इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:अंजनवतीच्या श्री संत तुकाविप्र संस्थानमध्ये चोरी ; चोरट्यांच्या माराने दोन महिला गंभीर जखमी.

 अंजनवतीच्या श्री संत तुकाविप्र संस्थानमध्ये चोरी ; चोरट्यांच्या माराने दोन महिला गंभीर जखमी




  नेकनुर...



 बीड तालुक्यातील मौजे . अंजनवती येथील येडे वस्ती स्थित श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात आज 26 एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला . प्रतिकार करणाऱ्या दोन महिलांना मारहाण केली . त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . नेकनूर पोलिस घटनास्थळी ठाण मांडून असुन स्थानिक गुन्हे शाखा व श्वानपथक यांनी पाहणी केली . 

घरात झोपलेले पुजारी कृष्णा जोशी यांच्या रूमला बाहेरून कडी लावली त्याचवेळी शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या कृष्णा जोशी यांच्या पत्नी गीता जोशी ( वय ४५ ) यांच्या डोक्यात मारहाण केली . डोळ्याखाली जखम असुन सासु उषा प्रल्हाद लेले यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे डोक्याला मारहाण केली त्यांच्यावर बीड येथील फिनिक्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत . दीड तोळे सोने व काही रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे . नेकनुर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेख मुस्तफा , पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव , हवालदार राख तसेच लिंबागणेश पोलिस चौकीचे नागरगोजे , हवालदार सचिन डिडुळ घटनास्थळी ठाण मांडून असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय दुलत व त्यांची टीम तसेच श्वानपथक दाखल झाले असून पुढील तपास शेख मुस्तफा करत आहेत .

Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!