वाराणसी (काशी) येथे खास निर्माण करण्यात आलेले शिवलिंग

 अद्वैत भेट: ना.धनंजय मुंडेंना 'तेजोमय शिवस्वरुप' देत वाल्मिकअण्णांनी केले स्वागत



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळीत आले असतांना बीड जिल्ह्यात अभुतपूर्व स्वागत झाले. या अनुषंगानेच एक आत्मिय व अनुपम स्वागत अधोरेखित झाले. उत्कृष्ट नियोजनातील कल्पकता, भव्यता,दिव्यता यासाठी ओळख असलेले वाल्मिकअण्णा कराड यांनी ना.धनंजय मुंडे यांचे अनुपम स्वागत केले.ना.धनंजय मुंडेंना  'तेजोमय शिवस्वरुप' देत वाल्मिकअण्णांनी केलेले  स्वागत ही 'अद्वैत भेट' ठरली.

        ना.धनंजय मुंडे यांचे परळीसह बीड जिल्ह्यात अभुतपूर्व स्वागत झाले.अनेक दृष्टिने हा स्वागत सोहळा नेत्रदीपक ठरला.नगर ते परळीपर्यंत जागोजागी भव्यदिव्य स्वागत झाले. सकाळपासून सुरु झालेला हा सोहळा तब्बल १३ तास सुरुच होता.राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परळीत आले असतांना वाल्मिकअण्णा कराड यांनी ना.धनंजय मुंडे यांचे अनुपम स्वागत केले. खास वाराणसी (काशी) येथे निर्माण करण्यात आलेले आकर्षक तेजोमय शिवलिंग भेट देऊन स्वागत करण्यात आले. साडेपाच किलो वजनाचे चांदीचे हे शिवलिंग वाराणसी (काशी) येथे कलाकुसर करून घडवून घेण्यात आलेले आहे. एकप्रकारे ना.धनंजय मुंडे यांना साक्षात  'तेजोमय शिवस्वरुपाची' अद्वैत भेट  देऊन स्वागत करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !