MB NEWS:सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात

 विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व कौशल्याला वाव देण्याचे कार्य स्नेहसंमेलनातून:अभिनेत्री कोमल सोमारे



सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात 


(परळी प्रतिनिधी):-

येथील परिवर्तन युवा मंच संचलित सनराईज इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन कलर्स मराठी फेम, सुप्रसिद्ध सिने-नाटय अभिनेत्री कोमल सोमारे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षस्थानी  उपशिक्षणाधिकारी (प्राथ) हिरालालजी कराड, तर प्रमुख अतिथी म्हणून आयआयबी लातूरचे संचालक चिराग सेनमा,सभापती बालाजी(पिंटू)मुंडे,

माजी प्राचार्य जी. एस. सोंदळे,शिक्षण विस्तार अधिकारी( पं. स.)हिना उमर  अन्सारी , ,माउली मुंडे,(पं स.सदस्य )प्रसिद्ध सिने-नाटय अभिनेता दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे,रामकिशन मुंडे,प्रा. वैभव स्वामी, ज्युनिअर चार्ली  यांचेसह सनराईजचे संचालक गोविंदराव मुंडे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र चाटे,सचिव सौ. प्रियतमा मुंडे, प्राचार्य ए. एस. रॉय

फुलचंद मुंडे , उद्धव कराड, आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते

श्रीफळ वाढवून  कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व कौशल्याला वाव देण्याचे कार्य स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सनराईज इंग्लिश स्कुल करीत असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री कोमल सोमारे यांनी  केले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करीत समाज व राष्ट्र प्रबोधनाचे कार्य सनराईज स्कुल मधून होत असल्याचे मत उपशिक्षणाधिकारी हिरालालजी कराड यांनी मांडले.

 शिक्षणाबरोबर मुलांच्या अंगी असणाऱ्या इतर कलागुणाना वाव दिला तर मुले अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही गरूड झेप घेऊ शकतात. असे प्रतिपादन आयआयबी लातूरचे संचालक चिराग सेनमा यांनी केले. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमूंनी हिंदी, मराठी ,इंग्रजी गाण्यांवर नृत्य सादर केले. देशभक्ती, सामाजिक सदभावना ,पर्यावरण जागृतीपर गीतांवरील नृत्यातून अनोखा आविष्कार विद्यार्थ्यांनी साकारला.अनमोल असे हे जीवन आनंदाने व उत्साहाने जगण्याचा तसेच शेतकर्‍यांच्या व्यथा आपल्या गाण्यातून मांडून समाजामध्ये मोलाचा संदेश लहानग्यांनी दिला.लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृती व लोकगीतांकडे दृष्टिक्षेप टाकत अस्सल मराठमोळी गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला.भक्तिगीत,ओवी,वासुदेव गीत, गोंधळ, शेतकरी गीत,धनगरी गीत,कोळी गीत,गवळण, वाघ्या मुरुळी, जोगवा आदी गीतांनी परिसर रंगून गेला. विविधरंगी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षक वर्गाची मने जिंकली. मराठी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी यातून घालून दिला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक बा. सो. कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक गोविंदराव मुंडे यांनी केले.

यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?