इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:जीविताची सुरक्षितता: ‘व्हॉइस ऑफ मीडिया’कडून परळीतील पत्रकारांना अडिच कोटींचे विमा संरक्षण

 जीविताची सुरक्षितता: ‘व्हॉइस ऑफ मीडिया’कडून परळीतील पत्रकारांना अडिच कोटींचे विमा संरक्षण



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 21 - पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या वतीने पत्रकार व पत्रकार कुटुंब यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या  अनुषंगाने पत्रकारांच्या जीविताची सुरक्षितता व्हावी यादृष्टीने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’कडून परळीतील पत्रकारांना अडिच कोटींचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या संघटनेच्या पत्रकार बांधवांच्या हितासाठी कृतिशील कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

 

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी,राज्य कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, मराठवाडा कार्याध्यक्ष जालिंधर धांडे,मराठवाडा उपाध्यक्ष शुभम खाडे,मराठवाडा संघटक आनंद डोंगरे,जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परळीतील पत्रकारांचा विमा उतरवण्यात आला आहे. परळी शहर व तालुक्यात विविध प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या  पत्रकारास दहा लाख रूपये विमा संरक्षण यामाध्यमातून मिळणार आहे.दरम्यान परळीतल्या पत्रकारांना यातून तब्बल अडिच कोटींचे विमा संरक्षण यामाध्यमातून मिळणार आहे.


दरम्यान विमा प्रक्रियेसाठी परळी पोस्ट ऑफिसचे अधिकारी महेश चौंडे,कर्मचारी गजानन मोरे,नितीन संगेकर यांची उपस्थिती होती.तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील, कार्याध्यक्ष महादेव गित्ते,उपाध्यक्ष श्रीराम लांडगे, सरचिटणीस अशोक गलांडे,सहसरचिटणीस -अनिल देशमुख,कोषाध्यक्ष- महादेव शिंदे, कार्यवाहक - संतोष जुजगर,प्रसिद्धी प्रमुख - बालाजी ढगे यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमात परळी तालुक्यातील पत्रकारांचा विमा उतरविण्यात आला.

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या