पोस्ट्स

इमेज
  परळीकरांचा दणका : डाॅ.संतोष मुंडेंचे पार्सल पडले भारी ; सुनील शेट्टीने मागितली शेतकऱ्यांची माफी                टोमॅटोच्या किंमती गगनात भिडल्या असताना अभिनेता सुनील शेट्टीने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती.पण त्यावर आता शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याने त्यांची माफी मागितली आहे.     सुनील शेट्टीची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे, काही दिवसांपूर्वीच सूनीलने टोमॅटो आणि त्यांच्या वाढत्या किमतीवर विधान केले होते. सुनील शेट्टीने नुकतेच टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. जेव्हा अभिनेत्याने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले तेव्हा सोशल मीडियावर त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. याच कारणामुळे सुनील शेट्टीला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता ट्रोलिंगला कंटाळलेल्या अभिनेत्याने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.        टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर आपले मत व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, या गोष्टीचा परिणाम त्याच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. सुनील शेट्टीने त्याच्या आधीच्या विधानात म्हटले होते की त्याने अलीकड
इमेज
  वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथील सुरक्षागार्ड ची मुलगी कु.मयुरी राहुल रोडे कृषी विद्यापीठ अंबाजोगाई तालुक्यातून प्रथम परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले व सध्या पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे सुरक्षागार्ड म्हणून काम करत असलेले राहुल रोडे यांची मुलगी कु.मयुरी राहुल रोडे ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ,परभणी संलग्न कृषी तंत्र विद्यालय, अंबाजोगाई या काॅलेज मधुन अंबाजोगाई तालुक्यातून मुलींमध्ये प्रथम आलेली आहे. तरी तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिचा आज रोजी 18/07/23 निकाल लागला असून कु.मयुरी रोडे हिने या परीक्षेत 71.38% गुण घेऊन घवघवीत यश संपादित केले आहे. मयुरी हिने इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षण हे परळी येथील विध्यावर्धिनी विद्यालय येथे केले होते. कृषी डिप्लोमा अंबाजोगाई येथे झालेला आहे तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक श्री खळगे सर ,याच्या मार्गदर्शना मुळे आज तिला यश मिळाले आहे. लहानपणापासूनच अत्यंत गुणी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तिने यश संपादन केलेले होते अत्यंत हलाखीची परिस्थिती व घरा

थेट बससेवा सुरू करण्याची ना.धनंजय मुंडे यांच्याकडे भाविक-भक्तांची मागणी

इमेज
 श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर, कपीलधार थेट बससेवा सुरू करण्याची ना.धनंजय मुंडे यांच्याकडे भाविक-भक्तांची मागणी परळी वैजनाथ /प्रतिनिधी       प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर,कपीलधार(मांजरसुंभा)नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी श्री.वैजनाथ मंदीर देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह भाविक-भक्तांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.   श्रावण तसेच अधिक मासानिमित्त मोठया प्रमाणात लिंगायत समाजासह सर्व जाती-धर्माचे व ईतर राज्यातूनही भाविक-भक्त प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी येथील दर्शन घेऊन श्रीसंत मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्याकरिता कपीलधार(मांजरसुंभा) येथे जात असतात तसेच याठिकाणीतील निसर्गरम्य पर्वत टेकडयांमधून वाहणारा नैसर्गिक धबधबाही पर्यटकांसाठी आकर्षित करणारा आहे परंतू याठिकाणी जाण्यासाठी परळी येथून थेट बससेवा नसल्यामुळे
इमेज
  शेतक-यांना खतासंबंधी तक्रार करण्यासाठी व्हाट्स ॲप  क्रमांक सुरु करा -धनंजय मुंडे यांचे कृषी विभागाला निर्देश महाराष्ट्र कापुस बियाणे कायदयात सुधारणा करण्याची गरज मुंबई, दि १७:-  खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या  अशा खत विक्रेत्यांविरुद्ध  शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ  व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला यावेळी श्री मुंडे बोलत होते.  या बैठकीला अपर मुख्य सचिव  अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील,  संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.   शेतक-यांनी  सदर व्हट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्याती

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वक्तृत्व कला विकास शिबीरास मोठा प्रतिसाद

