MB NEWS:गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन पॅनलच्या उमेदवारांनी केली प्रचाराला सुरवात

 पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील मार्केट कमिटी, जवाहर शिक्षण संस्था पॅनलच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ








गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन पॅनलच्या उमेदवारांनी केली प्रचाराला सुरवात


परळी वैजनाथ ।दिनांक २२।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील कृषी उत्पन्न बाजार समिती व जवाहर शिक्षण संस्था निवडणूकीतील पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मोठया थाटात झाला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही निवडणूकीतील उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली. 


    परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागेसाठी २८ एप्रिल रोजी तर जवाहर शिक्षण संस्थेच्या ३२ जागांसाठी ६ मे रोजी  मतदान होत आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीसाठी लोकनेते शेतकरी विकास पॅनल तर जवाहर साठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पंकजाताई मुंडे प्रचार शुभारंभाला उपस्थित राहू शकल्या नाहीत तथापि, उद्यापासून त्या मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार करणार आहेत. 



  आज या दोन्ही पॅनलच्या सर्व उमेदवारांनी एकत्रित येऊन  सायंकाळी गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले व त्यानंतर शहरातील मोंढा मैदानातील श्री हनुमान मंदिर येथे श्रीफळ फोडून दोन्ही पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ केला. माजी आमदार आर टी देशमुख, ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे, राजेश देशमुख, दत्तापा इटके, विकासराव डुबे,  भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, डाॅ.हरिश्चंद्र वंगे आदींसह  भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे लोक प्रतिनिधी उपस्थित होते.

••••

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार