संपादक ज्ञानोबा सुरवसे यांना बंधूशोक;तातेराव सुरवसे यांचे निधन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दै. महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे यांचे बंधू तातेराव नामदेवराव सुरवसे यांचे र्‍हदयविकाराचा तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 55 वर्षे होते.

       कामानिमित्त तातेराव सुरवसे हे उस्मानाबाद येथे गेले असता अचानक त्यांना र्‍हदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात नेले असता उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. कै. तातेराव सुरवसे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी नागडगाव (ता. माजलगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

      कै. तातेराव सुरवसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, भावजयी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !