इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळ निवडणूक

 पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या प्रचाराचा उद्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शुभारंभ


परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळ निवडणूक

दोन्ही निवडणूकीतील उमेदवार गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन करणार प्रचाराला सुरवात


परळी वैजनाथ ।दिनांक २१।

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळ निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या (ता. २२) अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही निवडणूकीतील उमेदवार उद्या प्रचाराला सुरवात करणार आहेत. 


    परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागेसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. या पॅनलमध्ये सोसायटी मतदारसंघातून देहू आघाव, बळीराम गडदे, राजेश गिते, उत्तम माने, श्रीराम मुंडे, भरत सोनवणे, संतोष सोळंके, महिलांमधून शिवकन्या फड, प्रयाग साबळे, भटके विमुक्त प्रवर्गातून सतीश मुंडे, इतर मागासवर्ग मधून केशव माळी, ग्रामपंचायत- श्रीरंग नागरगोजे, वसंत निर्मळ, अनु जाती - कपील चोपडे, आर्थिक दुर्बल- बालासाहेब गुट्टे, व्यापारी मधून जुगलकिशोर लोहिया, नरसिंग सिरसाट तर हमाल मापाडी मधून राजाभाऊ मुंडे यांचा समावेश आहे.


   जवाहर शिक्षण संस्था निवडणूकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल असून पॅनलमध्ये ३२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. उर्वरित जागेसाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही पॅनलचे उमेदवार उद्या सायंकाळी ५ वा. गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. नंतर ५.३० वा. शहरातील मोंढा मैदानातील श्री हनुमान मंदिर येथे श्रीफळ फोडून दोन्ही पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे लोक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रचार समितीने केले आहे.


पंकजाताई घेणार मतदारांच्या भेटी

---------------

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पंकजाताई मुंडे उद्या प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित राहणार नाहीत तथापि त्या रविवारी २३ तारखे पासून शहरात तळ ठोकून असणार आहेत. या दरम्यान त्या  मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन पॅनलच्या उमेदवारांसाठी विजयाचे आवाहन करणार आहेत.

••••

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या