इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:◆किसान सभा, पायी मोर्चावर ठाम

 राज्यशासनासोबत चर्चा अयशस्वी;महसूल मंत्र्यांसोबतची बैठक अनिर्णित


◆किसान सभा, पायी मोर्चावर ठाम


परळी / प्रतिनिधी


अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च केल्यानंतर बाकी प्रलंबित शेतीप्रश्नांसाठी किसान सभेने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर राज्यभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाला राज्यभरातून शेतकरी ,शेतमजूर, श्रमिकांचा

उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रत्यक्ष मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील याचा अंदाज वर्तवला जात असताना राज्य सरकारने समोपचाराने घेत किसान सभेच्या शिष्टमंडळाला मंगळवार दि 25 रोजी सह्याद्री अतिथीगृहवर चर्चेसाठी आमंत्रित केले.चर्चेत किसान सभेकडून डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, कॉ.उमेश देशमुख, कॉ. उदय नारकर, कॉ.संजय ठाकूर, कॉ.किसन गुजर, कॉ.अमोल वाघमारे आणि कॉ.एड.अजय बुरांडे आदी तर राज्यशासनातर्फे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल सचिव, दुग्ध विकास सचिव व ईतर संबंधित खात्याचे अधिकारी हजर होते.


किसान सभा आणि राज्य शासन यांच्यात ही चर्चा बैठक सुमारे 3 तास झाली या चर्चा बैठकीत सकारात्मक चर्चा जरी झाली असली तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने किसान सभा शेतकऱ्यांचा पायी मोर्चावर ठाम असून दि २६ एप्रिल रोजी अकोले येथून नियोजित वेळेला निघेल व लोणी येथील महसूल मंत्र्याच्या कार्यालयावर २८ एप्रिलला पोहोचणार आहे.जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा पायी मोर्चाचे रूपांतर बेमुदत महामुक्काम आंदोलनात होणार आहे.संपूर्ण राज्यभरातून हजारो शेतकरी या पायी मोरच्यात सहभागी होऊन आंदोलन करणार आहे.

Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!