MB NEWS:बेलवाडी आणि बसवेश्वर चौकात संत महात्मा बसवेश्वर यांना केले अभिवादन!!

 महात्मा बसवेश्वर जयंती जनावरांना चारा केली साजरी !

महात्मा बसवेश्वरांनी अंधश्रद्धे विरुद्ध लढा दिला—अँड.मनोज संकाये

बेलवाडी आणि बसवेश्वर चौकात संत महात्मा बसवेश्वर यांना केले अभिवादन!!


परळी वैजनाथ प्रतिनिधी

बाराव्या शतकातील महान संत समाज सुधारक महात्मा संत बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रद्धांनंद गुरुकुल येथे मुक्या जनावरास चारा वाटप करून आणि गुरुकुलातील विद्यार्थ्यांना अल्पहार देऊन त्यांची जयंती अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.


   सर्वप्रथम जगत ज्योती संत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन बसवेश्वर चौक आणि बेलवाडी येथे करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. संत बसवेश्वरांनी 12 व्या शतकात चालत असलेल्या अनिष्ट अंधश्रद्धा आणि चालीरीतींना कडाडून विरोध केला असे प्रतिपादन अँड.मनोज संकाये यांनी केले पुढे बोलताना ते म्हणाले की संत बसवेश्वरांनी

कर्मकांडात गुंतून न पडता प्रत्येक माणसाने आपली स्वतःची भाकरी मिळवण्यासाठी कष्ट केले पाहिजेत. प्रत्येकाने सतत कार्यरत राहिले पाहिजे,कोणताही व्यवसाय अथवा कुठल्याही प्रकारचे काम हे हीन अथवा श्रेष्ठ असे नसते आणि त्यावरून ते काम करणाऱ्या माणसाचे श्रेष्ठत्वही ठरत नसते, अशा विचारांचे महात्मा बसवेश्वर होते.


   यावेळी श्रद्धांनंद गुरुकुलाचे व्यवस्थापक सोमानीजी, महाशय स्वामीजी, योगेश स्वामी, सोमनाथ नाईकवाडे ,मनोज एस के ,प्रदीप बुधे, गजानन हालगे, रमेश संकाये, योगेश व्यवहारे, काशिनाथ सरवदे, संदीप चौधरी, सोमनाथ दौंड, मुंजाभाऊ साठे, कैलास रिकिबे, संतोष चौधरी, रत्नेश बेलूरे, संतोष कांबळे ,सुंदर आव्हाड ,राम चाटे ,प्रवीण रोडे, अनिल कातकडे ,दगडू भाळे, अभिजीत दहिवाळ, दीपक बडे, वैजनाथ चौधरी ,मोहन चव्हाण, लहू हालगे आदीसह मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार