आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अरविंद येरणे, प्रा प्रवीण फुटके, इंजि भगवान साकसमुद्रे, परमेश्वर मुंडे शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

MB NEWS:श्रीमती वत्सलाबाई माणिकअप्पा चौंडे यांचे दुःखद निधन

इमेज
  श्रीमती वत्सलाबाई माणिकअप्पा चौंडे यांचे दुःखद निधन परळी/प्रतिनिधी श्रीमती वत्सलाबाई माणिकअप्पा चौंडे यांचे आज सोमवार दि.9 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 65 वर्ष वयाच्या होत्या. मनोज चौंडे व महेश चौंडे यांच्या त्या आई होत.  परळी येथील श्रीमती वत्सलाबाई माणिकअप्पा चौंडे रा.गोपनपाळे गल्ली यांचे आज सोमवार दि.9 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वीरशैव समाज स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. वीरशैव समाज आयोजित विविध धार्मीक व सामाजिक उपक्रमात त्या सहभागी होत असत. अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. अज्ञानबोधिनी विद्यालयाचे शिक्षक मनोज चौंडे व उप पोस्ट मास्तर परळीचे महेश चौंडे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

MB NEWS:डी पी आव्हाड माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे थाटात उदघाटन

इमेज
  ग्रामीण भागातील शिक्षण आजही उत्तमच- पंकजाताई मुंडे पंकजाताई मुंडे यांनी जि. प. शाळेतील आठवणी केल्या ताज्या डी पी आव्हाड माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे थाटात उदघाटन सिन्नर (नाशिक) ।दिनांक ०९। ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा आजही उत्तमच आहे. खेडयात शिकलेली अनेक माणसे आज मोठमोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचली आहेत. मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले. इथल्या शिक्षणाचा फायदा मला भविष्यात झाला आणि आजही होतो आहे  अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचे महत्व आज येथे अधोरेखित केले.   पास्ते (ता. सिन्नर) येथीलव्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित डी. पी. आव्हाड माध्यमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उदघाटन आज पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठया थाटात पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी पोलिस अधिकारी डी पी आव्हाड, हेमंत धात्रक,  तानाजी जायभाये, सरपंच स्नेहलता आव्हाड, उदय सांगळे, दिगंबर गीते आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ● संबंधीत बातमी:click - ■ *नो काॅम्प्रमाईज : तर ...स्वाभिमानाची एक्झिट कधीही च

MB NEWS:दत्तात्रय उर्फ पिंटू दुंदुले यांना पितृशोक; वामनराव दुंदुले यांचे निधन

इमेज
  दत्तात्रय उर्फ पिंटू दुंदुले यांना पितृशोक; वामनराव दुंदुले यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी        येथील स्नेहनगर मधील रहिवाशी व आरोग्य विभागातील सेवानिवृत्त तंत्रज्ञ वामनराव दुंदुले यांचे आज दि.9 रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते 75 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दत्तात्रय उर्फ पिंटू दुंदुले यांचे ते वडील होत.      वामनराव दुंदुले हे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. सुस्वभावी, संयमी म्हणून ते परिचित होते. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान आज दि. 9 रोजी सायंकाळी साडेपाच वा. च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने दुंदुले परिवाराचा आधारवड कोसळला आहे. त्यांच्या निधनाने दुंदुले कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात...........परिवार सहभागी आहे.   उद्या अंत्यसंस्कार        दरम्यान वामनराव दुंदुले यांच्या पार्थिवावर उद्या दि. 10 रोजी सकाळी 10 वाजता परळी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. स्नेहनग

MB NEWS:अंबाजोगाईच्या खेळाडूंची चांगली कामगिरी

इमेज
  अंबाजोगाईच्या खेळाडूंची चांगली कामगिरी नेपाळ येथील पोखरा येथे दि.3 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यंत सुरु असलेल्या इंडो नेपाळ टी 20 इंटरनॅशनल क्रिकेट टूर्नामेंट 2023 मध्ये अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी च्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत काठमांडू, पोखरा,डेहराडून, हरिद्वार या संघासोबत उत्तम खेळ करून अंबाजोगाईच्या खेळाडूंनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत अंबाजोगाईच्या आर्यन वाकडे या खेळाडूने सामन्यात कर्णधारला शोभेल अशी 60 धावांची भक्कम खेळी केली तसेच या स्पर्धेत आर्यन चव्हाण या फक्त 10 वर्षीय गोलंदाजाने 6 खेळाडूंना बाद केले. अंबाजोगाईच्या खेळाडूंचे स्पर्धेतील उत्तम नियोजन, सर्व खेळाडूंचा उत्तम खेळ व शिस्त या जोरावर या संघाने द्वितीय पारितोषिक पटकवले. अतिशय रम्य अश्या नेपाळ येथील हिमालय पर्वतःच्या सानिध्यात या स्पर्धा आज पार पडल्या. नेपाळमध्ये स्पर्धेत उपस्थित प्रेक्षकांची, आयोजकांची मने या संघाच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने जिंकली. या स्पर्धेत सहभागी खेळाडू कर्णधार आर्यन वाकडे, शोर्य लोमटे, अद्विक पाटील, रुद्र हजारी, अथर्व राजेमाने, अमन पठाण, निलेश रोकडे, चैतन्य तांदळे

MB NEWS:भिमवाडी येथील बौध्द विवाहाराचे काम आठ वर्षांपासुन रखडले

इमेज
  भिमवाडी येथील बौध्द विवाहाराचे काम आठ वर्षांपासुन रखडले 26 जानेवारी रोजी नगरपालिकेच्या इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या करणार-राहुल घोबाळे परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील भिमवाडी भागात नगरपालिकेकडुन सामाजिक न्याय व कल्याण विभागा अंतर्गत आमदार फंडातून गत आठ वर्षांपासुन सुरु असलेले बौध्द विहाराचे काम अपुर्णच आहे.याबाबत अनेकवेळा मागणी,आंदोलन करुनही काम पुर्ण झालेले नसल्याने येत्या 20 जानेवारी पर्यंत काम पुर्ण करुन लोकार्पण करावे व संबंधित गुत्तेदारावर ॲट्रासिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी दि.26 जानेवारी रोजी नगरपालिकेच्या इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या करणार असल्याचा इशारा भाजपाचे शहर उपाध्यक्ष राहुल घोबाळे यांनी दिला आहे. याबाबत परळी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. आपल्या नगर परिषदे तर्फे सामाजिक न्याय व कल्याण विभागा अंतर्गत आमदार फंडातून भिमवाडी येथे बौध्द विहार बांधकाम करणे व अडथळा येत असलेले घरे उठवून त्यांना नविन घर बांधून देणे ८ वर्षापूर्वी जुने विहार पाडून नविन बौध्द विहार बांधण्याचा आराखडा व नकाशा तयार केला.सदर बौध्द विहाराचे भुमीपुजन धनंजय

MBNEWS:प.पू. ह.भ. प. श्री सद्गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर तसेच प.पू. सद्गुरु श्री प्रतापे महाराज यांची प्रमुख उपस्थिती

इमेज
  भगरे गुरुजींच्या मराठवाडा विभागीय कार्यालयाचे बुधवारी औरंगाबाद येथे उदघाटन प.पू. ह.भ. प. श्री सद्गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर तसेच प.पू. सद्गुरु श्री प्रतापे महाराज यांची प्रमुख उपस्थिती आपल्या अमोघ वाणीच्या माध्यमातून ज्योतिषाचे विवेचन करणारे ज्योतिषाचार्य तथा भागवतभूषण पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मराठवाडा विभागीय कार्यालयाचे उदघाटन औरंगाबाद येथे होणार आहे.श्री.बंगला १५१,अग्निशामक दलाच्या पाठीमागे बन्सीलाल नगर या भागात कार्यालय असणार आहे. याप्रसंगी प.पू. ह.भ.प. श्री सद्गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर तसेच प.पू. सद्गुरु श्री प्रतापे महाराज श्री क्षेत्र दत्त भालोद,नर्मदा तट गुजरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  शहरातील यशोमंगल मंगल कार्यालय, पन्नालाल नगर या ठिकाणी या नयनरम्य सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वा. करण्यात आले आहे. याआधी नाशिक, पुणे, ठाणे अशी तीन कार्यालयाच्या माध्यमातून गुरुजींचे मार्गदर्शन मिळते आहे.आता मराठवाड्यातील नागरिकांच्या आग्रहास्तव औरंगाबाद शहरात शिव संकल्प अध्यात्मिक प्रतिष्ठान चे कार्यालय सुरू केले जात आहे.या कार्यक्रमास भाव

MB NEWS:सामाजिक बाधिलकी जपणारे डाॅ.रविंद्र जगतकर यांना नाथरा येथे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

इमेज
  सामाजिक बाधिलकी जपणारे डाॅ.रविंद्र जगतकर यांना नाथरा येथे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित नाथरा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळच्या वतीने ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यरांच्या हस्ते वितरण मित्र परिवाराकडून डाॅ.रविंद्र जगतकर यांचे अभिनंदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांना श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा  राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.          श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववा