MB NEWS:सर्व धर्मियांच्या कार्यक्रमांना लावली उपस्थिती

 पंकजा मुंडेंचं बीडमधील कार्यक्रमाचं असंही सोशल इंजिनिअरिंग!


सर्व धर्मियांच्या कार्यक्रमांना लावली उपस्थिती


बीड ।दिनांक २२।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा कार्यक्रमाच्या बाबतीतला  सोशल इंजिनिअरिंगचा अनोखा प्रयोग आज बीडकरांना पहावयास मिळाला. शहरातील सर्व धर्मियांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा व्यक्त केल्या.


  पंकजाताई मुंडे यांचं सायंकाळी शहरात आगमन झालं. भाजपचे नगरसेवक जगदीश गुरखूदे यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन त्यांच्या प्रभागातील विकास कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणूकीत सहभागी होऊन त्यांनी भगवान परशुराम यांना वंदन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले या  महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून महामानवांना अभिवादन केले. 


   रमजान ईद सणानिमित्त भाजप नेते सलीम जहांगीर यांनी आयोजित केलेल्या ईद मिलाप मध्ये सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !