पोस्ट्स

MB NEWS:अंजनवतीच्या श्री संत तुकाविप्र संस्थानमध्ये चोरी ; चोरट्यांच्या माराने दोन महिला गंभीर जखमी.

इमेज
  अंजनवतीच्या श्री संत तुकाविप्र संस्थानमध्ये चोरी ; चोरट्यांच्या माराने दोन महिला गंभीर जखमी   नेकनुर...  बीड तालुक्यातील मौजे . अंजनवती येथील येडे वस्ती स्थित श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात आज 26 एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला . प्रतिकार करणाऱ्या दोन महिलांना मारहाण केली . त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . नेकनूर पोलिस घटनास्थळी ठाण मांडून असुन स्थानिक गुन्हे शाखा व श्वानपथक यांनी पाहणी केली .  घरात झोपलेले पुजारी कृष्णा जोशी यांच्या रूमला बाहेरून कडी लावली त्याचवेळी शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या कृष्णा जोशी यांच्या पत्नी गीता जोशी ( वय ४५ ) यांच्या डोक्यात मारहाण केली . डोळ्याखाली जखम असुन सासु उषा प्रल्हाद लेले यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे डोक्याला मारहाण केली त्यांच्यावर बीड येथील फिनिक्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत . दीड तोळे सोने व काही रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे . नेकनुर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेख मुस्तफा , पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव , हवालदार राख तसेच लिंबागणेश

MB NEWS: अभिष्टचिंतन लेख ■ प्रशांत जोशी : 'नेहमी शांत' आणि 'स्थिरचित्त' बहुआयामी प्रेरक व्यक्तिमत्व

इमेज
 ■ प्रशांत जोशी : 'नेहमी शांत' आणि 'स्थिरचित्त' बहुआयामी प्रेरक व्यक्तिमत्व             का ही व्यक्तीमत्वंच अशी असतात की त्यांच्या सहवासात येणारी माणसं आपसुकच त्यांचीच होऊन जातात. एक अप्रत्यक्ष प्रभाव त्या व्यक्तीमत्वातून समोरच्यावर पडतो जो की सहज, सुलभ प्रभाव असतो.  अशा व्यक्तींचा भवताल असंख्य लोकांनी जोडलेला असतो. समृद्ध लोकसंचय असे वैशिष्ट्य सांगता येईल असे व्यक्तीमत्व घडत जाते. या गुणांची व्यक्ती संवेदनशील असेल तर ही गुणवैशिष्टे व्यक्तीगत पातळीवर तर सरस ठरतातच पण त्याहीपेक्षा अशा व्यक्ती इतर अनेकांचे जीवन प्रेरणेने समृद्ध करतात. असेच काहीसे बहु अयामी व्यक्तीमत्व म्हणजे आमचे मार्गदर्शक , आधारस्तंभ, मित्र प्रशांत जोशी सर आहेत.        प्रशांत जोशी सर हे महाराष्ट्रातील एक व्यापक राजकारण असलेले अग्रेसर नेतृत्व,लोकनेता असलेल्या माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे स्विय सहायक म्हणून भुमिका पार पाडतात. खरंतर अतिशय कार्यबाहूल्य असलेली जीवनशैली ,सतत प्रवास असंख्य गोष्टी डोक्यात त्यात वेळेला अनन्यसाधारण महत्व अशा सर्व व्यापातही व्यक्तीगत गुणवर्धन आणि प्रत्येकाला आपुलकीने वेळ देणे,

MB NEWS:परळीत आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आद्य शंकराचार्य चौक व प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे आनावरण

इमेज
 ●आद्य शंकराचार्यांनी तब्बल १२५० वर्षांपुर्वी दिली होती  पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ क्षेत्रभेट ; स्मृतींना उजाळा ! •  परळीत आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आद्य शंकराचार्य चौक व प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे आनावरण परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           सनातन वैदिक हिंदू धर्माची ग्लानी दूर करून धर्माची पुन:र्स्थापना करणारे आद्य शंकराचार्यांच्या जयंती दिनाचे (दि.25) औचित्य साधून  परळीत आद्य शंकराचार्य चौक व आद्य शंकराचार्य प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे अनावरण आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ क्षेत्राला तब्बल बाराशे पन्नास वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी भेट दिल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या चौक व प्रदक्षिणामार्ग नामकरणामुळे आद्य शंकराचार्यांच्या पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र भेटीच्या स्मृतींना एक प्रकारे उजाळा मिळाला आहे.या परिसराचा परिपूर्ण विकास करण्याचे आश्वासन हा धनंजय मुंडे यांनी दिली आहे.              वैद्यनाथ नगरीत आद्य शंकराचार्य प्रदक्षिणा मार्ग व  चौकाच्या नामफलकाचे अनावरण आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.यावेळी वैद्यनाथ देव

MB NEWS:◆किसान सभा, पायी मोर्चावर ठाम

इमेज
  राज्यशासनासोबत चर्चा अयशस्वी;महसूल मंत्र्यांसोबतची बैठक अनिर्णित ◆किसान सभा, पायी मोर्चावर ठाम परळी / प्रतिनिधी अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च केल्यानंतर बाकी प्रलंबित शेतीप्रश्नांसाठी किसान सभेने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर राज्यभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाला राज्यभरातून शेतकरी ,शेतमजूर, श्रमिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रत्यक्ष मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील याचा अंदाज वर्तवला जात असताना राज्य सरकारने समोपचाराने घेत किसान सभेच्या शिष्टमंडळाला मंगळवार दि 25 रोजी सह्याद्री अतिथीगृहवर चर्चेसाठी आमंत्रित केले.चर्चेत किसान सभेकडून डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, कॉ.उमेश देशमुख, कॉ. उदय नारकर, कॉ.संजय ठाकूर, कॉ.किसन गुजर, कॉ.अमोल वाघमारे आणि कॉ.एड.अजय बुरांडे आदी तर राज्यशासनातर्फे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल सचिव, दुग्ध विकास सचिव व ईतर संबंधित खात्याचे अधिकारी हजर होते. किसान सभा आणि राज्य शासन यांच्यात ही चर्चा बैठक सुमारे 3 तास झाली या चर्चा ब

MB NEWS:जिल्ह्यासाठी 25 व 26 एप्रिल रोजी ऑरेज अलर्ट जारी !

इमेज
  जिल्ह्यासाठी 25 व 26 एप्रिल रोजी ऑरेज अलर्ट जारी  ! विजांचा कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता बीड, दि.24,(जि.मा.का.) :- प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 24 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार बीड जिल्हयासाठी दि. 25 एप्रिल व 26 एप्रिल 2023 या दिवसासाठी ऑरेज (Orange) अलर्ट जारी केला आहे. तसेच 24, 27, आणि 28 एप्रिल 2023 या दिवसासाठी येलो  (Yellow) अलर्ट जारी केला असून 25 ते 26 एप्रिल 2023 रोजी जिल्ळयात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह सोसाटयाचा वारा आणि वेगवेगळया ठिकाणी गारपीट होण्याची शक्य्ता आहे. तसेच 24,27, 28 एप्रिल 2033 रोजी जिल्हयात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलामीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून खबरदारीचा उपाय म्हणून पुढीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी असे निवासी उपजिल्हाधिकारी संताष राऊत यांनी कळविले आहे. या गोष्टी करा :-  विजेच्या  गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा, जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल

MB NEWS:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुदास वृद्धाश्रमात घेण्यात आले विविध कार्यक्रम

इमेज
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुदास वृद्धाश्रमात घेण्यात आले विविध कार्यक्रम  परळी,( प्रतिनिधी):- सामाजिक न्यायपर्व अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुदास सेवाश्रम संचलित गुरुदास वृद्धाश्रम येथे दि. 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2023 दरम्यान सप्ताह निमित्त निराधार वृद्धांना कपडे, व फळे वाटप, आरोग्य शिबिर, किर्तन भजन अशा विविध प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विश्वस्त व्यवस्थापक दास लालजी महाराज सरचिटणीस सुरेश टाक, अध्यक्ष नरहरी शहाणे, कोषाध्यक्ष यमुनाबाई सोनवणे, संचालक भास्कर मामा चाटे, बाळासाहेब देशमुख, सुभाष चव्हाण, नारायण देव गोपनपाळे, व आश्रमातील सर्व कर्मचारी वृंद सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र घाटनांदुर येथील डॉ. माले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गुरुदास सेवा आश्रमातील वृद्ध नागरिकांची  तपासणी केली. चंद्रकांत दहिफळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर मान्यवरांचे आभार सुनीता डहाळे यांनी मानले. Video   Advertis

