इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुदास वृद्धाश्रमात घेण्यात आले विविध कार्यक्रम

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुदास वृद्धाश्रमात घेण्यात आले विविध कार्यक्रम 

परळी,( प्रतिनिधी):- सामाजिक न्यायपर्व अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुदास सेवाश्रम संचलित गुरुदास वृद्धाश्रम येथे दि. 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2023 दरम्यान सप्ताह निमित्त निराधार वृद्धांना कपडे, व फळे वाटप, आरोग्य शिबिर, किर्तन भजन अशा विविध प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


या कार्यक्रमासाठी विश्वस्त व्यवस्थापक दास लालजी महाराज सरचिटणीस सुरेश टाक, अध्यक्ष नरहरी शहाणे, कोषाध्यक्ष यमुनाबाई सोनवणे, संचालक भास्कर मामा चाटे, बाळासाहेब देशमुख, सुभाष चव्हाण, नारायण देव गोपनपाळे, व आश्रमातील सर्व कर्मचारी वृंद सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र घाटनांदुर येथील डॉ. माले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गुरुदास सेवा आश्रमातील वृद्ध नागरिकांची  तपासणी केली. चंद्रकांत दहिफळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर मान्यवरांचे आभार सुनीता डहाळे यांनी मानले.


Video 








Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!