इमेज
  भाषण आणि जनसंपर्कातून व्यक्तीमत्वातून विकास होतो-बालाजी जाधव राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वक्तृत्व कला विकास शिबीरास मोठा प्रतिसाद परळी/ प्रतिनिधी- सार्वजनिक क्षेत्रात वावरत असतांना आपण कसा जनसंपर्क करतो, लोकांशी बोलतांना आपली देह बोली कशी असते हे अत्यंत महत्वाचे असून जनसंपर्क व भाषणकला आपल्या व्यक्तीमत्व विकासाला चालना देणारी असते. भाषण करणे म्हणजे केवळ व्यासपीठावर जावून माईक समोर उभे राहणे नसते तर आपल्या भाषणातून आवश्यक असलेला मुद्दा प्रकर्षाने मांडणे ही कला असते. भाषणबाजी ही एक कला असून त्यातील बारकावे जर अभ्यासले तर आपणही एक चांगले वक्ते म्हणून जगासमोर येऊ शकतो असेही बालाजी जाधव म्हणाले. राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध वक्ते आणि भाषण कलेचे प्रशिक्षक बालाजी जाधव यांच्या वक्तृत्व कला विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संपादक चंदुलाल बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास बंसल क्लासेसचे प्रा.विष्णू घुगे, संतोष जायभाये, मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, जय
इमेज
  मंत्री ना. धनंजय मुंडे यांचे कैलास फड यांच्या वतीने अभूतपूर्व स्वागत परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात व परळी दौऱ्यावर प्रथमच आले असता यानिमित्ताने कैलास फड यांच्या वतीने कण्हेरवाडी येथे भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.            उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर परळी दौऱ्यावर आले असता त्यांचा कन्हेरवाडी व बँक कॉलनी येथे अभूतपूर्व स्वागत करून सत्कार करण्यात आले. तसेच ना.धनंजय मुंडे यांना कृषिमंत्री मंत्रालय मिळाल्याबद्दल मुंबई येथे सत्कार करण्यात आला.         यावेळी वसंत (तात्या) मुंडे, मधुकर (तात्या) मुंडे, आनंत फड, भास्कर फड, अक्षय रोडे, निखिल भैया फड, वसंत फड, बाबासाहेब फड, अभी बळवंत, प्रकाश फड, संतोष फड, धीरज फड, गणेश फड, दिलीप फड, सोमनाथ पांचाळ, गणेश कराड, विकी डहाळे, महादेव ढाकणे, कार्तिक मुंडे, जयपाल रोडे, अक्षय रोडे, आ

तीन दिवस इष्टलिंग महापुजा व अनुष्ठान

इमेज
  श्रीशैल जगद्गुरूंची तीन दिवस धर्मसभा व अनुष्ठान; स्वागत रॅली : मोठ्या संख्येने सहभागी व्हा - विकास हालगे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           अधिक मासानिमित्त वीरशैव समाज परळी च्या वतीने श्री श्री श्री 1008 सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल यांच्या उपस्थितीत ईष्टलिंग महापूजा व तीन दिवसीय अनुष्ठानचे परळीत आयोजन करण्यात आले आहे . 20 जुलै रोजी स्वागत रॅली काढून जगद्गुरु यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे. तथा वीरशैव विकास प्रतिष्ठान सह सचिव विकास हालगे  यांनी केले आहे.            गुरुवार दिनांक 20 जुलै ते शनिवार दिनांक 22 जुलै 2023 पर्यंत हा सोहळा चालणार आहे . यावेळी अनेक शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत.येथील हालगे गार्डन मधील अनुष्ठान सोहळ्यात तीन दिवस श्रीशैल पिठाच्या जगद्गुरूंच्या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे .20 ,21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता तर 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता धर्म सभा ( धर्मोपदेश) होणार आहे. तसेच 21 जुलै रोजी स

आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल, अशी तरतूद कायद्यात करणार

इमेज
  बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार - धनंजय मुंडे आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल, अशी तरतूद कायद्यात करणार, याच अधिवेशनात कायदा लागू करणार मुंबई (दि. 17) - राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली. ज्याप्रमाणे बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटक नाशकांच्या बाबतीतही लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्य