MB NEWS:महसूल मंत्र्याच्या कार्यालयावर शेतकरी धडकणार

इमेज
 ■ भर उन्हाळ्यात अकोले ते लोणी किसान सभेचा पायी मोर्चा ●महसूल मंत्र्याच्या कार्यालयावर शेतकरी धडकणार परळी / प्रतिनिधी शेतकरी, शेतमजूर, श्रमिकांच्या मागण्यांसाठी, किसानसभेच्या नेतृत्वाखाली २६ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या काळात अकोले ते लोणी जिल्हा अहमदनगर असे तीन दिवसांच्या पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा राज्यव्यापी मोर्चा निघत आहे. राज्यभरातील शेतकरी वर्गाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हा पायी मोर्चा निघत आहे.मागण्या मान्य न झाल्यास पायी मोर्चानंतर दि २८ एप्रिल रोजी लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन सुरू केले जाणार आहे.केवळ आश्वासन आणि घोषणाबाजी याला कंटाळून गेलेले बीड जिल्ह्यातील असंख्य शेतकरी या पायी मोर्च्यात सहभागी होणार आहेत. Click: ■ *पंकजा मुंडेंचं बीडमधील कार्यक्रमाचं असंही सोशल इंजिनिअरिंग!* अखिल भारतीय किसान सभा सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निदर्शने,आंदोलन करीत असून याची दखल घेत काही अंशी शेतकऱ्यांच्या काही मागण्या पदरात पाडून यशस्वी झाली आहे.बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा विमा प्रश्नावर

MB NEWS:पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला पॅनलच्या प्रचाराचा थाटात शुभारंभ

इमेज
  मार्केट कमिटी अद्ययावत करण्यासाठी अंबाजोगाई शेतकरी विकास पॅनलला विजयी करा पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला पॅनलच्या प्रचाराचा थाटात शुभारंभ शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्व घटकांना न्याय देण्याचा निर्धार अंबाजोगाई ।दिनांक २३। आम्ही स्वच्छ प्रतिमा असलेले सर्व घटकांतील कष्टाळू उमेदवार मार्केट कमिटीत उभा केले आहेत. शेतकरी केंद्रविंदू मानून सर्वांना न्याय देण्याला आमचं प्राधान्य असणार आहे. मार्केट कमिटीला नवं रूप आणून अद्ययावत करण्यासाठी अंबाजोगाई शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज इथं केलं.   अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील अंबाजोगाई शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, रमेश आडसकर, दिनेश परदेशी, राम कुलकर्णी, अच्युत गंगणे, हिंदूलाल काकडे, शामराव आपेट आदी याप्रसंगी उपस्थित होते.    प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी पंकजाताई मुंडे यांनी पॅनलच्या सर्व उमेदवारांसह यो

MB NEWS:बीड जिल्हा व्यापारी परिषदेत पंकजाताई मुंडे यांचा दिलासादायक शब्द

इमेज
  बीड जिल्हा व्यापारी परिषदेत पंकजाताई मुंडे यांचा दिलासादायक शब्द माझ्या व्यापारी बांधवांना सन्मान, सुरक्षा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील - पंकजा मुंडे देशाच्या विकासात व्यापाऱ्यांचं योगदान मोठं ; ते विसरता येणार नाही परळी वैजनाथ ।दिनांक २३। व्यापारी वर्ग नेहमीच नियमाच्या चौकटीत राहून काम करत असतो. आपला व्यापार, व्यवसाय सुरळीत रहावा यासाठी नियमित टॅक्स भरण्याकडे त्यांचा कल असतो, त्यांनी भरलेल्या टॅक्समधूनच देशाच्या विकासाचं चक्र गतीमान व्हायला मदत होते, देशाचं प्रगतीत त्यांचं हे योगदान मोठं आहे असं सांगत शहरातील माझ्या व्यापारी बांधवांना सन्मान, सुरक्षा मिळावी एवढीच माफक अपेक्षा आहे आणि ती देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे दिली.     मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड ॲन्ड काॅमर्स आणि विविध व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा व्यापारी परिषदेचं उदघाटन पंकजाताई  मुंडे यांच्या हस्ते आज  झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा चेंबर्सचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा,तनसुखजी झांबड, सत्यनारायण लाहोटी, उमे

MB NEWS:तब्बल 34 वर्षांनी वर्ग मित्रांची पुन्हा भरणार शाळा !

इमेज
  तब्बल 34 वर्षांनी वर्ग मित्रांची पुन्हा भरणार शाळा !  श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी ता.उमरगा येथील 1989 90 बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन परळीवैजनाथ,प्रतिनिधी...       सकाळ सकाळची  वेळ. एक लांबलचक घुमलेला शिट्टीचा आवाज. प्रार्थनेची वेळ स्मरणात आणून देण्यासाठी.. सावधान, विश्राम, सावधान.. आणि शुरू करेंगे, शुरू कर असे आदेश मिळताच एका स्वरात "जन गण मन अधिनायक जय हे.." असे राष्ट्रगीताचे मंजूळ स्वर बाहेर पडले...मोठा भावाशयगर्भ आणि अर्थपूर्ण आर्ततासोबत घेऊन...! प्रार्थना संपताच एकच कल्ला सुरू झाला आणि शाळेतून एक प्रभातफेरी बाहेर पडली... असा अनुभव तब्बल 34 ते 35 वर्षांनंतर प्रत्येकाला येणार आहे.श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी ता.उमरगा जि.धाराशिव येथील 1989- 90 बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.                 तब्बल 34 वर्षांनी वर्ग मित्रांची पुन्हा  शाळा भरणार असुन श्री. ज्ञानेश्वर विद्यालय, तुरोरी ता.उमरगा जि.धाराशिव येथील 1989 90 बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन सोमवार दि.24 एप्रिल 2023 रोजी करण्यात आले आहे. सर

MB NEWS:सर्व धर्मियांच्या कार्यक्रमांना लावली उपस्थिती

इमेज
  पंकजा मुंडेंचं बीडमधील कार्यक्रमाचं असंही सोशल इंजिनिअरिंग! सर्व धर्मियांच्या कार्यक्रमांना लावली उपस्थिती बीड ।दिनांक २२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा कार्यक्रमाच्या बाबतीतला  सोशल इंजिनिअरिंगचा अनोखा प्रयोग आज बीडकरांना पहावयास मिळाला. शहरातील सर्व धर्मियांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा व्यक्त केल्या.   पंकजाताई मुंडे यांचं सायंकाळी शहरात आगमन झालं. भाजपचे नगरसेवक जगदीश गुरखूदे यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन त्यांच्या प्रभागातील विकास कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणूकीत सहभागी होऊन त्यांनी भगवान परशुराम यांना वंदन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले या  महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून महामानवांना अभिवादन केले.     रमजान ईद सणानिमित्त भाजप नेते सलीम जहांगीर यांनी आयोजित केलेल्या ईद मिलाप मध्ये सहभागी होऊन मुस

MB NEWS:गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन पॅनलच्या उमेदवारांनी केली प्रचाराला सुरवात

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील मार्केट कमिटी, जवाहर शिक्षण संस्था पॅनलच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन पॅनलच्या उमेदवारांनी केली प्रचाराला सुरवात परळी वैजनाथ ।दिनांक २२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील कृषी उत्पन्न बाजार समिती व जवाहर शिक्षण संस्था निवडणूकीतील पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मोठया थाटात झाला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही निवडणूकीतील उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली.      परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागेसाठी २८ एप्रिल रोजी तर जवाहर शिक्षण संस्थेच्या ३२ जागांसाठी ६ मे रोजी  मतदान होत आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीसाठी लोकनेते शेतकरी विकास पॅनल तर जवाहर साठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पंकजाताई मुंडे प्रचार शुभारंभाला उपस्थित राहू शकल्या नाहीत तथापि, उद्यापासून त्या मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार करणार आहेत.    आज या दोन्ही पॅन

MB NEWS:बेलवाडी आणि बसवेश्वर चौकात संत महात्मा बसवेश्वर यांना केले अभिवादन!!

इमेज
  महात्मा बसवेश्वर जयंती जनावरांना चारा केली साजरी ! महात्मा बसवेश्वरांनी अंधश्रद्धे विरुद्ध लढा दिला—अँड.मनोज संकाये बेलवाडी आणि बसवेश्वर चौकात संत महात्मा बसवेश्वर यांना केले अभिवादन!! परळी वैजनाथ प्रतिनिधी बाराव्या शतकातील महान संत समाज सुधारक महात्मा संत बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रद्धांनंद गुरुकुल येथे मुक्या जनावरास चारा वाटप करून आणि गुरुकुलातील विद्यार्थ्यांना अल्पहार देऊन त्यांची जयंती अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.    सर्वप्रथम जगत ज्योती संत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन बसवेश्वर चौक आणि बेलवाडी येथे करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. संत बसवेश्वरांनी 12 व्या शतकात चालत असलेल्या अनिष्ट अंधश्रद्धा आणि चालीरीतींना कडाडून विरोध केला असे प्रतिपादन अँड.मनोज संकाये यांनी केले पुढे बोलताना ते म्हणाले की संत बसवेश्वरांनी कर्मकांडात गुंतून न पडता प्रत्येक माणसाने आपली स्वतःची भाकरी मिळवण्यासाठी कष्ट केले पाहिजेत. प्रत्येकाने सतत कार्यरत राहिले पाहिजे,कोणताही व्यवसाय अथवा कुठल्याही प्रकारचे काम हे हीन अथवा श्रेष्ठ

MB NEWS: डॉ. क्षितीजा काळे यांची तहसीलदारपदी पदोन्नती

इमेज
 डॉ. क्षितीजा काळे यांची तहसीलदारपदी पदोन्नती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या परळीच्या भूमीकन्या डॉ. क्षितीजा काळे (वाघमारे) यांची तहसीलदारपदी पदोन्नती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल डॉ. काळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.        महाराष्ट्र शासनाने काल एका आदेशान्वये नायब तहसीलदार या पदावर काम करणाऱ्यांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये परळीच्या पंचशील नगरमधील रहिवासी असलेल्या डॉ. क्षितीजा काळे - वाघमारे यांचे शालेय शिक्षण श्री सरस्वती विद्यालय पंचशील नगर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लातुर येथे झाले आहे. वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे.         डॉ. क्षितीजा काळे - वाघमारे यांनी परळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन केले जात आहे. Click: ● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न* Video   Advertise  

MB NEWS:वामनराव केवडकर यांचे निधन ;पत्रकार शशी केवडकर यांना पितृशोक

इमेज
  वामनराव केवडकर यांचे निधन ;पत्रकार शशी केवडकर  यांना पितृशोक                          बीड- बीड येथील निवृत्त महसूल कर्मचारी वामनराव केवडकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 83 वर्ष होते.पत्रकार शशी केवडकर यांचे ते वडील होते.          वामनराव केवडकर हे बीड जिल्ह्यात परिचित असे व्यक्तिमत्त्व होते.सचोटीने आणि प्रामाणिकपणे आपली सेवा पूर्ण केल्यानंतर ते निवृत्त झाले. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे,सृजनशील व्यक्ती म्हणून ते परिचित होते.गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती ढासळली होती.शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.                    त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर रात्री नऊ वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MB NEWS:परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळ निवडणूक

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या प्रचाराचा उद्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शुभारंभ परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळ निवडणूक दोन्ही निवडणूकीतील उमेदवार गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन करणार प्रचाराला सुरवात परळी वैजनाथ ।दिनांक २१। कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळ निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या (ता. २२) अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही निवडणूकीतील उमेदवार उद्या प्रचाराला सुरवात करणार आहेत.      परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागेसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. या पॅनलमध्ये सोसायटी मतदारसंघातून देहू आघाव, बळीराम गडदे, राजेश गिते, उत्तम माने, श्रीराम मुंडे, भरत सोनवणे, संतोष सोळंके, महिलांमधून शिवकन्या फड, प्रयाग साबळे, भटके विमुक्त प्रवर

MB NEWS:जीविताची सुरक्षितता: ‘व्हॉइस ऑफ मीडिया’कडून परळीतील पत्रकारांना अडिच कोटींचे विमा संरक्षण

इमेज
  जीविताची सुरक्षितता: ‘व्हॉइस ऑफ मीडिया’कडून परळीतील पत्रकारांना अडिच कोटींचे विमा संरक्षण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 21 - पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या वतीने पत्रकार व पत्रकार कुटुंब यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या  अनुषंगाने पत्रकारांच्या जीविताची सुरक्षितता व्हावी यादृष्टीने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’कडून परळीतील पत्रकारांना अडिच कोटींचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या संघटनेच्या पत्रकार बांधवांच्या हितासाठी कृतिशील कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.   संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी,राज्य कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, मराठवाडा कार्याध्यक्ष जालिंधर धांडे,मराठवाडा उपाध्यक्ष शुभम खाडे,मराठवाडा संघटक आनंद डोंगरे,जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परळीतील पत्रकारांचा विमा उतरवण्यात आला आहे. परळी शहर व तालुक्यात विविध प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या  पत्रकारास दहा लाख रूपये विमा संरक्षण यामाध्यमातून मिळणार आहे.दरम्यान पर