MB NEWS: अभिष्टचिंतन लेख ■ प्रशांत जोशी : 'नेहमी शांत' आणि 'स्थिरचित्त' बहुआयामी प्रेरक व्यक्तिमत्व
■ प्रशांत जोशी : 'नेहमी शांत' आणि 'स्थिरचित्त' बहुआयामी प्रेरक व्यक्तिमत्व
काही व्यक्तीमत्वंच अशी असतात की त्यांच्या सहवासात येणारी माणसं आपसुकच त्यांचीच होऊन जातात. एक अप्रत्यक्ष प्रभाव त्या व्यक्तीमत्वातून समोरच्यावर पडतो जो की सहज, सुलभ प्रभाव असतो. अशा व्यक्तींचा भवताल असंख्य लोकांनी जोडलेला असतो. समृद्ध लोकसंचय असे वैशिष्ट्य सांगता येईल असे व्यक्तीमत्व घडत जाते. या गुणांची व्यक्ती संवेदनशील असेल तर ही गुणवैशिष्टे व्यक्तीगत पातळीवर तर सरस ठरतातच पण त्याहीपेक्षा अशा व्यक्ती इतर अनेकांचे जीवन प्रेरणेने समृद्ध करतात. असेच काहीसे बहु अयामी व्यक्तीमत्व म्हणजे आमचे मार्गदर्शक , आधारस्तंभ, मित्र प्रशांत जोशी सर आहेत.
प्रशांत जोशी सर हे महाराष्ट्रातील एक व्यापक राजकारण असलेले अग्रेसर नेतृत्व,लोकनेता असलेल्या माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे स्विय सहायक म्हणून भुमिका पार पाडतात. खरंतर अतिशय कार्यबाहूल्य असलेली जीवनशैली ,सतत प्रवास असंख्य गोष्टी डोक्यात त्यात वेळेला अनन्यसाधारण महत्व अशा सर्व व्यापातही व्यक्तीगत गुणवर्धन आणि प्रत्येकाला आपुलकीने वेळ देणे,प्रत्येकाची अडिअडचण समजून घेणे, अनेकांची अनेक मते, क्रिया-प्रतिक्रिया व भावनांचा हलकल्लोळ सहन करत शांत व सयंम राखणे ही तारेवरची कसरत करताना कुठेही दमछाक जाणवू न देणे ही सोपी गोष्ट नाहीच. हे दिव्यही आपल्या जीवनात लिलया पार पाडणारे प्रशांत जोशी सर नक्कीच प्रेरक व्यक्तिमत्व ठरले आहेत.
प्रशांत जोशी सर यांची जडणघडण पत्रकार म्हणून झाली.असंख्य बरेवाईट अनुभव गाठीशी बांधत त्यातून सकारात्मक धडे गिरवत ते पुढे चालत राहिले. एखाद्या व्यक्तीने आपले पूर्ण कौशल्य वापरून काम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रशांत जोशी सर आहेत. कोणत्याही कामाची पद्धत कशी बसवावी हे अगदी सहजरीत्या त्यांना जमते. त्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या विचार, वाणी आणि कृतीमध्ये एकवाक्यता असते. कोणतेही काम करताना कामाचे पूर्वनियोजन, शिस्तबध्दता, वेळेचे व्यवस्थापन या गोष्टींवर त्यांचा सातत्याने भर असतो. कोणतेही काम करताना ते प्रामाणिकपणे करणे, दुसऱ्याचे म्हणणे समजून घेणे ह्याला ते प्राधान्याक्रम देतात. आत्मीयता, आस्था आणि समतेची भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून लक्षात येते.
एखादी गोष्ट समजून घेताना वरवर लक्ष न देता ती मुळापर्यंत जाऊन समजून घेणे हा त्यांचा स्वभाव आहे.त्यामुळे ते नवनविन गोष्टी सातत्याने शिकून घेतात.केवळ माहित करुन घेत नाहीत तर त्यात हातखंडा निर्माण करण्याकडे त्यांचा कल असतो. ते प्रचंड टेक्नोसॅव्ही आहेत. नविन तंत्रज्ञानाचा जाणकार किंवा तंत्रस्नेही असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्याप्रमाणे एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती ते तडीस घेऊन जाणारच याचे उदाहरण म्हणजे त्यांनी व्यायाम करण्याची स्वत: लावून घेतलेली सवय आहे. एकदा शारिरिक तंदुरुस्तीचा ध्यास त्यांना लागला.एखादी गोष्ट समजून घेताना वरवर लक्ष न देता ती मुळापर्यंत जाऊन समजून घेणे हा त्यांचा स्वभाव आहे त्यानुसार मग त्यासाठी जे जे उपयुक्त ते सर्व आजपर्यंत ते करतांना दिसतात.व्यायामाचा इतका ध्यास की याचे उदाहरण म्हणजे केवळ 90 दिवसात तब्बल 14 किलो वजन त्यांनी कमी करुन दाखवले.इतरांनाही ते व्यायामाचे महत्त्व समजावून देतात.
प्रशांत जोशी सर हे कुटुंब वत्सल व ग्रह कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व आहे. आपले प्रत्येक कर्तव्य कौटुंबिक स्तरावरही परिपूर्ण जपण्याचा त्यांचा स्वभाव आहे. याचे उदाहरण म्हणजे मुला मुलींची दहावी बारावीची परीक्षा असताना आपल्या सर्व कार्य बाहुल्यातून ती घेऊन ते थांबले होते. त्याचप्रमाणे परळीत असताना प्रत्येक दिवसाची सुरुवात ही गणेश पार येथील गणेशाच्या दर्शनाने करणारा पिढीजात नित्यनेमही आजपर्यंत त्यांनी पाळलेला आहे. सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक व मैत्री यातील कर्तव्यतत्पर व जाणकार असाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असल्याचे नेहमीच जाणवते.
कोणत्याही संस्थेच्या वाटचालीमध्ये अनेक ज्ञात अज्ञात लोकांचा, संस्थांचा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो, योगदान असते. एखादी संस्था समजून घेताना ध्येये, उद्दिष्टे, मूल्ये ही वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदानातून विकसित होत असतात. विकासात आणि विस्तारात अशा अनेक व्यक्तींचे योगदान असते. यामध्ये आपल्यातील सर्वश्रेष्ठ व पुर्ण क्षमतेचे योगदान देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.प्रशांत नावाचा अर्थच शांत, निरव शांत -संयम असा होतो.'प्रशांत' म्हणजे 'नेहमी शांत ' आणि स्थिरचित्त असणारा. म्हणुन अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा सहवास लाभणे व त्यांच्याकडून सतत काहीना काही शिकून घेणे ही संधी मला प्राप्त झाली आहे हे माझे परम भाग्य आहे.
आज बहु अयामी व्यक्तीमत्व आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, दीपस्तंभ मित्र प्रशांत जोशी सर यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना उत्तम दीर्घायुरारोग्य,समृद्धी लाभो हीच प्रभु वैद्यनाथचरणी प्रार्थना.सरांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!!!
✍️ - मोहन साखरे
परळी वैजनाथ.
------------------------------------------------------
Video
Advertise
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा