प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:महसूल मंत्र्याच्या कार्यालयावर शेतकरी धडकणार

 ■भर उन्हाळ्यात अकोले ते लोणी किसान सभेचा पायी मोर्चा



●महसूल मंत्र्याच्या कार्यालयावर शेतकरी धडकणार


परळी / प्रतिनिधी


शेतकरी, शेतमजूर, श्रमिकांच्या मागण्यांसाठी, किसानसभेच्या नेतृत्वाखाली २६ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या काळात अकोले ते लोणी जिल्हा अहमदनगर असे तीन दिवसांच्या पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा राज्यव्यापी मोर्चा निघत आहे. राज्यभरातील शेतकरी वर्गाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हा पायी मोर्चा निघत आहे.मागण्या मान्य न झाल्यास पायी मोर्चानंतर दि २८ एप्रिल रोजी लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन सुरू केले जाणार आहे.केवळ आश्वासन आणि घोषणाबाजी याला कंटाळून गेलेले बीड जिल्ह्यातील असंख्य शेतकरी या पायी मोर्च्यात सहभागी होणार आहेत.


Click:■ *पंकजा मुंडेंचं बीडमधील कार्यक्रमाचं असंही सोशल इंजिनिअरिंग!*



अखिल भारतीय किसान सभा सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निदर्शने,आंदोलन करीत असून याची दखल घेत काही अंशी शेतकऱ्यांच्या काही मागण्या पदरात पाडून यशस्वी झाली आहे.बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा विमा प्रश्नावर किसान सभेने तालुकाच्या तहसील पासून ते दिल्लीच्या संसदेपर्यंत पाठपुरावा केला.गतवर्षी जिल्ह्यातील सिरसाळा ते बीड पायी दिंडी काढली, ऐन दिवाळी मध्ये तालुक्यातील अनेक तहसील कार्यालयावर शिमगा आंदोलने केली.किसान सभेच्या या सततच्या रेट्याने शेतकऱ्यांचे काही प्रश्न निकाली निघाले आहेत.


सुरू असलेल्या हंगामात सततचा पाऊस,अवकाळी पाऊस, गारपीट अनुदान,७/१२ नोंदी, वारस नोंदी, खाते फोड रस्ते वहिवाट, वहिवाट नोंदी, पीक पाहणी नोंदी व जमीन मोजणी प्रक्रिया सरळ व्हावी,सरकारी, गायरान, गावठाण, मुलकी फॉरेस्ट, तळ जमिनी राहणाऱ्यांच्या नावे करावी,देवस्थान, इनाम, वक्फ, वरकस, गायरानआकारीपड जमिनी नावे करावीत, शेतीला अखंड 12 तास वीज पुरवठा, कर्जमाफी,शेत मालास मूलभूत हमीभाव, शेतमालाचे भाव पडण्याचे कट कारस्थान थांबविण्यात यावे यासह इतर मागण्या घेऊन राज्यातील शेतकरी पुन्हा एखादा किसान सभेच्या लाल झेंड्याला घेऊन पायी मोर्चा काढत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या केवळ जाहिरातबाजीला कंटाळून गेलेले बीड जिल्ह्यातील असंख्य शेतकरी अकोले ते राज्याचे महसूलमंत्री ना.विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर जीवन-मरणाच्या प्रश्नावर भर उन्हात पायी मोर्च्यात सहभागी होणार आहे.संपूर्ण बीड जिल्ह्यात या पायी मोर्चा बाबत शेतकरीच गावागावात जाऊन जनजागृती करत मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.

●●●●●●●●●●●●●●

बीड जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असून राज्य व केंद्र सरकार केवळ आश्वासनाची खैरात आणि जाहिरातबाजी करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे.सततचा पाऊस, अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.यातून कसे-बसे उत्पादित झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा आदी पिकांचे भाव पाडण्याचे कट कारस्थान सरकार करत आहे,शेतीला सलग वीज पुरवठा करण्यात येत नाही. पीक विमाच्या प्रश्न जैसेच्या तैसे आहे. यासह अनेक मागण्या घेऊन जिल्ह्यातील शेतकरी राज्याचे महसूल मंत्री यांच्या लोणी या ठिकाणी असलेल्या कार्यालयावर भर उन्हाळयात पायी मोर्चा काढून धडकणार आहे.

-एड.अजय बुरांडे

जिल्हाध्यक्ष ,अखिल भारतीय किसान सभा, बीड


Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या