राधा मोहन साथी प्रतिष्ठान पुण्याचे काम करीत आहे-डॉ.अरूण गुट्टे

इमेज
  राधा मोहन साथी प्रतिष्ठान पुण्याचे काम करीत आहे-डॉ.अरूण गुट्टे कृत्रिम हात आणि पाय शिबीरास मोठा प्रतिसाद, 78 दिव्यांगाना मिळणार हात व पाय परळी/प्रतिनिधी सर्वसाधारणपणे इश्वर प्रत्येकाला एक सारखेच स्वरूप देत असतो परंतू शारिरीक अवस्थेला छेद देणार्‍या गोष्टी अपवादाने घडत असतात. अशा व्यक्तींना आपण दिव्यांग म्हणून ओळखतो. अशा या दिव्यांग व्यक्तींना राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने साधु वासवानी मिशनच्या माध्यमातून कृत्रिम हात व पाय दिले जाणार असून हे खर्‍या अर्थाने पुण्याचे काम आहे असे मत परळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांनी व्यक्त केले. राधा मोहन साथी प्रतिष्ठान व साधु वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने आज कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 78 जणांना 13 ऑगस्ट रोजी कृत्रिम हात व पाय बसवून दिले जाणार असून आज या सर्व दिव्यांग जणांच्या अवयवांचे मोजमाप साधु वासवानी मिशनमधील डॉक्टर मंडळींनी घेतले आहेत.  आज वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहत येथे राधा मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित कृत्रिम हात व पाय शिबीराचे उदघाटन डॉ.अरूण गुट्टे, डॉ.संतोष मुंडे, नायब त

दाऊतपुर येथे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

इमेज
  आगामी काळात जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणार- सरपंच कांताभाऊ फड दाऊतपुर येथे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला ग्राम पंचायतच्या वतीने सात टि. व्ही. संच भेट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस दाऊतपुर ग्राम पंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळेला सात टी. व्ही. संच व वृक्षारोपण करून व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. असल्याची माहिती सरपंच कांताभाऊ फड व विकास बिडगर यांनी दिली. आगामी काळात जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात येणार असल्याचेही फड व बिडगर म्हणाले.         राज्याचे नुतन कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांचा शनिवार दि. 15 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस दाऊतपुर ग्राम पंचायतच्या वतीने अभिनव उपक्रमाने साजरा करण्यात आला. ना. मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दाऊतपुर ग्रामपंचायत गावातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकत आहे. शनिवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शाळेतील सर्व वर्गांना प्रत्येकी 43 इंची एक टी. व्ही. संच भेट देण्यात आला.        दाऊतपुर जिल्हा परिषद शाळेती
इमेज
  १७ तारखेला   दुहेरी संयोग: दीप अमावस्या व सोमवती अमावस्या एकत्र आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्या साजरी केली जाते. आषाढी अमावास्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते. अमावस्येच्या रात्री अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते.  अमावस्या ची सुरुवात नेमकी कधी?  दिनदर्शिकेत १६ जुलै रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी अमावस्येची तिथी सुरू होणार असे दर्शवले आहे. मात्र अमावस्येची तिथी १७ जुलैचा सूर्योदय पाहणार असल्याने आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या १७ तारखेला साजरी केली जाईल आणि १७ ला मध्यरात्री १२ वाजता अमावस्या संपेल.  आषाढ अमावस्या सोमवारी आल्यामुळे ही दीप अमावस्या सोमवती अमावस्या सुद्धा असणार आहे त्यामुळे ही अमावस्या खास आहे विशेष आहे. दीप अमावस्या कशी साजरी करावी दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने
इमेज
नामदेव-जनाबाई गजरी;अवघी दुमदुमली पंढरी पंढरपूर (प्रतिनिधी) : नामदेव-जनाबाई भजनाने अवघे पंढरपूर दुमदुमून निघाले. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या महासंजीवन सोहळ्यानिमित्त श्री संत कैकाडी महाराज मठ ते नामदेव पायरीपर्यंत दिंडी काढण्यात आली. संत कैकाडी महाराज यांचे वंशज आणि मठाधिपती भारत महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच निघालेल्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कीर्तनकार, प्रवचनकार,  गायक, वादक आणि वारीकरी सहभागी झाले होते. श्री संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक ! त्यांच्या कार्याची पताका भारतभर फडकत आहे. पण त्यांचा समाधी सोहळा कधी येतो आणि कधी जातो ते अनेक कीर्तनकारांनाही कळत नाही. खरं तर बहुजन समाजातील कीर्तनकार आज जे महाराज म्हणवून घेत गाड्या उडवत आहेत, त्याचे श्रेय नामदेव महाराज यांना द्यावेत लागेल. कारण पहिले वारकरी कीर्तन नामदेव महाराज यांनी केले.  आज गायक मंडळी भजन म्हणत आहेत, त्याचे श्रेयही नामदेव महाराज यांनाच जाते. कारण पहिला अभंग नामदेव महाराज यांनीच लिलिला आहे.तरिही नामदेव महाराज यांच्या बद्द्ल तितकी आस्था या गायक - कीर्तनकारांना द

तीन दिवस धर्मसभेचे आयोजन

इमेज
  श्रीशैल जगद्गुरूंच्या स्वागताची परळीत जय्यत तयारी सुरू, तीन दिवस धर्मसभेचे आयोजन, दि 20 रोजी स्वागत रॅली  परळी ,अधिक मासानिमित्त वीरशैव समाज परळी च्या वतीने श्री श्री श्री 1008 सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल यांच्या उपस्थितीत ईष्टलिंग महापूजा व तीन दिवसीय अनुष्ठानचे परळीत आयोजन करण्यात आले आहे . 20 जुलै रोजी स्वागत रॅली काढून जगद्गुरु यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची परळी जय्यत तयारी चालू आहे गुरुवार दिनांक 20 जुलै ते शनिवार दिनांक 22 जुलै 2023 पर्यंत हा सोहळा चालणार आहे . यावेळी अनेक शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत.येथील हालगे गार्डन मधील अनुष्ठान सोहळ्यात तीन दिवस श्रीशैल पिठाच्या जगद्गुरूंच्या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे .20 ,21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता तर 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता धर्म सभा ( धर्मोपदेश) होणार आहे. तसेच 21 जुलै रोजी सकाळी 7 वाजता व 22 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 वाजता ईष्टलिंग महापूजा व दाम्पत्य पूजा होणार आहे .दिनांक 22 जुलै रोजीसकाळी 9 ते 1 धर्मोपदेश व नंतर महाप्रसादाने सांगता ह

दुख:द: निधन वार्ता

इमेज
  मुन्ना जयस्वाल यांना बंधूशोक; सोनू जयस्वाल यांचे निधन परळी / प्रतिनिधी औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचारी बलवीर जयस्वाल यांचे  सुपुत्र तसेच मुन्ना जयस्वाल यांचे छोटे बंधू सोनू बलवीर जयस्वाल यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३७ वर्षे होते.           एका खाजगी दवाखान्यात  उपचार सुरू होता. रात्री सुट्टी झाली होती. आज दि १६ जुलै रोजी दुपारी  निधन झाले.रात्री ९:३० वाजता सार्वजनिक समशान भूमी, वैद्यनाथ मंदिर परिसरात पार्थिवावर  परळी वै.येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सोनू  जयस्वाल यांच्या पश्चात आई ,वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे.

उत्तुंग झेप:आयआयटीत मिळवला प्रवेश

इमेज
  परळीच्या विद्यार्थ्यांची जेईईत उत्तुंग झेप: आयआयटीत मिळवला प्रवेश; सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्याकडून कौतुक परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        देशपातळीवरील कठिण समजल्या जाणाऱ्या जेईईत मेन्स व जेईईत ॲडव्हान्स अशा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये चि.ॠषभ राजेंद्र लोढा या परळीच्या विद्यार्थ्याने प्रवेश मिळवला आहे. परळीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असुन त्याचे या यशाबद्दल सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्याकडून कौतुक केले आहे.       परळीचा चि.ॠषभ राजेंद्र लोढा याने जेईईत मेन्स व जेईईत ॲडव्हान्स  या देशातील अतिशय कठीण अशा परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.त्याचा आय.आय.टी. (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.परळीकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.चि.ॠषभ राजेंद्र लोढा याचे राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांची स्वाक्षरी असलेले मानपत्र सौ.राजश्री धनंजय  मुंडे यांच्या हस्ते देवून गौरव करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या ध
इमेज
  संपादक ज्ञानोबा सुरवसे यांना बंधूशोक;तातेराव सुरवसे यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दै. महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे यांचे बंधू तातेराव नामदेवराव सुरवसे यांचे र्‍हदयविकाराचा तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 55 वर्षे होते.        कामानिमित्त तातेराव सुरवसे हे उस्मानाबाद येथे गेले असता अचानक त्यांना र्‍हदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात नेले असता उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. कै. तातेराव सुरवसे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी नागडगाव (ता. माजलगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.       कै. तातेराव सुरवसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, भावजयी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आकर्षक विद्युत रोषणाई

इमेज
 ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त चंदुलाल बियाणी यांच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई  परळी वैजनाथ, प्रतिनिधी        राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज परळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.              महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री म्हणून नुकतीच ना. धनंजय मुंडे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. योगायोग म्हणजे आज दिनांक 15 रोजी त्यांचा वाढदिवसही होता. यानिमित्ताने माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी परळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई केली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी  महापुरुषांच्या पुतळ्यांना तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, मौलाना आझाद चौक आदी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.  यामुळे संपूर्ण परिसर झगमगाटून  गेला आहे.

मी शेतकऱ्याचा मुलगा, कृषी खाते मिळणे हेच वाढदिवसाचे गिफ्ट!

इमेज
  वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात!  सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा मागेल त्याला शेततळे व ड्रीप देण्यासाठी आलेले सर्व अर्ज तात्काळ निकाली काढा - मुंडेंचे विभागाला निर्देश एक रुपयात पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे *बोगस बियाण्यांच्या रॅकेटवर धडक कारवाया करण्याचे निर्देश* मी शेतकऱ्याचा मुलगा, कृषी खाते मिळणे हेच वाढदिवसाचे गिफ्ट! कृषी विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढवणार मुंबई (दि. 15) - राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची नियुक्ती होताच आज पहिल्याच दिवशी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाची चार तास आढावा बैठक घेतली. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस व सुट्टीचा दिवस असताना देखील मंत्रालय उघडून त्यांनी शेतकरी हितार्थ निर्णयाला प्राधान्य दिले. कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप ( ठिबक सिंचन) , शेड नेट अशी योजना आहे. मात्र त्यामध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांवर असून विभागामार्फत दहा-दहा हजार शेतकऱ्यांची लॉटरी काढली जाते. लॉटरी काढायची असेल तर मग त्याला मागेल त्याला शेततळे, असे कस

निधी समर्पण सोहळा

इमेज
  भेल संस्कार केंद्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि निधी समर्पण सोहळा    परळी वैजनाथ......               येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित, एक संस्कारक्षम पिढी घडविणारी, एकमेवाद्वितीय भेल संस्कार केंद्रात  इ. स. 2022 - 23 या वर्षातील सीबीएसई आणि स्टेट पॅटर्न इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मा. श्री. अप्पाराव यादव      ( मुख्याध्यापक, खोलेश्वर विद्यालय,अंबाजोगाई)यांची प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.विकासराव डुबे यांनी  भूषविले.या कार्यक्रमाची सुरूवात श्री.राहुल सर आणि त्यांच्या संघाने सरस्वतीस्तवन व सामूहिक पद्य सादर केले.( बलसागर भारत होवो...........)          त्याचप्रमाणे भेल संस्कार केंद्राचे श्री. विकासराव डुबे (अध्यक्ष, स्थानिक समन्वय समिती) यांचे ज्येष्ठ पुत्र स्व. अजित विकास डुबे यांच्या स्मृतीसमारोहाप्रसंगी प्रथम प्रतिमापूजन आणि साश्रू नयनांनी भावपूर्ण अभिवादन मान्यवर, सर्व उपस्थित भेल परिवार,

अभिष्टचिंतन लेख:✍️बालाजी ढगे >>>>>>परळी मतदारसंघाचे विकासभिमुख नेतृत्व; ना. धनंजय मुंडे

