MB NEWS: डॉ. क्षितीजा काळे यांची तहसीलदारपदी पदोन्नती

 डॉ. क्षितीजा काळे यांची तहसीलदारपदी पदोन्नती




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या परळीच्या भूमीकन्या डॉ. क्षितीजा काळे (वाघमारे) यांची तहसीलदारपदी पदोन्नती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल डॉ. काळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

       महाराष्ट्र शासनाने काल एका आदेशान्वये नायब तहसीलदार या पदावर काम करणाऱ्यांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये परळीच्या पंचशील नगरमधील रहिवासी असलेल्या डॉ. क्षितीजा काळे - वाघमारे यांचे शालेय शिक्षण श्री सरस्वती विद्यालय पंचशील नगर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लातुर येथे झाले आहे. वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे. 

       डॉ. क्षितीजा काळे - वाघमारे यांनी परळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन केले जात आहे.

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!