प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:परळीत आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आद्य शंकराचार्य चौक व प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे आनावरण

 ●आद्य शंकराचार्यांनी तब्बल १२५० वर्षांपुर्वी दिली होती  पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ क्षेत्रभेट ; स्मृतींना उजाळा !

•  परळीत आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आद्य शंकराचार्य चौक व प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे आनावरण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

          सनातन वैदिक हिंदू धर्माची ग्लानी दूर करून धर्माची पुन:र्स्थापना करणारे आद्य शंकराचार्यांच्या जयंती दिनाचे (दि.25) औचित्य साधून  परळीत आद्य शंकराचार्य चौक व आद्य शंकराचार्य प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे अनावरण आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ क्षेत्राला तब्बल बाराशे पन्नास वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी भेट दिल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या चौक व प्रदक्षिणामार्ग नामकरणामुळे आद्य शंकराचार्यांच्या पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र भेटीच्या स्मृतींना एक प्रकारे उजाळा मिळाला आहे.या परिसराचा परिपूर्ण विकास करण्याचे आश्वासन हा धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

             वैद्यनाथ नगरीत आद्य शंकराचार्य प्रदक्षिणा मार्ग व  चौकाच्या नामफलकाचे अनावरण आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.यावेळी वैद्यनाथ देवल कमेटीचे सचिव राजेश देशमुख,विश्वस्थ प्रा.बाबासर देशमुख,नागनाथकाका देशमुख, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे,तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,राजेंद्र सोनी,जयराज देशमुख,रमेश चौंडे,सचिन जोशी,रामभाऊ गोस्वामी,श्रीरामपंत जोशी,जितेंद्र नव्हाडे,मनोज रामदासी,राजीव तिळकरी प्रदीप अग्निहोत्री,श्रीपाद पाठक,दिनेश लोंढे,ऋषीकेश नागापूरे,सुरेश श्री अजिंक्य भालेराव,  प्रशांत नाईक,महेश देशपांडे, दीपक हिंदू ,दयानिधी खिस्ते, प्रल्हाद बिडगर,  बालाजी शहाणे ,मिलिंद देशपांडे, महेश विरदे , दीपक जोशी,दत्ता गोस्वामी,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

● आद्य शंकराचार्य १२५० वर्षांपूर्वी आले होते परळीत....!


              साधारण 1300 वर्षापूर्वी  हिंदुधर्मावर अन्य धर्मांचे आक्रमण व अन्य  कारणांमुळे धर्माला एक प्रकारे ग्लानी आली होती. आपले विचार, संस्कृती, राहणीमान, धार्मिकता बदलली गेली होती त्यावेळी हिंदु धर्माची पुनः स्थापना करण्याचे काम आद्य शंकराचार्य यांनी केले. अनेक मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.संपूर्ण भारत भ्रमण करत असताना त्यांनी 1250 वर्षापूर्वी परळीसही भेट दिली. या भेटीची नोंद ताम्रपत्रावर, भुजपत्रावर श्रंगेरी येथील मठात आहे. तसे एक पत्र वैद्यनाथ देवस्थानच्या दस्तावेजांतही उपलब्ध आहे. बारा ज्योतिर्लिंग यात्रा करताना पंचम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आद्य शंकराचार्य  हे परळीत आले होते. सनातन वैदिक हिंदू धर्मातील आद्य शंकराचार्यांना भगवान महादेवाचा अंश मानले जाते. त्यामुळे परळी वैद्यनाथ हेच पंचम ज्योतिर्लिंग असल्याचा निर्वाळा आहे. आद्य शंकराचार्यांनी परळी येथे भेट दिली होती. त्याचप्रमाणे परळी वैजनाथ मंदिरात आद्य शंकराचार्य यांचे मंदिरही जुन्या काळापासून आहे. आद्य शंकराचार्य आणि परळी वैजनाथ हा अतिशय पुरातन संबंध असून आद्य शंकराचार्य रचित ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्येही 'परल्याम् वैद्यनाथंच'  असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान परळी वैजनाथ येथे  आद्य  शंकराचार्यांच्या नावाने चौक व प्रदक्षिणामार्ग नामकरणामुळे आद्य शंकराचार्यांच्या पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र भेटीच्या स्मृतींना एक प्रकारे उजाळा मिळाला आहे.

Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या