इमेज
  परळी मतदारसंघाचे विकासभिमुख नेतृत्व; ना. धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात अत्यंत सक्रीयपणे कार्यरत आहेत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करीत असतांना त्यांनी सर्वाधिक वेळ सामाजिक क्षेत्रासाठी दिला आहे. परळी तालुक्यातील सामुदायिक विवाह सोहळा, वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव, शिव जन्मोत्सव, भिम महोत्सव, खुल्या क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत असतांनाच कोरोना लॉकडाऊन कालावधीत केलेले काम अत्यंत मोलाचे आणि हजारो जीव वाचविण्यासाठी उपयुक्त ठरलेले आहेत. सामुदायिक विवाह सोहळा हा माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा सर्वात मोठा उत्सव म्हटले तर वावगे ठरणार नाही. 2000 पेक्षा अधिक मुला मुलींचे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह पार पाडण्यात आले आहे. मणी मंगळसुत्र, संसारोपयोगी साहित्य देण्यासोबत मोठया उत्साहात हा सोहळा त्यांनी पार पाडला आहे. एक भाऊ म्हणून हजारो मुलींसाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे हे पुढे आलेले आहेत. परळी शहर किंबहुना बीड जिल्हयात या सामुदायिक विवाह सोहळयाची नेहमीच चर्चा होत होती. अर्थातच

अभिष्टचिंतन लेख:✍️मोहन भोसले, सातारा >>>>>मैत्रीतला 'कोहिनूर' : ना. धनंजय मुंडे एक 'मित्रमाणूस'

इमेज
  मैत्रीतला 'कोहिनूर' : ना. धनंजय मुंडे एक 'मित्रमाणूस'        ना धनंजय मुंडे यांच्या मधील असलेला एक मित्रमाणुस ! आम्हा मित्र परिवार हा१९९२ मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आणि विविध स्तरातून शिक्षणा साठी एकत्र भेटलो!ते आज तागायत एकत्र मैत्री टिकून आहे(३१ वर्षे पुर्ण)या प्रवासात आम्ही पाहिलेला अनुभवलेला सुरुवातीला आम्ही पुण्या मध्ये सिम्बयोसिस महाविद्यालय आणि बारामती हॉस्टेल या ठिकाणी एकत्र १९९२ ला भुषण पटेल अमरावती,विशाल पाटील, रणधीर पाटील, विशाल जाधव,अकलूज, सुशील पंडित, रणवीर रावल नंदुरबार कै,अनंत पाटील उदगीर आणि उमेश चव्हाण भोळी खंडाळा(त्यांचा अत्यंत जीव यांच्यावर)दुर्दैवाने ते आमच्यात सध्या नाहीत तसेच सचिन शहाणे बीड आणि त्यांचे बालपणीचे मित्र सुंदर गित्ते, अनिल मुंडे, ओम देशमुख परळी,तुषार कोठावदे, राजु कोठावदे नाशिक,अमोल झगडे आणि योगेश जगताप बारामती असा पहिला कॉलेज मधला खास ग्रुप!नंतर २००३ मध्ये राकेश मिटकरी, अशोक चांदगुडे, निळखंठ पालवे आणि बरेच मित्र एकत्र आलो तो आजपर्यंत एकत्र आहोत,धनंजय मधला मित्रत्वाचा स्वभाव आज त्यांच्या जन्म दिना निमित्त सांगावा वाटतो!म्हण

अभिष्टचिंतन लेख: ✍️ प्रदीप खाडे >>>राजकारणासह शिक्षण, कला-साहित्य-क्रीडा क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तिमत्त्व : शिक्षणप्रेमी ना.धनंजय मुंडे

इमेज
  राजकारणासह शिक्षण, कला-साहित्य-क्रीडा क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तिमत्त्व : शिक्षणप्रेमी ना.धनंजय मुंडे ‘शिक्षण हे वाघिणींचं दूध आहे, जो ते प्राशिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीला कृतिशील जोड देऊन काम करणारं नेतृत्व म्हणजे ना.धनंजय मुंडे.आजही कित्येक उपेक्षित बांधव शिक्षणाच्या परिघाबाहेर आहेत. बदलत्या कालानुरूप त्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त होणं हा त्यांचा हक्क आहे. शिक्षणप्रेमी ना.धनंजय मुंडे हे शिक्षणविषयक ध्येय - धोरणांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असतात हे नेहमीच दिसते. ना.धनंजय मुंडे यांचं व्यक्तिमत्त्व अनेकविध पैलूंनी व्यापलेलं आहे. आपल्या व्यापक अनुभव व चिंतनातून त्यांनी सामाजिक, राजकीय, अर्थिक, शिक्षण, क्रिडा या विषयांमध्ये विपूल प्रमाणात काम केले आहे.राजकारणासह शिक्षण, कला- साहित्य-क्रीडा या क्षेत्रातील त्यांचा कृतीयुक्त व्यासंग, दैदिप्यमान म्हणून अधोरेखित आहे. त्यांच्या व्यासंगातील एकेक पैलू अनुकरणीय आणि पथदर्शक असाच आहे. विद्यार्थी चळवळ, युवामोर्चा, खेळाडू, पालक व एक शिक्षण प्रेमी नेता हे पैलू वारंवार दिसून येतात. नाथ प्रत

