कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस

 कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस


दाऊतपुर येथील जिल्हा परिषद शाळेला ग्राम पंचायत देणार सात टि. व्ही. संच - सरपंच कांताभाऊ फड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस दाऊतपुर ग्राम पंचायतच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. येथील जिल्हा परिषद शाळेला सात टी. व्ही. संच देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच कांताभाऊ फड यांनी दिली. आगामी काळात जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात येणार असल्याचेही फड म्हणाले.

        राज्याचे नुतन कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांचा उद्या शनिवार दि. 15 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस दाऊतपुर ग्राम पंचायतच्या वतीने अभिनव उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. ना. मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दाऊतपुर ग्राम पंचायत गावातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकणार आहे. उद्या शनिवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शाळेतील सर्व वर्गांना प्रत्येकी 43 इंची एक टी. व्ही. संच भेट देण्यात येणार असल्याचे सरपंच कांताभाऊ फड यांनी सांगितले.

      दाऊतपुर जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी ग्राम पंचायत आग्रही आहे. शाळेत सात वर्ग खोल्या (पहिली ते सातवी वर्ग) असुन प्रत्येक वर्गाला 43 इंची टी. व्ही. संच दिला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात येणार असुन गावातील मुलांना आधुनिक ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न करणार असुन उद्या शाळेला मान्यवरांच्या उपस्थितीत टी. व्ही. संच देण्याच्या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच कांताभाऊ फड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार