प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:जिल्ह्यासाठी 25 व 26 एप्रिल रोजी ऑरेज अलर्ट जारी !

 जिल्ह्यासाठी 25 व 26 एप्रिल रोजी ऑरेज अलर्ट जारी  !




विजांचा कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता


बीड, दि.24,(जि.मा.का.) :- प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 24 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार बीड जिल्हयासाठी दि. 25 एप्रिल व 26 एप्रिल 2023 या दिवसासाठी ऑरेज (Orange) अलर्ट जारी केला आहे. तसेच 24, 27, आणि 28 एप्रिल 2023 या दिवसासाठी येलो  (Yellow) अलर्ट जारी केला असून 25 ते 26 एप्रिल 2023 रोजी जिल्ळयात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह सोसाटयाचा वारा आणि वेगवेगळया ठिकाणी गारपीट होण्याची शक्य्ता आहे. तसेच 24,27, 28 एप्रिल 2033 रोजी जिल्हयात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलामीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून खबरदारीचा उपाय म्हणून पुढीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी असे निवासी उपजिल्हाधिकारी संताष राऊत यांनी कळविले आहे.

या गोष्टी करा :-  विजेच्या  गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा, जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा, आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या, घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओटयावर थांबु नका, आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तु त्वरित बंद करा, तारांचे कुंपण, विजेचा खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा, पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातुन बाहेर पडा.


       या गोष्टी करु नका:- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लॅडलाईन फोनचा वापर करु नका, शॉवरखाली अंघोळ करु नका, घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर करु नका, विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालु असतांना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबुमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.  उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका, धातुच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका, जर आपण घरात असाल तर उघड्या दारात अथवा खिडकीतून वीज पडतांना बाहेर पाहू नका, हे बाहेर थांबणे इतकेच धोकादायक आहे.

..................


Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या