वाराणसी (काशी) येथे खास निर्माण करण्यात आलेले शिवलिंग

इमेज
  अद्वैत भेट: ना.धनंजय मुंडेंना 'तेजोमय शिवस्वरुप' देत वाल्मिकअण्णांनी केले स्वागत परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळीत आले असतांना बीड जिल्ह्यात अभुतपूर्व स्वागत झाले. या अनुषंगानेच एक आत्मिय व अनुपम स्वागत अधोरेखित झाले. उत्कृष्ट नियोजनातील कल्पकता, भव्यता,दिव्यता यासाठी ओळख असलेले वाल्मिकअण्णा कराड यांनी ना.धनंजय मुंडे यांचे अनुपम स्वागत केले.ना.धनंजय मुंडेंना  'तेजोमय शिवस्वरुप' देत वाल्मिकअण्णांनी केलेले  स्वागत ही 'अद्वैत भेट' ठरली.         ना.धनंजय मुंडे यांचे परळीसह बीड जिल्ह्यात अभुतपूर्व स्वागत झाले.अनेक दृष्टिने हा स्वागत सोहळा नेत्रदीपक ठरला.नगर ते परळीपर्यंत जागोजागी भव्यदिव्य स्वागत झाले. सकाळपासून सुरु झालेला हा सोहळा तब्बल १३ तास सुरुच होता.राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळीत आले असतांना वाल्मिकअण्णा कराड यांनी ना.धनंजय मुंडे यांचे अनुपम स्वागत केले. खास वाराणसी (काशी) येथे निर्माण करण्यात आलेले आकर्षक तेजोमय शिवलिंग भेट देऊन स्वागत करण्यात आल

अभिष्टचिंतन लेख:✍️ मोहन साखरे >>>ना.धनंजय मुंडे: धुरंधर नेतृत्व- अमोघ वक्तृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती

इमेज
  ना.धनंजय मुंडे: धुरंधर नेतृत्व- अमोघ वक्तृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती           कृ षी मंत्री ना.धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती होय. महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते  आमदार ,राज्याचे  नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे. अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि  'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे.आ.धनंजय मुंडे  यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!          महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही दिवसांपूर्वीच प्रचंड उलथापालथ झाली. या राजकीय रणनीतीमध्ये कोणती समीकरणे कशी जुळली जातील? याचा विचार करून करून सर्वसामान्य माणसाच्या विचार चक्राला ब्रेक लागला होता. अशा क्लिष्ट व अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीतून एक नवीन समीकरण महाराष्ट्र समोर आले. या राजकीय अमुलाग्र बदलांमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्य

कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस

इमेज
  कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस दाऊतपुर येथील जिल्हा परिषद शाळेला ग्राम पंचायत देणार सात टि. व्ही. संच - सरपंच कांताभाऊ फड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस दाऊतपुर ग्राम पंचायतच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. येथील जिल्हा परिषद शाळेला सात टी. व्ही. संच देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच कांताभाऊ फड यांनी दिली. आगामी काळात जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात येणार असल्याचेही फड म्हणाले.         राज्याचे नुतन कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांचा उद्या शनिवार दि. 15 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस दाऊतपुर ग्राम पंचायतच्या वतीने अभिनव उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. ना. मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दाऊतपुर ग्राम पंचायत गावातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकणार आहे. उद्या शनिवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शाळेतील सर्व वर्गांना प्रत्येकी 43 इंची एक टी. व्ही. संच भेट देण्यात येणार असल्याचे सरपंच कांताभाऊ फड यांनी सांगितले.       दाऊतपुर जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दर्जेदा