इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं.समिती यांच्या संयुक्त विद्यमाने

 दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं.समिती  यांच्या संयुक्त  विद्यमाने



12 ते14 जानेवारी 50 वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित 2022-23 प्रदर्शनाचे आयोजन



तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी होण्याचे  आवाहन 


परळी प्रतिनिधी ;  शहरातील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे पन्नास वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार असून याबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयातुन तालुक्यातील सर्व शाळांना विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी ८ :३०ते ११ दरम्यान या प्रदर्शन ची नोंदणी व मान्य होणार असून दुपारी १२:३० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे तसेच एक ते पाच दरम्यान प्रदर्शनी वस्तू व उपक्रम पाहण्यासाठी खुले होणार आहेत.


सविस्तर माहिती अशी की शहरातील बीड रोड येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे 12 ते 14 जानेवारी दरम्यान ५०  व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार असून या विज्ञान गणित प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी ठीक 12:30 होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा   सौ.उषाताई किरण गित्ते तर कार्यक्रमाचे उद्घाटक औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे , विशेष आमंत्रित शिक्षणाधिकारी जि प बीड नागनाथ शिंदे , गटविकास  अधिकारी संजय केंद्रे, गटशिक्षण अधिकारी एस व्ही सोनवणे वरिष्ठ शिक्षण विस्तार  अधिकारी अन्सारी यांच्यासह आदि मानवांराच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे  असे आव्हान दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक विठ्ठल तुपे यांनी केले आहे.

*या प्रदर्शनात मुख्य विषय पुढील प्रमाणे आहेत*

तंत्रज्ञान आणि खेळणी उपविषय माहिती आणि संप्रेरणातील प्रगती पर्यावरण अनुकूल सामग्री आरोग्य आणि स्वच्छता वाहतूक आणि उपक्रम पर्यावरण चिंता वर्तमानपत्र ऐतिहासिक विकास आमच्यासाठी गणित हे या विज्ञान प्रदर्शनातील मुख्य विषय असून यास या विज्ञान प्रदर्शनातील गट पुढील प्रमाणे आहेत उच्च प्राथमिक गट सहावी ते आठवी उच्च माध्यमिक गट नववी ते बारावी तसेच तालुकास्तरीय अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांसाठी) तालुकास्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक शिक्षकांसाठी) तालुकास्तरीय प्रयोगशाळा परिचर पब्लिक सहाय्यक निर्मिती शैक्षणिक साहित्य पन्नास व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घ्यावा असे आव्हान गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!